मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भाग्यवान असतात ‘या’ राशीच्या मुली; पत्नी म्हणून मिळाल्या तर नशीब पालटलं म्हणून समजा

भाग्यवान असतात ‘या’ राशीच्या मुली; पत्नी म्हणून मिळाल्या तर नशीब पालटलं म्हणून समजा

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology) 12 राशींपैकी एका राशीची मुलगी पत्नी म्हणून लाभणं भाग्यकारक मानलं जातं. वैवाहित जीवनातील सगळी सुखं त्यांच्यामुळे मिळतात.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 18 जुलै: ज्योतिष शास्त्रानुसार (Astrology)12 राशींचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे (Zodiac Sing) स्वतःचे स्वभाव गुण असतात. राशीनुसार त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. प्रत्येक राशीची व्यक्ती आयुष्यामध्ये चढ-उतार अनुभवत असते. ग्रहमान बदललं की आयुष्यामध्ये काही बदल देखील घडत असतात. प्रत्येक राशीमध्ये काही गुण असतात तर, काही दोष असतात.

पण, 12 राशींपैकी मकर अशी रास आहे जिच्यामुळे जोडीदाराचं (Life Partner) भाग्य बदलतं.

मकर राशीचा स्वामी शनी आहे. त्यामुळे या राशीच्या मुली स्वाभिमानी,सहनशील, आत्मनिर्भर आणि सहासी असतात. मात्र तितक्याच रागीटही असतात. संकटांना घाबरत नाहीत आणि अडचणीमुळे दुःखी देखील होत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे या राशीच्या मुली लग्नानंतर पतीचं भाग्य चमकवतात.

(नोकरी, व्यापारातील प्रगतीसाठी लाभदायक आहे पाचू; मात्र काही राशींचा करतो घात)

मकर राशीच्या मुली आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम करतात. कुटुंबांच्या सगळ्या जबाबदाऱ्या निभावतात. त्यांच्या मनामध्ये कुठल्याच गोष्टी बद्दल लालसा नसते. मकर राशीच्या मुलींचा स्वभाव शांत असतो.

(Muslim Dating Apps : डेटिंग अ‍ॅप्सला भारतीय मुस्लिमांचा कसा मिळतो प्रतिसाद?)

मात्र, गरज पडल्यास सोमरच्याचं तोंड बंद करण्याची ताकदही त्यांच्यामध्ये असते. मकर राशीच्या मुली निर्णयक्षम असतात. त्यामुळेच प्रत्येक कार्यक्षेत्रामध्ये यश मिळवतात. या राशीच्या मुलींना कुणावरही अवलंबून राहायला आवडत नाही. त्यामुळेच आपला जोडीदार देखील तसाच असावा अशी त्यांना अपेक्षा असते.

(ना पैसे ना स्मार्टकार्डची गरज; आता तुमच्या नखांनीच करा मनसोक्त शॉपिंग)

मकर राशीच्या मुली आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गरजेच्या वेळी त्याला मदत करतात. आपलं नातं पूर्ण निष्ठेने निभावतात. त्यांचं आपल्या कुटुंबावर प्रचंड प्रेम असतं. मुलांना आणि जोडीदाराल सांभाळून घेतात. त्यामुळे मकर राशीची पत्नी मिळाली तर, त्या व्यक्तीला नशिबवान मानलं जातं.

(Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)

First published:

Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark