मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

भयानक! अंत्यसंस्कार होणार इतक्यात मृतदेहाची हालचाल झाली आणि...; पुढे काय घडलं पाहा

भयानक! अंत्यसंस्कार होणार इतक्यात मृतदेहाची हालचाल झाली आणि...; पुढे काय घडलं पाहा

Alive Women

Alive Women

रुग्णालयात दाखल झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी महिलेला मृत घोषित केलं. तिच्या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्याची तयारी सुरू होती.

अर्जेंटिना, 29 जानेवारी :  एखादी व्यक्ती मृत घोषित केली जाते. त्यानंतर त्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार करण्यासाठी तयारी केली जाते आणि अंत्यसंस्कार सुरू होण्याच्या काही क्षण अगोदर ती व्यक्ती जिवंत असल्याचं दिसतं, असा प्रसंग आपण अनेकदा चित्रपटांमध्ये बघितला आहे. पण एखाद्या चित्रपटात दाखवला जाणारा असाच प्रसंग अर्जेंटिनामध्ये (Argentina) प्रत्यक्षात घडला आहे. अर्जेंटिनामध्ये डॉक्टरांनी मृत घोषित केलेली महिला जिवंत असल्याचे अंत्यसंस्कार (Cremation) करण्यापूर्वी तिच्या मुलीला समजलं.

ईशान्य अर्जेंटिनामधील रेसिटेन्सिया शहरात ही घटना घडली. येथील 89 वर्षीय महिलेच्या छातीत दुखत असल्याने तिला 23 जानेवारीला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दुसऱ्याच दिवशी रुग्णालयातील डॉक्टरांनी या महिलेस मृत घोषित केलं. तिच्या 54 वर्षीय मुलीला मृत्यूचं प्रमाणपत्र देखील देण्यात आलं. त्यात तिचा मृत्यू हार्ट अटॅकमुळे (Cardiac Arrest) झाल्याचं सांगितलं.

डेलीमेलने स्थानिक डियारो नाॅर्टे (Diaro Narto) या वृत्तपत्रातील वृत्ताचा हवाला देत म्हटलं आहे, ही महिला शनिवारपासून उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होती. दुसऱ्या दिवशी तिला भेटण्यासाठी तिची मुलगी रुग्णालयात आली असता रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी तिच्या आईला हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याचं सांगितलं.

हे वाचा -  अशक्य! विमानतळावर एक्स्ट्रा बॅगेजचे शुल्क वाचवायला त्यांनी खाल्ली 30 किलो संत्री

संबंधित महिलेचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी वेलेझ सरसफिल्ड अव्हेन्यू दफनभूमीत नेण्यात आलं. त्यानंतर तिच्या मुलीने अंत्यसंस्कारांसाठी दफनभूमीतील सेवेकरिता रक्कम अदा केली.  अंत्यसंस्काराआधी महिलेमध्ये तिच्या मुलीला जिवंत असल्याची लक्षणं दिसू लागली आणि तिनं अंत्यसंस्कार थांबवलं.

स्थानिक वेबसाईटच्या वृत्तानुसार, अंत्यसंस्कार सुरू असताना मुलीला आई जिवंत असल्याची चिन्हं दिसली. त्यामुळे मुलीने अंत्यसंस्कार थांबवण्यास सांगितलं. मुलीला काही क्षण धक्काच बसला आणि तिने नातेवाईकांशी संपर्क साधण्यास सुरुवात केली. यावेळी तिनं तिच्या नातेवाईकांना एक आॅडिओ क्लिप (Audio Clip) पाठवली, त्यात माझी आई अद्याप जिवंत असून तशी लक्षणं तिच्यामध्ये मला अंत्यसंस्काराच्यावेळी दिसून आली आहेत. त्यामुळे मी आता पुन्हा रुग्णालयात जात असल्याचं तिनं क्लिपमध्ये म्हटलं आहे.

हे वाचा - 'एलियन'सारखं दिसण्यासाठी त्यानं स्वतःचा ओठच कापून टाकला

यानंतर तिच्या आईला तातडीने रुग्णालयात नेत अतिदक्षता विभागात उपचार सुरू करण्यात आले. याप्रकरणी त्या मुलीने अहवाल देत रुग्णालय आणि स्थानिक प्रशासनाचा निषेध केला. या प्रकरणाची सखोल चौकशी केली जाईल, असं स्थानिक अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितलं.

First published:

Tags: Health, Private hospitals