पृथ्वीवर सुमारे 300 ज्वालामुखी आहेत. या ज्वालामुखींवर देखरेख करणं त्यांच्या उद्रेकांवर लक्ष ठेवणे हे एक आव्हानात्मक काम आहे. एवढेच नाही तर त्या विषयी अंदाज बांधणंही सोपं नाही. जेणेकरून त्यांच्या उद्रेकापूर्वीच आपल्याला त्याची माहिती मिळू शकली असती. याव्यतिरिक्त ज्वालामुखीतून निघालेल्या वायूची मोजणी करणेदेखील अवघड आहे परंतु शास्त्रज्ञांनी आता या सर्व समस्यांवर तोडगा काढला आहे.
स्पेशल ड्रोन
नवीन अहवालात असे म्हटले आहे की वैज्ञानिकांनी एक विशेष प्रकारचं ड्रोन तयार केलं आहे. जे त्यांना पापुआ न्यू गिनीच्या ज्वालामुखींचा डेटा गोळा करण्यास मदत करणार आहे. हे ड्रोन स्थानिक लोकांना जवळचा ज्वालामुखीवर लक्ष ठेवण्यास मदत करणार आहे व भविष्यात होणाऱ्या उद्रेकांविषयी माहिती देऊन आधीच सावध करणार आहे. तसेच या ड्रोनद्वारे पृथ्वीवरील अधिक दुर्गम भागांतील ज्वालामुखी कुठले आहेत याबाबत सुद्धा माहिती मिळणार आहे.
ज्वालामुखींचा अभ्यास
ज्वालामुखीचा अंदाज देणारं ड्रोन पापुआ न्यू गिनीच्या ईशान्य किनाऱ्याजवळ दहा किलोमीटरवर ज्वालामुखी मध्ये कार्य करण्यास ठेवण्यात येणार आहेत. या ज्वालामुखी बेटावरती तब्बल 9 हजार लोक राहतात. मनाम मोटु ज्वालामुखी हा या देशातली सर्वात मोठा ज्वालामुखी आहे.
भूकंप हादऱ्यांचादेखील अंदाज सांगणार
या ड्रोनचा वापर करून वैज्ञानिक ज्वालामुखीच्या उद्रेकाचे अंदाज लावू शकतात. तसेच आजूबाजूच्या परिसरातील भूकंपांवर नजर ठेवून त्याचा हादरा कुठे बसणार आहे हे शोधू शकतात.
हे ही वाचा-VGIR 2020 : 'भारताची ताकद आणि ओळख Corona च्या साथीत जगाला पटली' - मोदी
या आधी असा अभ्यास कधीच झाला नव्हता
जेव्हा आकाश स्वच्छ असेल तेव्हा उपग्रहसुद्धा ज्वालामुखीतून होणारं उत्सर्जन ओळखू शकेल. यामुळेच त्यातून बाहेर पडणार्या सल्फरडाय ऑक्साईडसारख्या वायूचं मोजमापदेखील करणं सोपं जाईल. लंडनच्या युनिव्हर्सिटी कॉलेजमधील ज्वालामुखी तज्ज्ञ ऐमा लियू यांच्या म्हणण्यानुसार मनामचा इतका अभ्यास कधी केला गेला नव्हता परंतु उपग्रहातून मिळालेल्या आकडेवारीवरून असे दिसून येते की तो अतिशय तीव्र असलेला स्फोटक ज्वालामुखी आहे.
दोन ड्रोनची चाचणी घेण्यात आली
नुमाक्सिको युनिव्हर्सिटीचे जिओ केमिस्ट टोबियस फिशर म्हणतात की त्यांना या प्रचंड कार्बन बाहेर सोडणाऱ्या स्तोत्रातून कार्बनचं मापन करायचं आहे. ऑक्टोबर 2018 ते मे 2019 दरम्यान दोन मोहिमांमध्ये आंतरराष्ट्रीय टीमने दोन प्रकारच्या लांब पल्ल्याच्या ड्रोनची चाचणी केली हे ड्रोन गॅस सेन्सर कॅमेरा आणि इतर उपकरणांनी सुसज्ज असे होते.
ज्वालामुखी हा दूरदूरपर्यंत मानवासाठी धोकादायक आहे. ज्वालामुखीतून उच्च तापमानाच्या लाव्हारस खूप लांबपर्यंत बाहेर पडतात. त्यामुळे कधीकधी लोकांना त्यांची घरे सोडून तिथून निघावं लागतं. तसेच ज्वालामुखीतून बाहेर पडलेल्या वायूमुळे अनेक किलोमीटरपर्यंत लोकांना श्वास घेण्यास अडचण होते अशा परिस्थितीत ड्रोन याच्यावर लक्ष ठेवून ज्वालामुखीचा उद्रेक कधी होणार आहे याबाबत आधीच माहिती देऊ शकेल.