मुंबई, 15 जुलै: प्रत्येक दिवस सारखा नसतो. येणाऱ्या दिवसातील समस्या कोणत्या याची पूर्वकल्पना असेल तर त्यावर तोडगा काढणं अधिक सोपं जातं. यासाठीच जाणून घ्या कसा असेल आजचा आपला दिवस.
मेष- आपल्या संशयी वृत्तीमुळे आपल्या हातातून गोष्टी जातील. दिवसाअखेरीस आर्थिक फायदा होईल. कामाचा दबाव असू शकतो.
वृषभ- आज आपलं कौतुक होईल. जोडीदारासोबत वेळ घालवाल.
मिथुन- आपली माहिती कुणा तिसऱ्या व्यक्तीला देऊ नका. आपल्या जोडीदाराबरोबर आयुष्यातील सर्वात रोमँटिक दिवसांपैकी एक असू शकतो.
कर्क- काम लवकर आटपण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काही अडचणींचा सामना करावा लागू शकतो. प्रॅक्टिकल विचार करण्यावर भर द्या.
हे वाचा-आता महाराष्ट्रातही होऊ शकते सफरचंदाची शेती, उष्ण वातावरणात येतं HRMN 99
सिंह- जोडीदारासोबत वाद होणार नाहीत याची काळजी. आपली एक चांगली प्रतीमा निर्माण होईल.
कन्या- व्यवसायिकांसाठी आजचा दिवस चांगला आहे. शक्य तेवढं दुर्लक्ष करा.
तुळ- परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न करा. जोडीदाराच्या वागण्याचा आपल्याला त्रास होऊ शकतो.
वृश्चिक- आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी प्रयत्न करा. एकतर्फी प्रेमातून आज आपल्याला त्रास होऊ शकतो. आपण केलेली मेहनत फळाला येईल.
हे वाचा-अरे बापरे! फक्त एका लिफ्टमुळे एकट्या महिलेनं नकळत 71 जणांना केलं कोरोना संक्रमित
धनु- समस्यांमुळे तणाव निर्माण होऊ शकतो. आजचा दिवस खूप निराशादायी असू शकतो.
मकर - आज आपलं आरोग्य चांगलं राहिल. मानसिक ताण येऊ शकतो. आज आपल्या संयमाची परीक्षा पाहिली जाईल.
कुंभ- जोडीदाराच्या वागण्याचा आपल्याला त्रास होईल. व्यावसायिक समस्या सहजपणे सोडविण्यासाठी आपल्या कौशल्याचा वापर करा.
मीन- आर्थिक प्रकल्पांमध्ये गुंतवणूक करा. समस्या उद्भवतील. आज दिवस कंटाळवाणा वाटू शकतो.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Astrology and horoscope