मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cancer आणि ट्यूमरच्या उपचारात एक परजीवी ठरू शकतो उपयुक्त; नवं संशोधन

Cancer आणि ट्यूमरच्या उपचारात एक परजीवी ठरू शकतो उपयुक्त; नवं संशोधन

Parasite Helpful in Cancer Treatment :  विशिष्ट प्रकारचे कर्करोग काढून टाकण्यासाठी आणि ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी आणि रुग्णांचं आयुष्य वाढवण्यासाठीदेखील (Parasite Helpful in Cancer Treatment) हे महत्त्वाचं आहे.

Parasite Helpful in Cancer Treatment : विशिष्ट प्रकारचे कर्करोग काढून टाकण्यासाठी आणि ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी आणि रुग्णांचं आयुष्य वाढवण्यासाठीदेखील (Parasite Helpful in Cancer Treatment) हे महत्त्वाचं आहे.

Parasite Helpful in Cancer Treatment : विशिष्ट प्रकारचे कर्करोग काढून टाकण्यासाठी आणि ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी आणि रुग्णांचं आयुष्य वाढवण्यासाठीदेखील (Parasite Helpful in Cancer Treatment) हे महत्त्वाचं आहे.

  • Published by:  News18 Desk

नवी दिल्ली, 08 नोव्हेंबर : कमकुवत रोगप्रतिकारशक्ती (Weak Immunity) असलेल्या लोकांच्या आणि गर्भवती महिलांच्या (Pregnant Women) खराब आरोग्यासाठी जबाबदार एक प्राणघातक परजीवी (Deadly Parasite), कर्करोग आणि अनेक प्रकारच्या ट्यूमर (ज्यामुळं कर्करोग होऊ शकतो) उपचारांमध्ये उपयुक्त ठरू शकतो. या नव्या अभ्यासाचे निष्कर्ष 'जर्नल फॉर इम्युनोथेरपी कॅन्सर'मध्ये (Journal for Immunotherapy Cancer) प्रसिद्ध झाले आहेत. हा अभ्यास यूकेमधील नॉटिंगहॅम विद्यापीठ (University of Nottingham) आणि चीनमधील निंगबो विद्यापीठ (Ningbo University) आणि शांक्सी कृषी विद्यापीठाच्या (Shanxi Agricultural University) तज्ज्ञांनी संयुक्तपणे केला आहे.

संशोधकांचं म्हणणं आहे की, हा परजीवी प्राणघातक असला तरी विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरवरील उपचारांचा प्रभाव वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. विशिष्ट प्रकारचे कर्करोग काढून टाकण्यासाठी आणि ट्यूमरची वाढ रोखण्यासाठी आणि रुग्णांचं आयुष्य वाढवण्यासाठीदेखील (Parasite Helpful in Cancer Treatment) हे महत्त्वाचं आहे.

या नवीन अभ्यासात, संशोधकांनी म्हटलंय की, जगभरात आढळणारा हा सामान्य परजीवी कोल्ड ट्यूमरच्या शरीराला हानी पोहोचवण्याच्या कार्यात अडथळा आणून त्याला कमकुवत बनवतो. या प्रकारचा ट्यूमर शरीराच्या मजबूत प्रतिकारशक्तीच्या कामात व्यत्यय आणतो. तसंच, रोगप्रतिकारक चेकपॉईंट ब्लॉकेड थेरपीवर (immune checkpoint blockade therapy) परिणाम करतो. हा अभ्यास विविध प्रकारच्या कॅन्सरच्या उपचारात उपयुक्त ठरू शकतो, असं संशोधकांचं मत आहे.

परजीवी उबदार रक्ताच्या जीवांना संक्रमित करते

तिन्ही विद्यापीठांच्या संशोधकांच्या मते, टॉक्सोप्लाझ्मा गोंडी परजीवी (toxoplasma gondii parasite) कर्करोगाच्या उपचारात उपयुक्त आहे. हा एक कोशिकीय प्रोटोझोआचा (cellular protozoa) एक प्रकार आहे, जो उबदार रक्ताच्या प्राण्यांना संक्रमित करतो. एका अंदाजानुसार, हा प्रोटोझोआ जगभरातील सुमारे एक तृतीयांश मानवी लोकसंख्येमध्ये आढळतो.

हे वाचा - भारत आणि पाकिस्तान पुन्हा एकमेकांना भिडणार, टीम इंडियाला वचपा काढण्याची संधी!

उंदरांवर प्रयोग

या अभ्यासाअंतर्गत, संशोधकांनी प्रथम वाढीच्या मर्यादित क्षमतेसह टोक्सोप्लाझ्मा गोंडीचा उत्परिवर्तित स्ट्रेन तयार केला. हा प्रयोग सेल कल्चरमध्ये (cell culture) आणि उंदरांवर करण्यात आला. हा स्ट्रेन ज्याच्या शरीरात सोडण्यात आला, त्याच्या रोगप्रतिकारक प्रणालीमध्ये बदल करण्यास सक्षम होता. उपचारात वापरण्यासाठी, संशोधकांनी हा उत्परिवर्तित परजीवी थेट ट्यूमरमध्ये इंजेक्ट केला. यामुळं केवळ घन ट्यूमरमध्ये दाहक प्रतिक्रिया निर्माण झाली नाही तर, उंदरांच्या शरीरात असलेल्या ट्यूमरवर देखील परिणाम झाला. या प्रक्रियेत ट्यूमरवरील उपचार अधिक प्रभावी झाल्याचंही त्यांना आढळून आलं. यासह, रोगप्रतिकारक चेकपॉईंट इनहिबिटरवर (immune checkpoint inhibitor) देखील सकारात्मक प्रभाव दिसून आला. त्याच वेळी, कर्करोगाच्या ट्यूमरची वाढ कमी झाली आणि त्या उंदरांचं आयुर्मानदेखील वाढलं.

हे वाचा - न्यूझीलंडच्या ‘या’ अपयशी कामगिरीमुळे विराटसेनेचा सेमीफायनलमध्ये पोहचण्याचा मार्ग मोकळाच

तज्ज्ञ काय म्हणतात

नॉटिंगहॅम विद्यापीठातील पशुवैद्यकीय औषध आणि विज्ञान विद्यालयातील (School of Veterinary Medicine and Science) सहयोगी प्राध्यापक आणि संशोधनाच्या प्रमुख लेखक डॉ. हॅनी एलशेखा (Dr Hany Elsheikha) म्हणाल्या की, टॉक्सोप्लाझ्मा गोंडीचे उत्परिवर्तित स्ट्रेन उंदरांच्या मॉडेल्समध्ये याआधीही वापरला होता. उपचारांमध्ये त्याचा वापर करण्याबाबत चर्चा झाली आहे. मात्र आता या नव्या प्रयोगामुळं ट्यूमरच्या आत टोचलेल्या या स्ट्रेनमुळे ट्यूमर-विरोधी प्रतिकारशक्ती मजबूत झाली आणि चेकपॉईंट इनहिबिशन थेरपीमध्ये देखील प्रभावी असल्याचं दिसून आलं. याचा वापर विशिष्ट प्रकारच्या ट्यूमरमध्ये केला जाऊ शकतो.

First published:

Tags: Cancer, Health Tips