Home /News /lifestyle /

5 राशींना आवडतं आपलं कौतुक; चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा बिघडतील संबंध

5 राशींना आवडतं आपलं कौतुक; चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा बिघडतील संबंध

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिष शास्त्रानुसार 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे.

ज्योतिषशास्त्रनुसार (According to Astrology) 5 राशीच्या लोकांना आपली स्तुती खुप आवडते.त्यांना सतत महत्व दिलं जावं असं वाटतं.

    नवी दिल्ली, 26 जुलै :  ज्योतिष शास्त्रानुसार (According to Astrology) 12 राशींचं वेगळं महत्त्व आहे. प्रत्येक राशीचे (Zodiac Sing) स्वतःचे स्वभाव गुण असतात. राशीनुसार त्यांचा स्वामी असतो आणि त्याच्या प्रभावनुसार या राशींचं भाग्य ठरत असतं. प्रत्येक राशीची व्यक्ती आयुष्यामध्ये चढ-उतार अनुभवत असते. ग्रहमान बदललं की आयुष्यामध्ये काही बदल देखील घडत असतात. तसंच प्रत्येक राशीमध्ये काही गुण असतात तर, काही दोष असतात. तसंतर, प्रत्येकालाच आपलं कौतुक (Appreciation) आवडतं, चर्चेमध्ये राहणं सगळ्यांच्या दृष्टीने महत्त्वाचं असतं. मात्र, काही लोकांना दुर्लक्षित (Ignorens) करणं सहन होत नाही. त्यांना आपल्या जोडीदाराबद्दलही पजेसिव्ह फिलिंग असतं. त्यामुळे जोडीदाराने, कुटुंबातल्या व्यक्तीने किंवा मित्र-मैत्रिणींनी प्रत्येक वेळी त्यांचं कौतुक करावं असं त्यांना वाटत असतं. 12 राशींपैकी 5 राशी आहेत ज्यांच्या दृष्टीने कौतुक महत्त्वाचं आहे. मेष रास मेष राशीला आपलं कौतुक केलेलं प्रचंड आवडतं. या राशीचे लोक अतिशय मोकळ्या स्वभावाचे असतात. त्यांच्यामध्ये खूप आत्मविश्वास असतो. मात्र लोकांनी सतत आपल्याकडे लक्ष द्यावं अशी यांची भावना असते. म्हणूनच त्यांना प्रत्येक गोष्टीचं नेतृत्व करण्याची इच्छा असते. लोकांनी दुर्लक्ष केलं तर या लोकांना प्रचंड राग येतो. (विवाहाच्या दिवशी मुलीच्या मनात असतात ‘या’ अपेक्षा; मुलांनी नक्की वाचा होईल फायदा) कर्क रास अटेंशन आणि कौतुक कर्क राशीला अत्यंत प्रिय आहे. त्यांच्या छोट्यातल्या छोट्या गोष्टीबद्दल इतरांनी आपली स्तुती करावी असं वाटतं असतं. तोंडावर खोटं-खोटं कौतुक केलं तरी कर्केला चालतं. कारण जोपर्यंत लोक कौतुक करतात त्यांची स्तुती करतात. एखाद्याचं मन जिंकण्यासाठी आणि त्यांच्याकडून कौतुक मिळवण्यासाठी हे लोक काहीही करू शकतात. (निळा पुष्कराज संपवेल प्रेम विवाहातल्या अडचणी; धारण करताच जुळेल लग्न) सिंह रास सिंह राशीचा लोकांमध्ये प्रचंड आत्मविश्वास असतो. हे लोक अत्यंत स्वप्रेमी असतात. त्यामुळे त्यांना सहजपणे खुश करता येत नाही. सिंह राशीच्या लोकांना दुर्लक्षित करणं सहन होत नाही. दुर्लक्ष केल्यामुळे त्यांना प्रचंड राग येतो. या राशीच्या लोकांना सतत चर्चेचा विषय बनवून राहायला आवडतं. त्यांचं कुटुंब, जोडीदार आणि मित्रांनी त्यांना अटेन्शन द्यावं असं त्यांना वाटत असतं. (सोडून द्यायाल शिका! अन्यथा अपराधीपणाची भावना संपवेल तुमचा आत्मविश्वास) तुळ रास इतर राशींपेक्षा तूळ राशीचे जातक कौतुकाला फार महत्त्व देत नसले तरीही इतरांनी आपल्याला महत्त्व द्यावं असं त्यांना मनापासून वाटत असतं. तुळ राशीच्या लोकांना साजशृंगार करायला प्रचंड आवडतो. ज्यामुळे तयार झाल्यानंतर आपल्या जोडीदाराने आपलं कौतुक करावं असं त्यांना वाटतं. सतत लोकांमध्ये चर्चेचा विषय बनून राहिला त्यांना आवडतं. (या आठवड्यात ठरवलेले प्लान होतील का पूर्ण? जाणून घ्या तुमच्या राशीत काय आहे?) वृश्चिक रास वृश्चिक राशीच्या लोकांना डेट करणं त्यांच्याबरोबर रिलेशनशिपमध्ये राहणं अतिशय आव्हानात्मक काम आहे. वृषभ राशीचे लोक पजेसिव्ह असतात. त्यांना आपल्या पार्टनरवर पूर्ण कंट्रोल ठेवायचा असतो. दुर्लक्षित राहणं सहन होत नाही. वृश्चिक राशीचे लोक आपल्या जोडीदाराप्रती ईमानदार असतात आणि त्यामुळे जोडीदाराने तसंच वागावं असं त्यांना वाटतं. त्यामुळेच जोडीदाराने थोडीशी ही चूक केली तरी त्यांना सहन होत नाही. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या