• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • विसरा लाईट बिलचं टेन्शन; बिनधास्त वापरा AC, पण हे सेटिंग करा

विसरा लाईट बिलचं टेन्शन; बिनधास्त वापरा AC, पण हे सेटिंग करा

AC वापाराची इच्छा असली तरी लाईट बिलच्या भीतीने वापरायला टाळाटाळ करू नका

AC वापाराची इच्छा असली तरी लाईट बिलच्या भीतीने वापरायला टाळाटाळ करू नका

AC वापराच्या काही सोप्या टिप्समुळे (Easy Tips) वीज बिल जास्त येणार नाही आणि मेन्टेनन्सचा खर्चही कमी (Low Maintenance) होईल.

 • Share this:
  दिल्ली,21 जून : पावसाळा सुरूवात झाली असली तरी, वातावरणात अजूनही गारवा  निर्माण झालेला नाही. त्यामुळे घरात गारवा (Cooling) राहण्यासठी एसीचा वापर होतोच. उष्णता वाढल्याने काही लोक पंखा वापरतात, कुलर किंवा एसी. हल्ली जास्त वापरला जातो. पण, घरात एअर कंडिशनर(Air Conditioner) लावला तर बजेट हलतं. कारण लाईट बिल वाढतं. त्यामुळे इच्छा असूनही AC लावता तेत नाही. बदलत्या वातावरणामुळे गर्मी वाढलेली आहे. कामावरून घरी परतल्यावर आपल्याला निवांत झोप हवी असते. रात्री गरम व्हायला लागलं तर, शांत झोप लागत नाही. त्यामुळे सकाळी चिडचिड होते, कामात लक्ष लागत नाही. अपुऱ्या झोपेने आरोग्य विषयक समस्याही होतात.पण, कारण माहिती असूनही उपाय करता येत नाही. बऱ्याचवेळा मनात येतं की AC लावावा पण, लाईट बिलची भीती वाटत राहते. AC वापरूनही लाईट बिल कमी यावं यासाठी काही सोपे उपाय करता येतात. योग्य टेम्परेचर सेट करा काही लोकांना वाटतं की ACचं टेम्परेचर कमी ठेवलं तर जास्त थंडावा मिळतो. त्यामुळे लवकर गारावा मिळण्यासाठी, लोक अनेकदा एअर कंडिशनरवर खुप कमीवर सेट करतात. एअर कंडिशनरचं किमान तापमानात 18 डिग्री सेल्सियसवर सेट करतात. ब्युरो ऑफ एनर्जी एफिशियन्सीनुसार एअर कंडिशनरचं सरासरी तापमान 24 डिग्री सेल्सिअस असतं. हे तापमान शरीरासाठी देखील योग्य आणि आरामदायक आहे. एवढेच नाही तर, काही संशोधनानुसार, AC प्रत्येक वेळी वाढवलेलं 1 डिग्री तापमान जवळपास 6 टक्के वीज वाचवतं. त्यामुळे वीज बिलात कमी यावं असं नाटत असेल तर ACचं सरासरी तापमान 18 डिग्री सेल्सिअसऐवजी 24 डिग्री सेल्सियस ठेवा. (चुकूनही अंड्यांबरोबर खाऊ नका ‘हे’ पदार्थ; होईल अ‍ॅलर्जी) स्टार रेटिंग इक्ट्रॉनिक इल्क्ट्रॉनिक वस्तूंवर जेवढे जास्त स्टार असता तिवढी विजेची बटत होते.  5 स्टार रेटिंग असलेले AC रूम थंड करतात आणि वीजही वाचवतात. टाईमर सेट करण्याची सवय AC मधल्या टायमर सेटिंगचा वापर जरुर करावा. टायमर सेटिंगमुळे ठराविक वेळा एअर कंडिशनर चालू  किंवा बंद करता येतो. त्य़ासाठी आपल्याला झोपेतून उठावं लागत नाही. हल्ली AC मध्ये ही सिस्टीम दिलेली असते. टायमर सेट केला तर, AC  थोड्या थोड्या वेळाने बंद होतो आणि सुरू होतो. त्यामुळे विजेची बचत होते. यामुळे आपलं बिल बरेच दिवस कमी ठेवण्यास मदत होते. (Vastu Tips: घरातील कलहाला कारण ठरेल आरसा;सकारात्मक उर्जेसाठी असा वापरा) वेळोवेळी मेन्टेन्स एसी वापराताना वातावरणं थंड राहवं यासाठी काही काळजी घ्यावी लागते. AC लावताना घरातले दरवाजे, खिडक्या आणि पडदे बंद ठेवावेत. त्यामुळे खोलीतल वातावरण लवकर थंड होईल. ACही चांगल्या प्रकारे काम करेल. विजेचं बिलही कमी येईल. AC व्यवस्थितपणं वापरला तर फायदा होतो. स्मार्ट एअर कंडिशनर स्मार्ट एअर कंडिशनर वापरल्याने जास्त वेळ हवेत गारवा राहतो. स्मार्ट AC रुमच्या आतील लोकांच्या हालचालींवर नजर ठेवतो आणि त्यांच्या हालचालीनुसार अटोमॅटिकली बदलतो. स्मार्ट एअर कंडिशनर थंडाव्याची गरज समजून घेऊन त्यांची पद्धत बदलत असतात आणि लाईट कमी खर्च होते. (Dry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत) नियमित सर्व्हिसिंग नियमित सर्व्हिसिंगमुळे कूलिंगबरोबरच AC चांगल्या स्थितीत राहतो. आता असे AC उपलब्ध आहेत जे वेळोवेळी मशीनच्या आत धूळ आपोआप स्वच्छ करतात. त्यामुळे बरेच चांगले टिकतात. शिवाय, सर्विसींगचा खर्च देखील वाचवतो आणि एअर कंडिशनर जास्त दिवस टिकतो.
  Published by:News18 Desk
  First published: