मुंबई, 20 फेब्रुवारी : आचार्य चाणक्यांनी (Chanakya) लिहिलेल्या नीती शास्त्रामध्ये जीवनाशी निगडीत अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. आचार्य चाणक्य यांनी वैयक्तिक जीवन, नोकरी, व्यवसाय, नातेसंबंध, मैत्री, शत्रू इत्यादी जीवनातील विविध पैलूंवर आपले विचार मांडले आहेत. लोकांना त्यांनी सांगितलेल्या गोष्टी कठोर वाटू शकतात. तसंच, सर्वांनाच ते पटू शकत नाहीत. पण, या गोष्टी त्या काळातल्या माणसाला योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगणाऱ्या (Chanakya Niti Tips) होत्या.
अमर उजालाने दिलेल्या बातमीनुसार, आचार्य चाणक्य यांची धोरणं माणसाला जीवनात यशस्वी होण्यासाठी प्रेरित करतात, असं मानलं जातं. एक कुशल राजकारणी, मुत्सद्दी आणि रणनीतीकार असण्यासोबतच ते अर्थशास्त्रातही जाणकार होते. विविध विषयांच्या सखोल माहितीमुळं त्यांना कौटिल्य असंही म्हटलं जातं. आचार्य चाणक्य यांनी मानव समाजाच्या कल्याणाशी संबंधित अनेक महत्त्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत. जाणून घेऊ, त्यांनी भाग्यवान स्त्रीचा उल्लेख करून काय सांगितलंय.
धैर्यवान स्त्री
आचार्य चाणक्य म्हणतात की संयम हे स्त्रीचं रत्न आहे. धीर धरणारी स्त्री खूप भाग्यवान असते. धीरगंभीर स्त्रीचं कुटुंब किंवा तिचा नवरा कधी संकटात सापडला तर, ती कधीही त्याला सोडून जाणार नाही आणि चांगल्या वेळेची वाट पाहील. चाणक्याच्या नीतिशास्त्रानुसार संयम बाळगणारी व्यक्ती कोणत्याही परिस्थितीतून सहज बाहेर पडते. जर एखाद्या व्यक्तीनं या गुणानं परिपूर्ण असलेल्या स्त्रीशी लग्न केलं, तर त्याचा नक्कीच भाग्योदय होईल.
हे वाचा -
22 फेब्रुवारीपासून या 4 राशींच्या लोकांच्या अडचणी वाढणार, अगोदरपासूनच व्हा सावध
धार्मिक स्त्री
आचार्य चाणक्य यांच्या मते, धार्मिक स्त्रीशी विवाह केल्यानं कोणत्याही व्यक्तीचं भाग्य उजळतं. धार्मिक व्यक्ती कधीही चुकीच्या मार्गावर चालू शकत नाही आणि त्याच्याशी संबंधित लोकांना चुकीच्या मार्गावर चालण्यापासून रोखते.
शांत स्वभावाची स्त्री
जी स्त्री शांत आणि संयमित असते आणि जिला लहान-सहान गोष्टींमध्ये राग येत नाही, ती खूप भाग्यवान असते. अशा स्त्रीशी लग्न केल्यानं माणसाचं नशीब बदलतं.
हे वाचा -
Mangal Gochar: मंगळ ग्रह मकर राशीत करतोय प्रवेश; या 4 राशींच्या लोकांचं भाग्य उजळणार
मृदू बोलणारी स्त्री
आचार्य चाणक्य म्हणतात की, जी कुटुंबात मृदुभाषी असते आणि अतिशय प्रेमानं बोलत असते, अशा स्त्रीच्या घरात नेहमी आनंदी वातावरण राहतं. अशा स्त्रीच्या उपस्थितीनं घरात सुख-शांतीचं वातावरण असतं. असा गुण असलेल्या स्त्रीशी विवाह केल्यानं पुरुषाचं नशीबही उजळतं आणि घरात समृद्धीही येते.
(सूचना : येथे दिलेली माहिती चाणक्य नीतीच्या माहितीवर आधारित आहे. न्यूज 18 लोकमत त्याची हमी देत नाही.)
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.