कन्या आणि मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी असेल संयमाची परीक्षा, वाचा आजचं राशीभविष्य

कन्या आणि मिथुन राशीच्या व्यक्तींसाठी असेल संयमाची परीक्षा, वाचा आजचं राशीभविष्य

कोणाचे स्टार्स चमकणार कोणाला करावा लागणार समस्यांचा सामना जाणून घ्या राशीभविष्य.

  • Share this:

मुंबई, 09 जुलै: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या प्रत्येक दिवसातील आव्हानांची चाहूल आपल्याला आधीच लागली तर आपल्याला समस्यांचा सामना करणं अधिक सोपं जातं. यासाठी जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.

मेष- आजचा दिवस कामात व्यस्त जाईल. थकवा आणि ताण आज आपण दूर करू शकता.

वृषभ- आज आपल्याकडे अधिक ऊर्जा असेल. अनेक ठिकाणी आज आपली निराशा होऊ शकते. ताण कमी करण्यासाठी संगीत ऐका.

मिथुन- गुंतवणूक करताना काळजीपूर्वक करा. भांडण विसरून जोडीदारासोबत चांगला वेळ घालवा. आज आपल्या संयमाची परीक्षा आहे.

कर्क- व्यायाम आरोग्यासाठी चांगला आहे. कुटुंबातील सदस्यांच्या वागण्यामुळे आज आपल्याला ताण येईल. आपल्यावर दबाव निर्माण केला जाऊ शकतो.

हे वाचा-लहान मुलांसाठी घातक ठरू शकतो हँड सॅनिटायझरचा उपयोग, त्यासाठी अशी घ्या काळजी

सिंह- खर्चात अनपेक्षित वाढ झाल्यानं बजेट कोलमडेल. अफवांपासून दूर राहा.

कन्या- कामाचा ताण आल्यानं आज चिडचिड होईल. वैवाहिक जीवन अधिक आनंदी बनवू शकता.

तुळ- आरोग्य चांगलं राहिल, अति काळजी केल्यानं आरोग्यावर परिणाम होऊ शकतो. कामाच्या ठिकाणी आपल्या चुका मान्य करणं हिताचं ठरेल.

वृश्चिक- वेगानं होणारं कार्य आपल्याला प्रेरणा देईल. यश मिळवण्यासाठी आपले विचार बदला. कामाच्या ठिकाणी दबाव वाढल्यानं चिडचिड होईल.

धनु- नवीन माहिती मिळवण्याचा प्रयत्न करा. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका.

हे वाचा-फोटो पाहून म्हणाल WOW! विश्वास बसणार नाही मात्र भारतातच आहे सुंदर रेल्वे स्टेशन

मकर - आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. खर्चावर नियंत्रण ठेवा.आयुष्यात प्रेमाची कमतरता आज भासू शकते.

कुंभ- काम आटपते घेण्याकडे अधिक लक्ष द्या. सहकारी आपल्या कामात अडथळी निर्माण करू शकतात. कदाचित आज आपण दिवस वाया घालवला अशी भावना निर्माण होऊ शकते.

मीन- वाद होणार नाहीत याची काळजी घ्या. प्रेमातून आपल्याला आनंद मिळेल. जोडीदाराचे मन दुखावू नका.

Published by: Kranti Kanetkar
First published: July 9, 2020, 6:47 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading