नवी दिल्ली, 7 जून : चाणक्य (Chanakya) हे एक कुशल राजकारणी, चतुर मुत्सद्दी, कुटनिती तज्ज्ञ, अर्थशास्त्रज्ञ म्हणून परिचित होते. प्रत्येकजण त्यांच्या तीक्ष्ण बुद्धिमत्तेमुळे प्रभावित झाला. यामुळेच त्यांना कौटिल्य (Kautilya) म्हटलं जाऊ लागलं. नीतिशास्त्राच्या माध्यामातून आयुष्य जगण्यासाठी महत्वाच्या गोष्टी सांगितल्या. आचार्य चाणक्य (Acharya Chanakya) यांच्या नीति कठीण काळामध्ये (Difficult Time) व्यक्तीला धैर्याने वागण्याची कला शिकवतात. चाणक्य नीतीमुळे व्यक्तीमध्ये चांगल्या (Good) आणि वाईट गोष्टी (Bad Things) ओळखण्याची क्षमता (Capacity) येते आणि शांतीपूर्ण आयुष्यही (peaceful life) जगता येतं. त्या नीतिचा आधार घेतला तर, आयुष्य जगणं सरळ आणि सोपं होतं. आचार्य चाणक्य यांच्या मते, माणसाचे योग्य निर्णय त्याला यशाच्या उंचीवर नेऊन ठेवतात मात्र, चुकीच्या निर्णयांमुळे केवळ बरबादीचं हातात पडते. त्यामुळे माणसाने योग्य आणि अयोग्य यातला फरक ओळखायला शिकलं पाहिजे. बरेचसे लोक चांगल्या माणसांना ओळखण्यात चूक करतात आणि चुकीच्या माणसावर भरोसा ठेवून नुकसान करतात.
दगाबाज माणसांवर विश्वास नको -
आचार्य चाणक्य सांगतात, ज्या नद्यांवरचे पूल पक्के नाहीत. त्या नद्यांवर कधीच विश्वास ठेवू नका. नदीचा प्रवाह वाढून कधीही पूल वाहून जाऊ शकतो. म्हणजेच जे लोक आपल्या सोबत विश्वासाने राहण्याची खात्री नसते अशा लोकांवर कधीच भरोसा ठेवू नये.
(Fish Lover : इम्युनिटी वाढवण्यासाठी खा हा मासा, हेल्दी हार्टसह होतील अनेक फायदे)
शस्त्र बाळगणार्या माणसावर भरोसा नको -
जी माणसं स्वतःबरोबर शस्त्रास्त्र बाळगतात त्यांच्यावर कधीच विश्वास ठेवू नका. कारण रागाच्या भरात ते तुमच्यावर हल्ला करू शकतात. याचा अर्थ ज्या लोकांचा आपल्या रागावर ताबा नसतो अशा लोकांची संगत कधीच करू नये.
चंचल स्वभावाची स्त्री -
नीति शास्त्रानुसार ज्या स्त्रीचा स्वभाव चंचल आहे. तिच्यावर भरोसा करू नका कारण, अशा स्त्रिया आपल्याला अडचणीमध्ये टाकण्याची शक्यता असते.
(औषध म्हणून Steroid घेत आहात? या चुका टाळा; अचानक वाढेल वजन)
वरिष्ठांचे चमचे -
ज्या माणसांचे संबंध वरिष्ठ माणसांशी असतात अशाही लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये. कारण, तुमच्या मनातल्या गोष्टी जाणून ते आपल्या वरिष्ठांपर्यंत पोहोचवू शकतात. यामुळे तुमच्याच शब्दांमुळे तुमचं नुकसान होऊ शकतं.
संयम नसलेली माणसं -
संयम स्वभाव नसेलेली माणसं नेहमी धोकादायक असतात. ज्या लोकांमध्ये संयम नसतो, अशा लोकांवर विश्वास ठेवू नका. संयम नसणारी माणसं रागाच्याभरात तुमचंही नुकसान करतील आणि स्वतःचंही नुकसान करतील.
(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Acharya chanakya, Chanakya niti