जमशेदपूर, 23 नोव्हेंबर: देशात असं एक गाव आहे (A village where couples live happily in live in relationship) जिथं अनेक जोडपी ही विवाह न करता केवळ लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये आनंदानं राहत आहेत. भारतात शहरांमध्येदेखील लिव्ह-इन नात्याकडे (Live in relations as taboo) संशयाने पाहिलं जातं. अनेक भागात आजही हा टॅबू मानला जातो. मात्र देशाच्या ग्रामीण भागातील एका गावात लग्नाचं बंधन न पाळता अनेक जोडपी लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहत असल्याचं दिसतं.
अनोखी परंपरा
झारखंडमधील जमशेदपूरजवळच्या बेतालपूर गावात अनेक जोडपी लग्न न करता एकमेकांसोबत गुण्यागोविंदाने राहतात. त्यांच्या संबंधांना गावाचीदेखील मान्यता असते. अनेकदा आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळेच् ही जोडपी लग्न करू शकत नाहीत. लग्नासाठीचा खर्च परवडत नसल्यामुळेच लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहणं त्यांनी पसंत केल्याचं दिसतं.
प्रथा आणि परिस्थिती
या भागातील आदिवासी समाजात लग्नाअगोदर मुलगा आणि मुलगी यांनी एकत्र राहण्याला परवानगी आहे. त्याच परंपरेतून आलेली ही जोडपी गावात राहताना आपल्याला आवडणारी मुलगी तिच्या मान्यतेने गावात घेऊन येतात. मुलगा आणि मुलगी परस्पर संमतीनं एकमेकांची निवड करतात आणि गावातील प्रमुखांना कल्पना देऊन एकत्र संसाराला सुरुवात करतात.
लग्नाची प्रथा आहे खर्चिक
ज्यावेळी जोडप्यांना एकमेकांशी लग्न करायचं असेल,तेव्हा त्यांना मुलगा आणि मुलगी या दोन्ही गावच्या प्रमुखांची संमती घ्यावी लागते आणि पूर्ण गावाला जेवण द्यावं लागतं. त्यानंतरच कुठल्याही लग्नाला मान्यता मिळते आणि महिलांना कुंकू लावण्याची परवानगी मिळते. तोपर्यंत मुली हातात कडं घालून लिव्ह-इन रिलेशनशिपमध्येच राहतात.
हे वाचा- कुत्र्याला मिळालं नवं आयुष्य, 4 लाख रुपये खर्चून बसवले कृत्रिम पाय; पाहा VIDEO
अनेक वर्षांचं नातं
यातील काही जोडप्यांना तर लिव्ह-इन रिलेशनशिपमध्ये राहून पाच ते सहा वर्षं झाली आहेत. काहींना एक किंवा दोन मुलंदेखील झाली आहेत. मात्र आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे त्यांना विवाहाचा खर्च झेपत नाही. त्यामुळेच ही जोडपी लिव्ह-इन मध्ये राहून सहजीवनाचा आनंद घेत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Lifestyle, Marriage, Relationships