मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Bedroom असतं शुक्राचं स्थान, तिथं चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका नाहीतर...

Bedroom असतं शुक्राचं स्थान, तिथं चुकूनही 'या' गोष्टी ठेवू नका नाहीतर...

वास्तु शास्त्रात बेडरूमचे (Vaastushastra bedroom) काही दोष सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत.

वास्तु शास्त्रात बेडरूमचे (Vaastushastra bedroom) काही दोष सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत.

वास्तु शास्त्रात बेडरूमचे (Vaastushastra bedroom) काही दोष सांगण्यात आले आहेत. जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 21 डिसेंबर : बेडरूम (Bedroom) ही प्रत्येक व्यक्तीसाठी खास जागा असते. दिवसभराच्या थकव्यानंतर विश्रांतीचे सुखद क्षण या खोलीतच मिळतात. शिवाय बेडरूम ही अशी जागा आहे, जिथे विवाहित लोक त्यांच्या जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवतात. परंतु, अनेकदा जाणूनबुजून किंवा नकळतपणे अशा काही वस्तू बेडरूममध्ये येतात, ज्यामुळे जीवनात अनेक प्रकारची संकटे येतात. वास्तु शास्त्रात बेडरूमचे (Vaastushastra bedroom) काही दोष सांगण्यात आले आहेत.

बेडरूममध्ये काही अनावश्यक गोष्टींमुळे पती-पत्नीच्या नात्यात दुरावा निर्माण होतो. याशिवाय या वस्तूंमुळे आर्थिक चणचणही येते. जाणून घ्या वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्या गोष्टी ठेवू नयेत.

झाडू किंवा डस्टबिन

'झी न्यूज'ने दिलेल्या बातमीनुसार वास्तूशास्त्रानुसार (Vaastushastra tips) बेडरूममध्ये डस्टबिन किंवा झाडू ठेवल्याने वास्तुदोष निर्माण होतो. बेडरूममध्ये या गोष्टी ठेवल्याने खोलीत नकारात्मक ऊर्जा पसरते, ज्यामुळे घरात असे करणाऱ्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागतो. याशिवाय मानसिक तणावही वाढतो. त्यामुळे बेडरुममधून डस्टबिन आणि झाडू लवकरात लवकर काढावा.

काटेरी झाडे

वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये चुकूनही काटेरी किंवा तीक्ष्ण पाने असलेली झाडे ठेवू नयेत. वास्तू तज्ज्ञ सांगतात की, खोलीत काटेरी वनस्पती ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा येते. त्यामुळे बेडरूममध्ये अशी रोपे ठेवणे टाळावे. काटेरी झाडापासून उद्भवणारे वास्तू दोष आर्थिक प्रगतीत अडथळा ठरतात.

हे वाचा - Health Tips : हिवाळ्यात सुक्या मेव्याचं जास्त प्रमाण असं ठरू शकतं घातक, वाचा सविस्तर

खराब इलेक्ट्रॉनिक्स

वास्तूशास्त्रानुसार बेडरूममध्ये कोणत्याही प्रकारची खराब किंवा निरुपयोगी इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवू नये. बेडरूममध्ये अशा काही गोष्टी असतील तर लगेच काढून टाका. कारण अशा गोष्टी बेडरूममध्ये राहिल्यास शुक्र आणि राहू घातक दोष निर्माण करतात. त्यामुळे घरात राहणाऱ्या लोकांचा मानसिक ताण वाढतो. यासोबतच झोप न येण्याची समस्या उद्भवते.

काळी चादर

वास्तू शास्त्रानुसार बेडरूम हे शुक्र ग्रहाचे स्थान आहे. शुक्राला काळा रंग आवडत नाही. त्यामुळे बेडरूममध्ये चुकूनही काळी चादर अंथरू नये किंवा वापरू नये. शुक्राचा तुमच्यावर प्रभाव राहणे फायदेशीर असते, त्यामुळे आयुष्यभर पैसा मिळत राहतो.

हे वाचा - Healthy Lifestyle: दिवसाची सुरुवात करताना करा या फक्त 3 गोष्टी; कधीही पडणार नाही आजारी

ताजमहालचा फोटो

वास्तूशास्त्रानुसार, बेडरूममध्ये ताजमहालचे चित्र कधीही लावू नये. ताजमहाल शोपीस बेडरूममध्ये सुद्धा लावू नये, यामुळे आर्थिक अडचणी येतात.

First published:

Tags: Lifestyle, Vastu