मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

'लाल सिंग चढ्ढा'त असाही दिसणार आमिर खान; VIRAL VIDEO तील नवा लूक पाहून व्हाल हैराण

'लाल सिंग चढ्ढा'त असाही दिसणार आमिर खान; VIRAL VIDEO तील नवा लूक पाहून व्हाल हैराण

याआधी 'लाल सिंग चढ्ढा'तील पोस्टरमध्ये (laal singh chadha) आमिर खान (aamir khan) दाढी-मिशीत दिसला तेव्हा सर्वच जण हैराण झाले होते. आता याच फिल्ममध्ये त्याचा अगदी विरुद्ध असा लूक समोर आला आहे.

  मुंबई, 28 सप्टेंबर :  सध्या बॉलिवूडमधील अनेक फिल्म्स चर्चेत आहेत, त्यापैकीत एक म्हणजे अभिनेता आमिर खानची (Aamir Khan) 'लाल सिंह चढ्ढा' (Lal Singh Chaddha). या फिल्ममध्ये सर्वांचं लक्ष वेधून घेतलं हे आमिर खानच्या लूकने. आमिर खानचा नवा अवतार या फिल्ममध्ये पाहायला मिळतो आहे. याआधी या फिल्मचं पोस्टर आपल्या सोशल मीडियावर शेअर केला, त्यावेळी दाढी-मिशीतील त्याचा लूक पाहून सर्वजण हैराण झाले. आता त्याचा आणखी एक लूक व्हायरल झाला आहे. 'लाल सिंह चढ्ढा' या फिल्मच्या शूटिंगदरम्यान एक व्हिडीओ लीक झाला आहे. हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागला आहे. यामध्ये आमिर खान अगदी यंग लूकमध्ये दिसतो आहे.
  View this post on Instagram

  #Leaked Aamir on the sets of #LalSinghChaddha #AamirKhan #KareenaKapoor

  A post shared by Bollywood Hungama🎥 (@realbollywoodhungama) on

  आमिरचा हा लूक पाहून त्याच्या कोणत्या जुन्या फिल्मच्या शूटिंगदरम्यानचा तर नाही ना असाच प्रश्न पडतो.  मात्र  मीडिया रिपोर्ट्सनुसार आमिर खान दिल्लीत आपल्या टीमसह 'लाल सिंह चढ्ढा'चं शूटिंग करत होता. त्यादरम्यान हा व्हिडीओ आहे. यात आमिर खान पिवळ्या रंगाच्या टीशर्टमध्ये आणि निळ्या रंगाच्या जिन्समध्ये आहे. त्याच्या हातात फाइलसारखं काहीतरी दिसतं आहे आणि त्याच्या आजूबाजूला काही लोक आहेत. त्यांच्यासह कदाचित तो सीनबाबत काहीतरी बोलतो आहे. हे वाचा - Ranbir kapoor birthday: रणबीर कपूरचे असे PHOTO जे व्हायरल होताच माजली होती खळबळ आधी दाढी-मिशी आणि आता अगदी यंग लूक पाहिल्यानंतर आमिर या फिल्ममध्ये बऱ्याच अवतारात दिसेल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे.  'लाल सिंह चढ्ढा' हा सिनेमा 1994  साली प्रदर्शित झालेल्या  'फॉरेस्ट ग्रम्प' या हॉलिवूड सिनेमाचा हिंदी रिमेक आहे. या सिनेमाच दिग्दर्शन अद्वैत चंदन करत असून अद्वैतनं याआधी 'सीक्रेट सुपरस्टार' या आमिरच्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.  ही फिल्म किरण राव आणि आमिर खानची निर्मिती आहे.  या सिनेमात आमिरसोबत करिना कपूर मुख्य भूमिकेत आहे.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Aamir khan, Bollywood

  पुढील बातम्या