इंफाळ, 7 जानेवारी : हवेतून पाणी निर्माण करणारं एक अनोखं यंत्र मणिपूरमध्ये राहणाऱ्या एका 9 वर्षांच्या मुलीनं तयार केलं आहे. इतक्या कमी वयातच तिनं दाखवलेली बुद्धीची चमक वाहवा मिळवते आहे. लिसीप्रिया कांगुजाम (Licypriya Kangujam) ही 9 वर्षांची मुलगी मणीपूरमध्ये राहते. ती पर्यावरण चळवळीतील कार्यकर्तीही (environment activist) आहे. तिनं तयार केलेल्या यंत्राच्या (machine) माध्यमातून हवेपासून पाणी तयार करता येतं.
कंगुजम हे सौर ऊर्जेच्या (solar energy) माध्यमातून साध्य करते. या चिमुरड्या कार्यकर्तीचं म्हणणं आहे, की या प्रयोगाच्या माध्यमातून जगभरातील पाण्याचा प्रश्न सोडवला जाऊ शकतो. या यंत्राचं नाव तिनं सुकीफू - 2 (Sukifu - 2)असं ठेवलं आहे. ती सांगते, की हे यंत्र कुठंही वापरलं जाऊ शकतं. तिचं यंत्र एका तासात 150 मिलिलिटर पाणी तयार करू शकतं. एक लीटर पाणी तयार करायला या यंत्राला 7 ते 8 तास वेळ लागतो.
या कार्यकर्तीचं हेसुद्धा म्हणणं आहे, की या यंत्राची उत्पादनक्षमता अनेक गोष्टींवर अवलंबून आहे. या यंत्राच्या माध्यमातून दिवसभरात 1 गॅलन शुद्ध पाणीही तयार केलं जाऊ शकतं. या यंत्राचा योग्य वापर केला तर जगात कुठंच पाणीटंचाई जाणवणार नाही. सोशल मीडियावरही कंगुजमच्या प्रयोगाची खूप चर्चा आहे. लोक तिचं भरभरून कौतुक करत आहेत.
भारतासह जगभरात जागतिक तापमानवाढीमुळे (global warming) पाण्याचं संकट आता उग्र रूप धारण करत आहे. नीती आयोगानं दिलेल्या अहवालानुसार भारतातील 60 कोटी लोकांना पाण्याच्या टंचाईला तोंड द्यावं लागणार आहे. या अहवालात हेसुद्धा म्हटलं आहे, की भारत पाण्याच्या ग्लोबल इंडेक्समध्ये 122 देशांमध्ये 120 व्या क्रमांकावर आहे. येत्या काही वर्षांतच गुडगावसोबत भारताच्या प्रमुख 21 शहरांमध्ये शुद्ध पाण्याची टंचाई जाणवेल.
Published by:News18 Desk
First published:
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.