मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cute VIDEO: पिटुकल्या खारीचं New Year सेलिब्रेशन, कशी पिझ्झा खातेय पाहा

Cute VIDEO: पिटुकल्या खारीचं New Year सेलिब्रेशन, कशी पिझ्झा खातेय पाहा

खार माणसांना घाबरते हे खरं आहे. मात्र एखाद्या व्यक्तीपासून धोका नाही हे जाणवलं तर ती तिच्याकडून खाण्याचे पदार्थही धीटपणे घेते.

  • Published by:  News18 Desk
न्यूयॉर्क, 31 डिसेंबर : प्राणी-पक्षी माणसांच्या भाषेत बोलू शकत नाहीत. त्यामुळे आपल्याला त्यांचं जग, त्यांच्या आवडी-निवडी, भावना यांविषयी मर्यादितच माहिती असते. मात्र त्यांच्या जगात घडणाऱ्या गोष्टी खरोखर अद्भुत असतात. असाच एक एका चिमुकल्या खारीचा व्हीडिओ (video of a squirrel) सध्या समाजमाध्यमांवर (social media) व्हायरल होतो आहे. अनेक सोशल मीडिया युजर्स या खारीवर कौतुकाचा वर्षाव करणाऱ्या कमेंट्स करत आहेत. पानगळ झालेल्या झाडावर ही खार बसली आहे. अगदी एखाद्या माणसासारखी दोन्ही चिमुकल्या हातात पिझ्झाचा तुकडा (pizza slice) धरून ती खाते आहे. खाताना ती त्यात पार बुडून गेल्याचं या 15 सेकंदांच्या व्हीडिओत दिसतं. एकही पान नसलेल्या झाडावर भर थंडीत ही खार मजेत बसली आहे. 'द सन' या माध्यमसंस्थेनं ट्विटरवर हा व्हीडिओ शेअर केला आहे.

न्यूयॉर्कच्या ब्रुकलिन पार्क (Brooklyn park, New York) इथला हा व्हीडिओ असल्याचं त्याच्या कॅप्शनमध्ये सांगितलं आहे. नव्या वर्षाचं स्वागत पिझ्झा खात करणारी ही पिटुकली खार कुणालाही आवडेल अशीच आहे.

Squirrel casually chills on a tree branch with a slice of pizza pic.twitter.com/iTepGwEjRI

— The Sun (@TheSun) December 31, 2020 प्राणी-आणि पक्ष्यांना माणसाने जीव लावला तर तेही त्या प्रेमाची आणि माणसाच्या संवेदनशील वागण्याची  ठेवतात. प्राण्यांच्या या स्वभावाचं दर्शन घडवणारे व्हीडिओज सोशल मीडियावर वेळोवेळी व्हायरल होत असतात. याउलट प्राण्यांची काहीच चूक नसताना या निष्पाप जीवांना माणसांनी दिलेला त्रास दाखवणारे व्हीडिओजही समाजमाध्यमांवर कायम पहायला मिळतात.
First published:

Tags: Pizza, Twitter, Viral video.

पुढील बातम्या