मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यानं जग सोडून जाताना 7 जणांना दिलं नवं आयुष्य! सुरत, चेन्नई ते युक्रेन, रशियापर्यंत राहणार आठवण

अवघ्या अडीच वर्षांच्या चिमुकल्यानं जग सोडून जाताना 7 जणांना दिलं नवं आयुष्य! सुरत, चेन्नई ते युक्रेन, रशियापर्यंत राहणार आठवण

शेजाऱ्यांकडे खेळायला गेलेला अडीच वर्षांचा जश अचानक तोल जाऊन बाल्कनीतून पडला. डॉक्टांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याच्या पालकांनी एक मोठा निर्णय घेत चिमुरड्या जशची आठवण जगभरात काढली जाईल अशी व्यवस्था केली.

शेजाऱ्यांकडे खेळायला गेलेला अडीच वर्षांचा जश अचानक तोल जाऊन बाल्कनीतून पडला. डॉक्टांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याच्या पालकांनी एक मोठा निर्णय घेत चिमुरड्या जशची आठवण जगभरात काढली जाईल अशी व्यवस्था केली.

शेजाऱ्यांकडे खेळायला गेलेला अडीच वर्षांचा जश अचानक तोल जाऊन बाल्कनीतून पडला. डॉक्टांनी ब्रेन डेड घोषित केल्यानंतर त्याच्या पालकांनी एक मोठा निर्णय घेत चिमुरड्या जशची आठवण जगभरात काढली जाईल अशी व्यवस्था केली.

सुरत, 17 डिसेंबर : अवयवदानाबाबत (organ donation) मोठी जागृती होत असल्याने माणुसकीला जागवणाऱ्या अशा घटना वाढल्याचे बघायला मिळत आहे. अशीच एक डोळे ओलावतानाच चेहऱ्यावर हसू आणणारी घटना सुरतमध्ये (Surat) समोर आली आहे.

एक अवघा अडीच वर्षांचा चिमुरडा अपघात झाल्याने ब्रेन डेड (brain dead) झाला. मात्र स्वतःचं आयुष्य संपलेलं असतानाही त्यानं आपल्यासारख्याच सात जणांना जीवनदान दिलं. यातली दोन बाळं तर अनुक्रमे रशिया आणि युक्रेनमधली आहेत.

बाळ ब्रेन झाल्याचं कळल्यानंतर त्या धक्क्यातून स्वतःला सावरत त्याच्या पालकांनी आपल्या बाळाचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला. बाळाचं हृदय रशियातील 4 वर्षांच्या एका बाळात प्रत्यारोपित करण्यात आलं असून त्याची फुफ्फुसं चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलमध्ये एका युक्रेन इथल्या बाळाच्या शरीरात मंगळवारी प्रत्यारोपित करण्यात आली.

covid -19 च्या काळात सुरत शहरात घडलेलं हे दुसरं अवयवदान आहे. 9 डिसेंबरला सुरतच्या भातर भागातील रहिवासी जश संजीव ओझा हा अडीच वर्षांचा मुलगा आपल्या शेजारच्या घरात खेळायला गेला होता. दुसऱ्या मजल्यावरच्या फ्लॅटच्या बाल्कनीत खेळता खेळता त्याचा अचानक तोल गेला आणि काही कळायच्या आत तो पडला. त्यांना लगोलग अमृता हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. तिथे काही दिवस उपचार घेतल्यानंतर 14 डिसेंबरला डॉक्टरांनी त्याला ब्रेन डेड घोषित केलं.

निलेश मांडलेवाला हे सुरतच्या डोनेट लाईफ या एनजीओचे अध्यक्ष आहेत. अमृता  हॉस्पिटलमध्ये जात त्यांनी जशचे वडील आणि पत्रकार संजीव ओझा यांचं मन वळवलं. आपल्या मुलाच्या मृत्यूनंतरही त्याची आठवण जगभरात जागती ठेवण्यासाठी संजीव यांनी मोठा निर्णय घेतला. त्यांच्या निर्णयामुळे जगभरातल्या 7 जणांना नवं आयुष्य मिळालं.

आता जश बाळाचे अवयव गरजू व्यक्तींपर्यंत पोहोचवण्याची धावपळ सुरू झाली. त्याचं हृदय आणि फुफ्फुसं हवाई मार्गाने थेट चेन्नईच्या एमजीएम हॉस्पिटलला नेण्यात आली. जशचं हृदय चार वर्षांच्या रशियन बाळाला तर फुफ्फुसं दुसऱ्या चार वर्षांच्या युक्रेन इथल्या बाळाला बसवली गेली. दोन्ही मुलांवर चेन्नई हॉस्पिटलमध्ये गेल्या वर्षांपासून उपचार सुरू होते.

जशच्या किडन्या सुरेंद्रनगर इथल्या 13 वर्षांच्या मुलीला आणि सुरतेच्या 17 वर्षीय मुलीला दिल्या गेल्या. 'इन्सि्टट्यूट ऑफ किडनी डिसीज अँड रिसर्च सेंटर, अहमदाबाद'च्या माध्यमातून हे करण्यात आलं. याच संस्थेत एका दोनवर्षीय मुलाला यकृत दिलं गेलं. ब्रेन डेड बाळाचे कॉर्नियाज अर्थात डोळ्याच्या बाहुलीचा पारदर्शक पडदा सुरतच्या लोक दृष्टी चक्षू बँकेला दान दिला गेला.

First published:

Tags: Chennai, Organ donation, Surat