Home /News /lifestyle /

तुम्ही Online Dating साइट्सवर आहात का? सर्व्हे सांगतो असाच मिळेल आदर्श जोडीदार

तुम्ही Online Dating साइट्सवर आहात का? सर्व्हे सांगतो असाच मिळेल आदर्श जोडीदार

प्रेम प्रकरणाच्या वादातून आरोपीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

प्रेम प्रकरणाच्या वादातून आरोपीने हा प्रकार केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

भारतात डेटिंगकडे पाहण्याचा दृष्टीकोन अनेकदा थोडासा नकारात्मकच असतो. मात्र . याबाबत मत बदलणारं एक संशोधन नुकतंच समोर आलं आहे.

    बर्न , 4 जानेवारी : डेटिंग ऍप्स (dating apps) केवळ विदेशातच नव्हे तर भारतातही (India) अनेक तरुण-तरुणींसाठी 'कूल थिंग' आहेत. अनोळखी लोकांना डेट करत यामाध्यमातून नवे अनुभव घेतले जातात. या डेटिंग ऍप्सबाबत एक सकारात्मक संशोधन (research) नुकतंच समोर आलं आहे. या संशोधनानुसार, डेटिंग ऍप्सवर जोडीदार (life partner) मिळाला, तर तो जीवनात दीर्घकाळ तुमची सोबत करतो. इतकंच नाही तर प्रत्येक प्रसंगात तुमच्या सोबतही उभा राहतो. अनेक कपल्सबाबत (couples) केलेल्या सर्वेक्षणामधून (survey) ही गोष्ट समोर आली आहे. या सर्वेक्षणात स्वित्झर्लंडमधील 3,235 कपल्सला सहभागी करून घेण्यात आलं. या अभ्यासात 18 वर्षांच्या वरील लोक सहभागी झाले. हे सगळे लोक डेटिंग ऍप्सच्या माध्यमातून एकमेकांना भेटले होते. यात स्पष्ट झालं, की टिंडर किंवा बम्बल सारख्या ऍप्सवर भेटलेले हे लोक सोबत राहत एकमेकांसह अपत्याला जन्म देण्यासही उत्सुक आहेत. जिनोवा युनिव्हर्सिटीच्या डॉ. जिना यांच्या मते, तुम्ही एखाद्या डेटिंग ऍपच्या माध्यमातून आपल्या जोडीदाराला भेटता तेव्हा तुमच्या बाजूनं नातं निभावण्याचा पूर्ण प्रयत्न करता. तुम्ही तुमची डेटिंग ऍपवरची प्रोफाईलही नीट अपडेट ठेवता. टिंडरचे उच्चपदस्थ अधिकारी रोजेट पाम्बकीयन यांनी सांगितलं, 'आम्ही आमच्या ऍपच्या ब्रॅंडिंग आणि संवाद प्रक्रियेदरम्यान अशा काही टिप्स लोकांना देतो, की ज्यातून त्यांचं प्रोफाईल समोरच्यांकडून लवकर निवडलं जावं. या टिप्स यशस्वीही होताना दिसतात. आम्हाला आमच्या ग्राहकांकडून तसा फीडबॅक मिळाला आहे.' डेटिंग apps बाबत हा सर्व्हे त्यांच्याकडे पाहण्याची सामान्यांची नजर बदलणारा आहे असं मत सर्वेक्षण घेणाऱ्यांनी व्यक्त केलं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Research

    पुढील बातम्या