• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • ‘या’ राशींवर होणार शंकराची कृपा; पहा कोणत्या राशींना मिळणार आशिर्वाद

‘या’ राशींवर होणार शंकराची कृपा; पहा कोणत्या राशींना मिळणार आशिर्वाद

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) आषाढ महिन्यात 5 राशींना फार यश मिळणार आहे. अडकलेली कामं मार्गी लागणार आहेत.

 • Share this:
  नवी दिल्ली, 30 जुलै : प्रत्येकाच्या आयुष्यात पैशाला (Money) महत्त्व आहे. पैसा सर्वस्व नसला तरी आयुष्यातल्या काही महत्वाच्या सुविधा मिळवण्यासाठी पैसा लागतो. आयुष्यामध्ये नातीगोती, प्रेम, चांगलं आयुष्य यांच्याबरोबरच पैसा देखील असावा लागतो. पैसा असेल तर, माणूस सुखाने आयुष्य (Happy Life) जगू शकतो. त्यासाठी व्यक्तीवर देवांचीही कृपा असावी लागते. त्यांच्या कृपेने लोक श्रीमंत होतात किंवा अडचणीत येतात. श्रावण महिना सुरु होण्याआधी 5 राशींना आषाढ महिन्यामध्ये फायदा होणार आहे. या राशींवर भगवान शंकराची कृपा होणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) 12 राशींचं एक वेगळं महत्त्व आहे. या राशींवर (Zodiac Sing) ग्रहांच्या कृपेबरोबर देवांच्या कृपाशिर्वादाने यश (Success) मिळतं. आषाढ महिन्यामध्ये (Ashadha Month) 5 राशींवर शंकराची कृपा बरसणार आहे. जाणून घेऊयात भाग्यवान राशी. मिथुन रास मिथुन राशीसाठी आषाढ महिना अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. त्यांच्या प्रयत्नांना यश मिळणार आहे. अडलेली कामं मार्गी लागतील. शत्रूंचा नायनाट होईल. लाभदायक संधी मिळाल्यामुळे आर्थिक परिस्थिती चांगली होईल. (वर्किंग कपल्ससाठी एकत्र कुटुंबपद्धती ठरतेय वरदान; हे आहेत 4 फायदे) कर्क रास या राशीच्या लोकांवर भगवान शंकराची कृपा होणार आहे. अडकलेली काम चांगल्या पद्धतीने मार्गी लागतील. मात्र, नियोजनबद्ध पद्धतीने काम करावं लागेल. घरामध्ये धार्मिक वातावरण असेल. आई-वडिलांच प्रेम मिळेल. तनाव कमी होऊन लाभदायक संधी उपलब्ध होतील. तुळ रास या राशीवर शंकराची कृपा झाल्यामुळे अडकलेले पैसे मिळतील. नशिबाची साथ मिळेल. आई-वडिलांचं सहकार्य मिळेल. व्यापारात आणि नोकरीमध्ये उन्नती प्राप्त होईल. (फळ खाताना करू नका ‘या’ चुका; होतील पोटाचे विकार) कुंभ रास आषाढ महिन्यामध्ये कुंभ राशीची अडकलेली काम मार्गी लागणार आहेत. समाजामध्ये मान-सन्मान मिळेल. नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना नोकरीच्या संधी मिळणार आहेत. धनलाभाचे योग बनलेले आहेत. नवीन कामाला सुरुवात करण्यासाठी हा काळ शुभ आहे. (ऑगस्ट महिन्यात पालटणार भाग्य; 5 राशींना करियरमध्ये मिळणार जबरदस्त संधी) मीन रास मीन राशीच्या लोकांचा भाग्योदय होणार आहे. हाती घेतलेली सगळी कामं मेहनतीने मार्गी लागतील. व्यापारामध्ये आणि व्यवहारांमध्ये फायदा होणार आहे. आर्थिक उलाढाल चांगली राहील. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
  Published by:News18 Desk
  First published: