Bold भारतीय मॉडेलचा जलवा! पन्नासाव्या वर्षी सुरू केलं करिअर, एका धाडसाची कहाणी

Bold भारतीय मॉडेलचा जलवा! पन्नासाव्या वर्षी सुरू केलं करिअर, एका धाडसाची कहाणी

महिलांना सतत वयानुसार विविध गटात विभागलं जातं. या महिलेनं मात्र या विभागणीला बाद ठरवत आपलं टॅलेंट समोर आणलं आहे.

  • Share this:

मुंबई, 12 जानेवारी : मॉडेल म्हणलं, की आपल्या डोळ्यांसमोर येते ती अगदी कोवळ्या वयातली, परफेक्ट स्लिमट्रिम फिगर असलेली ललना. या सगळ्या रूढ धारणांना यशस्वीपणे ब्रेक देत ही पन्नाशीतली मॉडेल सध्या सोशल मीडियावर (social media) आपली जादू दाखववते आहे.

जे. गीता नावाच्या या मॉडेलची (model) गोष्ट 'ह्युमन्स ऑफ बॉम्बे' (Humans of Bombay) या सोशल मीडिया पेजनं प्रकाशित केली आहे. तिचा अनुभव महिलांसह पुरुषांसाठीही प्रेरक आहे.

मी अगदी चिमुरडी मुलगी होते तेव्हापासून मॉडेल व्हायचं स्वप्न पाहिलं. शिवाय मी होतेसुद्धा अगदीच गोड परीसारखी. त्यामुळं लोक म्हणायचे, 'तू ना मॉडेलिंग कर, सिनेमात जा!' पण तो सगळा काळ असा बंदिस्त होता, की मुलींनी घरात बसणं आदर्श मानलं जायचं. आणि त्यांना कुठलं काम बाहेर जात करायचंच असेल, तर त्यांनी 'प्रतिष्ठित' नोकरी करावी असं सांगितलं जाई.

मी नाटकांमध्ये काम शोधण्याचा प्रयत्न करायचे. परवीन बाबी आणि झीनत अमान (Zeenat Aman) माझ्या आदर्श होत्या. एका गुजराती सिनेमात (Gujarati Movie) काम करण्याची ऑफरही मला मिळाली होती. मात्र वडिलांनी बजावलं, 'चांगल्या घरच्या मुली हे सगळं करत नाहीत.' मला एकदम बंड नव्हतं करायचं. मी तात्पुरता माझ्या स्वप्नांचा पाठलाग सोडून दिला. मी पदवी मिळवली. पदव्युत्तर शिक्षणही पूर्ण करत एक चांगली अधिकारपदावरची नोकरी मिळवली. मग मला माझा जोडीदार मिळाला. आम्ही प्रेमात पडून लग्न (Marriage) केलं. मी नोकरी सोडत संसारात

रमले.

तबब्ल 20 वर्ष संसार मुलं-बाळं यांच्याभवतीच फिरत राहिली. मात्र मग मी शिक्षिकेची नोकरी पकडली. मात्र मी होते पंचेचाळिशीची. त्या संस्थेला तरुण शिक्षक पाहिजे होते. मी मात्र सगळ्या निकषांना  ठरवत नोकरी केली आणि 'मोस्ट ऍक्टिव्ह टीचर'चा अवॉर्डही मिळवला.

एकदा ऑनलाईन सर्फ करत असताना मला एका सौंदर्यस्पर्धेबाबत (Beauty pageant) माहिती मिळाली. ती जाहिरात म्हणत होती, 'एज नो बार'. बस्स, मला हवं ते अचानक सापडलं होतं. मी लगेचच अर्ज केला. त्याच संध्याकाळी मी कुटुंबियांनाही सांगितलं, की मी यात सहभागी होणार आहे. त्यांनी मनापासून पाठिंबा दिला.

मी स्वतःवर खूप कष्ट घेतले. आणि 'फर्स्ट रनर अप'चा सन्मान मिळवला. अजून एका दुसऱ्याही स्पर्धेत भाग घेत तीसुद्धा जिंकले. आता माझ्या मॉडेलिंगसाठी एक मस्त प्रोफाईल तयार झालं

होतं.

मात्र बहुतांश ब्रँड्सना (Brands) तरुण मॉडेल्स पाहिजे होत्या. मी होते पन्नास वर्षांची. लॉन्जरी अर्थात अंतर्वस्त्रांच्या मॉडेल्सही खूप तरुण वयोगटातल्या असतात हे माझ्या लक्षात आलं. अर्थात, प्लस साईज सेक्शन होता, पण प्रौढ महिलांसाठी मात्र काहीच नव्हतं तिथं. मग एका स्ट्रार्टअपनं माझ्याशी संपर्क केला. पण त्यांची ऑफर कॉटन ब्रा साठी होती. जणू काही पन्नाशीतल्या महिलांना लेसच्या फॅन्सी ब्रा आवडतच नाहीत!

मग मीच स्वतः एक शूट करवून घेतलं. लेसच्या आकर्षक लॉन्जरीमध्ये. आणि ते सोशल मीडियावर ऑनलाईन पोस्ट केलं. लोकांचा धो धो प्रतिसाद थक्क करणारा होता. अनेकांनी माझ्या आत्मविश्वासाला दाद दिली. अर्थात, काहीजणांची बोचरी टीकाही सहन करावी लागलीच. पण मी त्याकडं लक्ष देत नाही.

मी पंधराव्या वर्षी पाहिलेलं स्वप्न पन्नासाव्या यावर्षी सत्यात उतरवलं. वय, एज, इज नॉट अ केज. सपनोंकी कोई एक्सपायरी डेट नहीं होती!' हेच मला हरेकाला सांगायचं आहे.

Published by: News18 Desk
First published: January 12, 2021, 8:57 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading