मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सुंदर नाकाचा मोह मुलीला पडला महागात, प्लास्टिक सर्जरी कापावे लागले दोन्ही पाय

सुंदर नाकाचा मोह मुलीला पडला महागात, प्लास्टिक सर्जरी कापावे लागले दोन्ही पाय

महागड्या प्लास्टिक सर्जरी करवून घेत सुंदर दिसण्याचा मोह कुठल्या थराला जाऊ शकेल ते सांगता येत नाही. यातून अनेकदा भयंकर अपघात घडत आहेत.

महागड्या प्लास्टिक सर्जरी करवून घेत सुंदर दिसण्याचा मोह कुठल्या थराला जाऊ शकेल ते सांगता येत नाही. यातून अनेकदा भयंकर अपघात घडत आहेत.

महागड्या प्लास्टिक सर्जरी करवून घेत सुंदर दिसण्याचा मोह कुठल्या थराला जाऊ शकेल ते सांगता येत नाही. यातून अनेकदा भयंकर अपघात घडत आहेत.

इस्तंबूल, 29 डिसेंबर : अधिक सुंदर दिसण्याच्या मोहापायी प्लास्टिक सर्जरी (plastic surgery) करण्याचं चलन देशविदेशात खूप वाढताना दिसत आहे. मात्र अनेकदा यातून मोठा धोकाही (risk) उद्भवू शकतो. विदेशात घडलेल्या एका प्रकारातून असंच भयानक वास्तव समोर आलं आहे.

इस्तंबूलमध्ये (Istanbul) ही घटना घडली आहे. एक 25 वर्षांची मुलगी सेविंक स्केलिक (Sevink skelick) हिनं नाकाची सर्जरी (nose surgery) करवून घ्यायचं ठरवलं. या सर्जरीनंतर तिला नाईलाजानं आपले दोन्ही पाय (legs) कापण्याचा निर्णय घ्यावा लागला.

सेविंक इस्तंबूल इथल्या एका खासगी हॉस्पिटलमध्ये (private hospital) नाक लहान करण्याची सर्जरी करून घेण्यास गेली. माध्यमांमध्ये आलेल्या बातम्यांनुसार 2 मे 2014 मध्ये साधारण 2 तास चाललेल्या शस्त्रक्रियेनंतर ती नीट असल्याची खात्री करत डॉक्टरांनी तिला घरी पाठवलं. घरी आल्यावर सेविंकला ताप चढू लागला. मात्र हॉस्पिटल सतत हेच सांगत होतं, की तिची तब्येत नीट आहे. आठवडाभरानंतर ती डॉक्टरांना भेटायला गेली, तेव्हा तिच्या लक्षात आलं, की तिथल्या सगळ्या कर्मचाऱ्यांना काढून टाकण्यात आलं आहे.

स्थानिक माध्यमांच्या बातम्यांनुसार, हॉस्पिटल तिला म्हणालं, की तिची तब्येत चांगली असून घाबरण्याचं काही कारण नाही. शस्त्रक्रियेनंतर अशी लक्षणं दिसतातच. मात्र यानंतरही तिची तब्येत अजूनच खराब होत राहिली.

सेविंकच्या भावानं सांगितल्यानुसार, शस्त्रक्रियेनंतर तिच्या जेवण्याखाण्यावरही परिणाम झाला. तिच्या पायांचा रंगही काळा पडत चालला होता. तब्येत खूप बिघडल्यावर तिला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं गेलं.

डॉक्टरांना इमर्जन्सीमध्ये एक निर्णय घ्यावा लागला. 9 जूनला त्यांनी सेविंकच्या कुटुंबियांना सांगितलं, की सेविंक ब्लड पॉयजनिंगच्या समस्येनं ग्रस्त आहे. आता तिचा जीव वाचवायचा असेल तर पाय कापण्यावाचून कुठलाच पर्याय नाही. शेवटी सेविंकचा जीव वाचवायला डॉक्टरांना तिचे पाय गुडघ्याच्या खालून कापावेच लागले.

या प्रकरणात सेविंकनं हॉस्पिटल प्रशासनाविरूद्ध तक्रार दाखल केली आहे. एक कोटी रुपये (1,77,399) ऑस्ट्रेलियन डॉलरच्या भरपाईची तिनं मागणी केली आहे. मात्र हॉस्पिटल कर्मचाऱ्यांचं म्हणणं आहे, की या प्रकरणात त्यांना दोषी ठरवणं योग्य नाही. हॉस्पिटलमध्ये दाखल होण्याच्या काही दिवस आधी आणि सर्जरीनंतर दोन आठवड्यांनी चिकन खाल्ल्यामुळे ही गोष्ट घडली. आता न्यायालयानं या प्रकरणात तज्ज्ञांकडून अहवाल मागवला आहे.

First published:

Tags: Plastic, Private hospitals, Surgery