नोव्होसिबिर्स्क, 31 डिसेंबर : थोडीशीही थंडी (cold) पडली, की तिला हाडं गोठवणारी, कडाक्याची थंडी अशी विशेषणं लावत अनेकजण त्रासून जातात. अंथरुणातून बाहेर न निघता आळस करण्याचा, अंघोळ न करता तसंच बसून राहण्याचा बहाणाच जणू ही थंडी देते.
मात्र जगातल्या कमालीच्या थंड असणाऱ्या प्रदेशात काय होत असेल याचा कधी विचार केलाय? ट्विटरवर एका युजरनं शेअर केलेल्या बोलक्या छायाचित्रातून तुम्हाला याचा नेमका अंदाज येईल.
हा फोटो शेअर केलाय ओलेग (Oleg) नावाच्या ट्विटर युजरनं (twitter user). तो सैबेरियातल्या (siberia) नोव्होसिबिर्स्क या गावात राहतो. सध्या इथं तापमान आहे, -45 सेल्सियस. त्यानं शेअर केलेला फोटो अनेकांना धक्का देऊन, आश्चर्यचकित करून गेला आहे. काय आहे या फोटोमध्ये असं?
Today it's -45C (-49F) in my hometown Novodibirsk, Siberia. pic.twitter.com/EGxyrRqdE2
— Oleg (@olegsvn) December 27, 2020
या फोटोत एक फोडलेला अंडा (egg) आणि न्युडल्स (noodles) चक्क हवेतच गोठून गेलेली दिसतात. आजूबाजूला पांढराशुभ्र बर्फ पसरलेला आहे. कुणीही चिटपाखरू दिसत नाही. एकदम अधांतरी स्थिर थांबलेलं फोडलेलं अंडं आणि चमचासकट गोठलेले न्युडल्स पाहून लोकांनी एकाहून एक इंटरेस्टिंग आणि नर्मविनोदी प्रतिक्रिया ट्विटरवर नोंदवल्या आहेत.
Dear Oleg, In mumbai it's cold since last 2 days.
Cold for us = 21°
I Cant imagine temperature at your place.
— . ™ (@VasuChu) December 29, 2020
एकजण म्हणतो, या तापमानात शाळा किंवा कॉलेजात जायला निघालं तर काय होईल? माणूस गोठून जाईल ना जागेवर! दुसरा म्हणतोय, पहा आणि आपण, 17 डिग्री तापमानात अंघोळीला रामराम करतो. अनेकांना तर ही जादू असल्याचं वाटतं आहे.