Home /News /lifestyle /

एड्सग्रस्त आरोपीकडून आजार पसरवण्याचा प्रयत्न, 20 हून अधिक स्त्रियांशी ठेवले शारीरिक संबंध

एड्सग्रस्त आरोपीकडून आजार पसरवण्याचा प्रयत्न, 20 हून अधिक स्त्रियांशी ठेवले शारीरिक संबंध

IDSग्रस्त आरोपीने ठेवले 20 हून अधिक स्त्रियांशी शारिरिक संबंध,ठरला सुपरस्प्रेडर

IDSग्रस्त आरोपीने ठेवले 20 हून अधिक स्त्रियांशी शारिरिक संबंध,ठरला सुपरस्प्रेडर

दिल्लीमध्ये एक आरोपी असलेल्या रुग्णानं जाणूनबुजून एचआयव्ही पसरवण्यासाठी लैंगिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीला आली आहे.

मुंबई, 20 जून:  एखादा आजार झाल्यावर त्यातून बरा होण्यासाठी रुग्ण प्रयत्न करतो. एचआयव्हीसारखे (HIV) आजार संक्रमित होऊ शकतात. अशा वेळी रुग्णांनी काळजी घेणं अपेक्षित असतं. मात्र दिल्लीमध्ये एक आरोपी असलेल्या रुग्णानं जाणूनबुजून एचआयव्ही पसरवण्यासाठी लैंगिक संबंध ठेवल्याची घटना उघडकीला आली आहे. बदरपूर भागातील एका आरोपीवर आठ वर्षांच्या मुलीच्या लैंगिक शोषणाचा आरोप आहे. विचित्र गोष्ट ही की स्वतःला एचआयव्ही असल्याचं माहीत असूनही त्यानं 20 पेक्षा जास्त स्त्रियांसोबत शारीरिक संबंध (Sex With More Than 20 Women) ठेवल्याचं पोलिसांना सांगितलं आहे. आपल्याला असलेला आजार इतरांना पसरवण्याच्या उद्देशानं त्यानं हे कृत्य केलं. लाईव्ह हिंदुस्थान डॉट कॉमच्या वेबसाइटनं हे वृत्त दिलं आहे. एका आठ वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली राहुल नावाच्या 30 वर्षीय व्यक्तीवर पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर त्याला पलवलमध्ये अटक करण्यात आली. अटक केल्यावर आरोपीच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पाठवले होते. त्याचा अहवाल गुरुवारी (16 जून 22) पोलिसांना मिळाला. त्यात आरोपीला एड्स असल्याचं दिसून आलं आहे. हेही वाचा - महिला करतेय तिच्या 12व्या लग्नाची तयारी, अशी होती आधीच्या 11 अपयशी लग्नाची कहाणी
दरम्यान, पीडित मुलगी एम्स रुग्णालयात दाखल होती. गुरुवारी तब्येत सुधारल्यावर तिला घरीदेखील सोडण्यात आलं. मात्र आरोपी एड्सग्रस्त (AIDS) असल्याचं कळताच पीडित मुलीचीही या संदर्भात तपासणी करण्यात आली. त्यात तिचा अहवाल निगेटिव्ह आला. मात्र, व्यवस्थित तपासणी व्हावी, या उद्देशानं काही दिवसांनी पुन्हा त्या मुलीची रक्त तपासणी करणार असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे. पोलीस तपासादरम्यान, आरोपीनं त्याचे त्या परिसरातील आणखी 20पेक्षा अधिक स्त्रियांसोबत शारीरिक संबंध असल्याचं कबूल केलं. वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आरोपीला तो एड्सग्रस्त असल्याचं आधीपासूनच माहीत होतं, मात्र जाणूनबुजून इतरांमध्ये याचा प्रसार करण्यासाठी असं केल्याचं आरोपीनं सांगितलं. आरोपीच्या दोन पत्नी व पाच मुलांची चौकशी केली. पोलिसांनी दोन्ही पत्नींना आरोपीला एड्स असल्याबाबत सांगितलं व त्यांनीही तपासणी करून घ्यावी याबद्दल सुचवलं. बलात्काराच्या गुन्ह्यासाठी अटक केलेल्या आरोपीनं पीडितेचा खूप छळ केला. पीडितेच्या शरीरावर आरोपीनं चावल्याच्या 20 पेक्षा अधिक खुणा आहेत. ही घटना घडण्याच्या दोनच दिवस आधी तो भाड्यानं त्या घरी राहायला आला होता. पीडित मुलगी तिच्या आईसोबत एकटीच राहत होती. तिचे वडील काही दिवसांपूर्वी त्यांना सोडून निघून गेले होते. मुलीची आई एका फॅक्टरीत काम करत होती. सोमवारी ती अशीच कामावर गेली असताना, आरोपीनं मुलीवर बलात्कार (Delhi Rape) केला. कामावरून परतल्यावर आईला या घटनेबाबत कळालं. त्यानंतर आरोपी लगेचच फरार झाला. पोलिसांच्या म्हणण्यानुसार, आरोपी लैंगिक संबंधापासून समाधानी नव्हता, त्यामुळेच त्यानं हे कृत्य केलं असावं.  ज्या स्त्रियांसोबत आरोपीनं संबंध ठेवले, त्या स्त्रियांचा पोलीस आता शोध घेत आहेत. अन्यथा अनेकांना एचआयव्हीची लागण होण्याचा मोठा धोका यातून निर्माण होऊ शकतो.
First published:

Tags: Delhi

पुढील बातम्या