Home /News /lifestyle /

डोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे

डोळ्यांच्या रंगावरून ओळखा माणसाचा स्वभाव; घातक असतात ‘या’ रंगाचे डोळे

हिरव्या रंगाचे डोळे फार कमी लोकांचे असतात.

हिरव्या रंगाचे डोळे फार कमी लोकांचे असतात.

डोळ्यांच्या रंगावरून (Eyes Colour) त्या व्यक्तीचा स्वभाव आणि वृत्ती ओळखता येते. सहजपणे त्यांच्या मनात काय सुरू आहे हे जाणून घेता येतं.

    नवी दिल्ली, 27 जुलै :  असं म्हणतात की डोळे (Eyes) हा मनाचा आरसा असतो. आपल्या मनातले भाव हे डोळ्यांमध्ये प्रकट होत असतात. मात्र, काही जणांना आपल्या डोळ्यांचा वापर प्रभावीपणे करता येतो आणि त्यामुळे त्यांच्या मनातल्या भावना आपल्याला सहजपणे समजू शकत नाहीत. मात्र ज्योतिष शास्त्र  (Astrology) आणि समुद्र शास्त्रानुसार (Samudrik Shastra) व्यक्तीच्या डोळ्यांच्या रंगावरून आपण त्या व्यक्तीचा स्वभाव ओळखू शकतो काळे डोळे फार कमी लोकांचे डोळे काळेभोर असतात. ज्यांचे डोळे पूर्ण काळेभोर असतात. ते लोक अतिशय विश्वासू असतात. या लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवू शकता. ते कधीच फसवत नाहीत मात्र, या रंगाच्या डोळे असलेले लोक फार गूढ व्यक्तिमत्वाचे असतात. त्यामुळेच त्यांच्या मनातल्या गोष्टी कधीच ओळखता येत नाहीत. (ना कोचिंग क्लास, ना मार्गदर्शन; पहिल्याच प्रयत्नात UPSC टॉपर 22व्या वर्षी IAS) तपकिरी डोळे तपकिरी रंगाचे डोळे असलेले लोक अतिशय आकर्षक दिसतात. बऱ्याच लोकांचे या रंगाचे डोळे असतात. या लोकांचं वागणं आत्मविश्वासपूर्ण असतं. हे लोक दृढनिश्चयी असतात. मात्र, योग्य वेळी आपला स्टॅंड घेताना त्यांना थोड्या अडचणी येतात. (पावसाळ्यात तांदळांना किड लागत असेल तर‘ हे’ उपाय करुन पाहा) हिरवे डोळे हिरव्या रंगाचे डोळे फार कमी लोकांचे असतात. त्यामुळे अशा रंगाचे डोळे असलेले लोक अतिशय आकर्षक दिसतात. हे लोक प्रचंड बुद्धिमान असतात. मात्र इतरांबद्दल यांच्या मनामध्ये आकस असतो. त्यामुळे या डोळ्यांना घातक मानलं जातं. (5 राशींना आवडतं आपलं कौतुक; चुकूनही करू नका दुर्लक्ष; अन्यथा बिघडतील संबंध) निळे डोळे सर्वांना निळे डोळे प्रचंड आवडतात. या रंगाचे डोळे देखील फार कमी पाहायला मिळतात. या डोळ्यांमुळे हे लोक अतिशय आकर्षक दिसतात. निळ्या रंगाचे डोळे असलेल्या लोकांचं मन आणि विचार स्थिर असतात. नातेसंबंध प्रचंड प्रेमाने निभावतात. कोणालाही दुखवायला त्यांना आवडत नाही शिवाय आहे हे लोक दयाळू आणि गंभीर स्वभावाचे असतात. (पत्नीला सोडून विवाहितेच्या प्रेमात पडला युवक; प्रेग्नन्सीमुळे कथेत मोठा ट्विस्ट) राखाडी रंगाचे डोळे राखाडी रंगाचे डोळे असलेल्या लोकांचा स्वभाव रोमांटिक असतो. या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींवर राग येत नाही आणि त्यामुळेच त्यांची लवकर मैत्री होते. हे लोक विनम्र स्वभावाचे असतात. (Disclaimer: या लेखामधली तपशील आणि सूचना सर्वसामान्य माहितीवर आधारित आहे. news18lokmat.com त्याची पुष्टी करत नाही. याला शास्त्रीय आधार नाही.)
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Astrology and horoscope, Rashibhavishya, Rashichark

    पुढील बातम्या