Home /News /lifestyle /

‘या’ राशींवर असतो शुक्राचा प्रभाव; मिळतं यश आणि सुख-समृद्धी

‘या’ राशींवर असतो शुक्राचा प्रभाव; मिळतं यश आणि सुख-समृद्धी

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) 3 राशींवर शुक्र ग्रहाचा प्रभाव असतो. शुक्राच्या कृपेमुळे ते आयुष्यामध्ये यशस्वी (Success) होतात आणि भरपूर संपत्ती मिळवतात.

    नवी दिली, 28 जुलै :  प्रत्येकालाच सुख समृद्धी, पैसा आणि यश हवं असतं. यासाठीच सगळेजण आयुष्यामध्ये मेहनत (Hard work) करत असतात. मात्र, फार कमी लोकांना ग्रहांची साथ मिळाली तर, माणूस जास्त यशस्वी ठरतो. ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) काही ग्रहांचा प्रभाव हा राशीवर पाहायला मिळतो. या ग्रहांच्या कृपेने काही राशीच्या लोकांची भरभराट होत असते. ज्योतिष शास्त्रानुसार शुक्र ग्रहाला प्रचंड महत्त्व आहे. या ग्रहाच्या कृपेमुळे व्यक्तीला आयुष्यामध्ये सुखसमृद्धी ऐश्वर्य प्राप्त होत असतं. शुक्र हा कलेचा कारक ग्रह मानला जातो. त्यामुळेच या राशीचे (Zodiac Sing) लोक कला क्षेत्रामध्ये काम करणारे असतात. शुक्राच्या कृपेमुळे लोक आयुष्यामध्ये यशस्वी (Success) होतात आणि भरपूर संपत्ती मिळवतात. लक्झरी लाइफ जगतात. त्यांना दाम्पत्य जीवनाच (Family Life) सुख मिळतं. शुक्राच्या प्रभावाने चांगला जोडीदार मिळतो. जाणून घेऊयात शुक्राची कृपादृष्टी असणाऱ्या काही राशी (Workout नंतर तुम्हालाही अशक्तपणा जाणवतो? या पदार्थांचं सेवन करा आणि थकवा दूर करा) वृषभ रास या राशीचा स्वामी ग्रह शुक्र आहे. त्यामुळेच शुक्राचा जास्त प्रभाव या राशीवर दिसतो. ज्योतिष शास्त्रानुसार या राशीचे लोक मेहनती असतात. यांची बुद्धी तल्लख असते. लहानपणापासूनच अभ्यासामध्ये हुशार असतात आणि यामुळे चांगलं करिअर घडवतात. हे लोक लक्झरी लाइफ जगतात. त्यांच्याकडे भरपूर पैसा असतो. आयुष्याच्या सुरुवातीच्या काळापेक्षा उत्तरार्धामध्ये यांना जास्त सौख्य लाभतं. (ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉपर 22व्या वर्षी IAS) तुळ रास या राशीच्या लोकांना ग्लॅमरस आयुष्य जगायला प्रचंड आवडतं. फॅशनेबल राहणं, महागड्या वस्तू घेणं, बाहेर फिरणं त्यांना आवडतं. मात्र, या गोष्टी मिळवण्यासाठी त्यांची मेहनत करायची तयारी असते. आयुष्याकडे बघण्याचा त्यांचा दृष्टिकोन प्रॅक्टिकल असतो. (5 राशींना आवडतं आपलं कौतुक; चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा बिघडतील संबंध) मीन रास मीन राशी शुक्राची उच्च रास आहे. या राशीवर शुक्राचा जास्त प्रभाव असतो. या राशीचे लोक रचनात्मक विचार करणारे असतात. त्यामुळे त्यांचं करिअर चांगलं घडतं. या राशीचे लोक बुद्धिमान असतात. धर्म आणि अध्यात्म यांची त्यांना आवड असते. आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन स्वच्छ असतो. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या