S M L

लग्न असावं तर असं...!

Samruddha Bhambure | Updated On: May 15, 2017 05:36 PM IST

लग्न असावं तर असं...!

15 मे : लग्नाचा मौसम आहे, तेव्हा रोज आपल्याला सोशल मीडियावर काहीना काही नवं पाहायला मिळतंय. काही दिवसांपूर्वीच बोल्ड आणि ब्युटिफुल नववधूचा व्हिडिओ तुफान व्हायरल झाला होता. नेटिझन्सच्या डोक्यावरून हा फिव्हर उतरत नाही तोच फेसबुकवर आणखी एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ मागच्या वर्षीचा आहे. पण सध्याच्या हटके वेडिंग थिमच्या जमान्यात एकदम हिट आहे.

प्रत्येकाला वाटतं की, आपलं लग्न हे सगळ्यांपेक्षा हटके असावं. लोकांच्या लक्षात राहील आणि त्यानंतर किमान पुढचे काही वर्षं तरी आपल्या लग्नाची चर्चा असावी, असं आज काल सगळ्याच जोडप्यांना वाटत असतं. पण लग्नात सगळ्यात महत्त्वाचं असतं ते प्रेम, ओढ आणि विश्वास...


'मिथ-आली' म्हणजे मिताली आणि अली... आणि त्यांच्यासारखी त्यांची हटके प्रेम कहाणी. खरं प्रेम हे कुठल्याही धर्माच्या पलीकडे असतं हे त्या दोघांनीही सगळ्यांना दाखवलं. तुम्हीही त्यांना भेटलात तर तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटल्यासारखं तुम्हाला वाटणारच नाही, मस्त... बिंदास्त... आयुष्यातला प्रत्येक क्षण जगणारे हे दोघे, आणि त्यांची अनोखी प्रेम कहाणी...

सोशल मीडियावर सध्या हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत आहे. तुम्हालाही तुमच्या लग्नात काही हटके करायचं असेल तर हा व्हिडिओ नक्की पाहा

Loading...

(फोटो/व्हिडिओ कर्टसी : वेडिंगनामा)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: May 15, 2017 05:30 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close