मुंबई, 06 डिसेंबर : जगात एकापेक्षा एक चांगली हॉटेल्स आहेत. काही खूप मोठी तर काही आलिशान आहेत. प्रत्येक हॉटेलचं एक वैशिष्ट्य आहे. आपल्या खिशात किती पैसे आहेत, आपल्याला कोणतं परवडतं हे महत्त्वाचे. तुम्ही सुट्टीच्या काळात एखाद्या हॉटेलमध्ये राहिला असाल, तेव्हा एक प्रश्न मनात आलाच असेल की, जगात सर्वांत मोठं हॉटेल कोणतं असेल? म्हणजे ज्यात सर्वांत जास्त खोल्या असतील, सर्वांत जास्त रेस्टॉरंट्स असतील व ज्याची वास्तू सर्वांत मोठ्या जागेवर पसरलेली असेल. चला तर मग जगातील सर्वांत मोठ्या हॉटेलबद्दल जाणून घेऊया.
जगातील सर्वांत मोठं हॉटेल सौदी अरेबियातील मक्का या पवित्र शहरात बनत आहे. त्याचं नाव 'अबराज कुदाई' असं आहे. या हॉटेलमध्ये 10 हजारांपेक्षा जास्त खोल्या व 70 रेस्टॉरंट्स असणार आहेत. हे हॉटेल 2017 मध्ये बांधून पूर्ण होणार होतं पण अजून त्याचं काम चालू आहे. या साठी 3.5 बिलियन डॉलर येवढा खर्च येणार आहे. कच्च्या तेलाच्या कमी झालेल्या किमतींमुळे या हॉटेलचं काम वेळेत पूर्ण होऊ शकलं नाही.
हेही वाचा- चिमुकल्याचा थेट साई बाबांना फोन, सांगितली अशी गोष्ट ऐकून तुम्हालाच बसेल धक्का
हॉटेल इज्मेलोवो सध्या जगात सर्वांत मोठं
तसं पाहिलं तर रेकॉर्डनुसार रशियातील मॉस्को या शहरातील हॉटेल इज्मेलोवो (Izmailovo) हे जगातील सर्वांत मोठं हॉटेल आहे. या हॉटेलमध्ये जवळपास 7500 खोल्या आहेत. या हॉटेलचा विक्रम मोडण्यासाठी दुसऱ्या हॉटेलांना काही अवधी लागू शकतो. या हॉटेलचे चार टॉवर असून प्रत्येक टॉवर हा 30 मजली आहे. प्रत्येक टॉवरला ग्रीक वर्णमालेनुसार अल्फा, बिटा, वेगा व गॅमा-डेल्टा अशी नावं दिलेली आहेत. 1980 मध्ये ऑलिंपियाड दरम्यान याच हॉटेलमध्ये खेळाडूंना उतरवण्यात आलं होतं.
या हॉटेलच्या वर चार हेलिपॅड
चला तर जाणून घेऊया जगातील सर्वांत मोठ्या हॉटेलच्या बाबतीत क्वोरावर लोक काय म्हणतात. तुमच्या माहितीसाठी क्वोरा ही प्रश्न-उत्तरांची वेबसाईट आहे, ज्यावर लोक प्रश्न विचारु शकतात व उत्तरही देऊ शकतात. हुसाम तौसिफ नामक एका युजरने लिहलं आहे की, 'जगातील सर्वांत मोठं हॉटेल सौदी अरेबियातील मक्का या शहरात तयार होत आहे. ज्यात जवळपास 10,000 खोल्या असतील. 12 टॉवरच्या या हॉटेलमध्ये खोल्यांशिवाय दिवस-रात्र चालू राहणारी 70 रेस्टॉरंट्स असतील. या हॉटेलचं नाव 'अबराज कुदाई' असून 45 मजली उंच या हॉटेलच्या वर पाहुण्यांची हेलिकॉप्टर उतरवता यावीत यासाठी चार हेलिपॅड तयार केलेले आहेत.
ही पण हॉटेल्स आहेत मोठी
क्वोरावर राजेश चौधरी या युजरने लिहलं आहे की, '1990 साली सुरू झालेलं 'दी वेनेटियन' हे हॉटेल या यादीत सर्वोच्च स्थानी आहे. हे हॉटेल 36 मजली आहे. यासोबतच दी वेनेटियनचाच भाग असलेली ‘दी पलाजो’ हे 53 मजली हॉटेलसुद्धा आहे. ही दोन्ही हॉटेल एकच मानली जातात व यांचं बुकिंगदेखील सोबतच होतं. अमेरिकेतील लास व्हेगास या ठिकाणी असलेल्या या हॉटेल्समध्ये एकूण 7,017 खोल्या आहेत.'
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Viral news