90 वर्षांच्या आजींनी घेतली जगातील पहिली कोरोना लस; वाढदिवसाआधीच मिळालं मोठं गिफ्ट
पुढच्या आठवड्यात या आजी आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. आपल्याला मिळालेली जगातील पहिली कोरोना (corona vaccine) लस हे आपल्यासाठी सर्वात मोठं बर्थ डे गिफ्ट असल्याचं त्या म्हणाल्या.
ब्रिटन, 08 डिसेंबर : भारतात कुणाला पहिली कोरोना लस (corona vaccine) मिळणार याची प्रतीक्षा आहेच. मात्र 90 वर्षांच्या आजींनी (90 year old grandmother) जगातील पहिली कोरोना लस (covid 19 vaccine) घेतली आहे. ब्रिटनमध्ये (britain) फायझर (pfizer) आणि बायोएनटेकच्या (biontech) कोरोना लशीचं आपात्कालीन वापर सुरू करण्यात आलं आहे. 90 वर्षांच्या मार्गारेट किनान (Margaret Keenan) यांनी जगातील पहिली कोरोना लस घेतली आहे.
ब्रिटनमध्ये फायझरच्या कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी देण्यात आली आहे. आजपासून लशीकरण सुरू झालं आहे. मार्गारेट किनान यांना पहिली लस देण्यात आली. सेंट्रल इंग्लंडच्या कॉन्वेंट्री शहरातील रुग्णालयात त्यांचा लशीचा डोस देण्यात आला आहे. मंगळवारी सकाळी साडेसहा वाजता त्यांनी लस घेतली.
Margaret Keenan, a 90-year-old grandmother from Britain, has become the first person in the world to receive the Pfizer COVID-19 vaccine outside of a trial following its rapid clinical approval https://t.co/s0RxsBkDKjpic.twitter.com/kIm3DEUJyn
विशेष म्हणजे मार्गारेट पुढच्या आठवड्यात आपला वाढदिवस साजरा करणार आहेत. त्यामुळे वाढदिवसाआधीच कोरोना लस ही त्यांच्यासाठी सर्वात मोठं बर्थ डे गिफ्ट ठरलं आहे.
"कोरोनाची लस घेणारी मी पहिली व्यक्ती ठरली याचा खूप आनंद वाटतोय. वाढदिवसाच्या आधीच मिळालेला मला हे सर्वात मोठं गिफ्ट आहे. कारण आता मी माझे मित्र-मैत्रिणी, कुटुंबासोबत पुढील वेळ घालवू शकते. स्वतःसाठी जास्तीत जास्त वेळ देऊ शकते", असं त्या म्हणाल्या.
यूएसमधील फायझर आणि जपानमधील बायोटेएनटेकनं ही लस विकसित केली आहे. ही लस 95% प्रभावी असल्याचा दावा कंपनीनं केला आहे. तिसऱ्या टप्प्यातील चाचणीच्या अहवालावरून लशीची सुरक्षितता सांगण्यात आली. हा अहवाल जारी होताच फक्त 23 दिवसांच यूकेनं आपात्कालीन वापराला परवानगी दिली आहे. ब्रिटनच्या मेडिसीन अँड हेल्थकेअर प्रोडक्ट रेग्युलेटरी एजन्सीनं (MHRA) या लशीला मंजुरी दिली आहे. कोरोना लशीला आपात्कालीन मंजुरी देणारा यूके पहिला देश ठरला आहे. वयस्कर व्यक्ती आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना यामध्ये प्राधान्य दिलं जातं आहे.
ब्रिटन आणि बहारिन या दोन देशांनी फायझरच्या कोविड-19 लशीच्या आपात्कालीन वापराला मंजुरी दिली आहे.फायझरनं भारतातही या लशीच्या वापरासाठी वापरण्यासाठी परवानगी मागितली आहे. ड्रग्ज कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडे (DCGI) यासाठी अर्ज करण्यात आला आहे. फायझरच्या या प्रस्तावातील कार्य पद्धतीचा विचार करण्यासाठी या आठवड्यात ‘डिसीजीआय’ने (DCGI) स्थापन केलेली तज्ज्ञांची समिती चर्चा करण्याची अपेक्षा आहे.