नवी दिल्ली, 28 सप्टेंबर: शिवी देणं (abusing) आणि शिवी खाणं हे कुणालाच आवडत नाही; पण राग अनावर झाल्यानंतर अनेकांच्या तोंडातून शिवी बाहेर पडते. काहींना तर लहानसहान गोष्टींवरून शिव्या देण्याची सवय असते. असे लोक घरी असोत किंवा बाहेर, ते सगळीकडे शिव्या (cursing) देताना दिसतील. त्यांची भाषाच शिवराळ असते.
शिवी म्हणजे दुसऱ्या माणसाचा अपमान करण्यासाठी तो दुखावेल असे असभ्य, अश्लील (vulgar) किंवा अपमानकारक शब्द वापरणं. मुळात शिवी देणं ही गोष्ट समाजाने निषिद्ध मानली आहे. शिव्या देणारे लोक कुणालाही आवडत नाहीत; पण आता शिव्यांबाबत करण्यात आलेल्या एका संशोधनामुळे (Research) शिव्या देणाऱ्यांकडे बघण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. तसंच संशोधनाचे निष्कर्ष बघितल्या तुम्ही शिव्या देत नसाल तर कदाचित तुम्ही त्या द्यायलाही लागू शकता.
शिव्या देणाऱ्या व्यक्ती दीर्घ आयुष्य जगतात, असा निष्कर्ष या संशोधनातून काढण्यात आला आहे. शिवीगाळ करून त्यांची निराशा कमी होते. तसंच मन निरोगी राहते, असा दावा हे संशोधन करणाऱ्या संशोधकांनी केला आहे. संशोधकांनी ही गोष्ट आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर असल्याचं म्हटलं आहे.
अरे बापरे! कोरोना हिरावतोय आवाज; बऱ्या झालेल्या रुग्णांना बळावतेय गंभीर समस्या
न्यू जर्सीतल्या (New Jersey) कीन विद्यापीठाच्या (Keane University) संशोधकांनी शिव्यांबाबतचा अभ्यास केला आहे. शिव्यांबाबतचा असा सकारात्मक निष्कर्ष संशोधकांनी काढल्याने आता शिव्या देणाऱ्या व्क्ती समाधानी होतील. अशा व्यक्ती आता अधिक उघडपणे शिव्या देण्याची शक्यता आहे.
कीन विद्यापीठाने आपल्या संशोधनात काही विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांचा (students) समावेश केला होता. या विद्यार्थ्यांचे हात बर्फाच्या पाण्यात बुडवून ठेवण्यात आले. संशोधनामध्ये असं आढळून आलं, की जे विद्यार्थी या प्रक्रियेदरम्यान गैरवर्तन करत होते ते जास्त काळ थंड पाण्यात हात बुडवून ठेवू शकले. या आधारावर संशोधकांनी अभ्यासाच्या निष्कर्षामध्ये नमूद केलं की, शिव्या दिल्याने मेंदूतली निराशेची भावना कमी होते आणि मानवी मेंदू निरोगी राहतो. तणाव कमी झाल्यावर व्यक्ती दीर्घ आयुष्य जगते.
Navratri 2021: नवरात्रोत्सवाच्या नऊ दिवसांत घ्या 'या' गोष्टींची काळजी; वाचा....
अभ्यासादरम्यान असं आढळून आलं की, जे लोक शिव्या देत नाहीत ते गंभीर परिस्थितीत त्वरित हार मानतात. त्यांना जास्त ताण असतो. परिणामी त्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो. यामुळे आता तुम्ही शिव्या देणाऱ्यांना भेटलात, तर समजून घ्या की ते तुमच्यासोबत दीर्घ आयुष्य जगतील.
थोडक्यात काय तर आता शिव्या द्या आणि मनावरचा ताण हलका करा, असं या संशोधनावरून म्हणायला हरकत नाही; पण शिवी देतानाही अश्लील भाषेत बोलणं टाळलं तर समोरच्याच्या मनाला ते जास्त लागणार नाही. एवढी काळजी घ्यायलाच हवी.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.