बँकॉक, 15 डिसेंबर : बाथरूममध्ये (bathroom) गेल्यावर एखादं झुरळ किंवा पाल जरी दिसली तरी कित्येकांना घाम फुटतो. या छोट्याशा किटकांचीहीदेखील अनेकांना भीती वाटते. मग विचार करा जर एखाद्या टॉयलेटमध्ये झुरळ, पाल नव्हे तर भलामोठा अजगर असेल तर. फक्त वाचूनच काळजात धडकी भरली ना? मात्र थायलंडमध्ये (Thailand) एका व्यक्तीनं याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. टॉयलेटमध्ये गेला असता छत तोडून एक भलामोठा अजगर (python) आला आणि त्यानंतर नेमकं काय झालं त्याचा व्हिडीओ (video) सध्या सोशल मीडियावर (social media) व्हायरल (viral) होतो आहे.
थायलंडच्या फिटशनूलोक शहरातील एका रेस्टॉरटमधील ही घटना. या घटनेनं खळबळ उडाली. रेस्टॉरंटमध्ये काम करणारा कर्मचारी बाथरूममध्ये गेला. नोप पोविन असं या कर्मचाऱ्याचं नाव. नोपनं बाथरूमचा दरवाजा उघडला आणि त्याला मोठा धक्काच बसला. त्याने काय कुणीच स्वप्नात कल्पना केली नसेलं असं त्याला प्रत्यक्षात दिसलं. त्याच्यासमोर एक भलामोठा अजगर होता. व्हिडीओ पाहून तुम्हीही थक्क व्हाल.
द सनच्या रिपोर्टनुसार ही घटना शुक्रवारची आहे. नोप जेव्हा बाथमरूममध्ये गेला तेव्हा त्याला बाथरूमचं छत तोडून एक अजगर आलेला दिसला. हा अजगर छताला लटकत होता. जवळपास 8 फूट लांबीचा हा अजगर आहे. अजगर आपल्यासाठी शिकार शोधत होता. पोविननं त्याचा व्हिडीओ बनवला. अजगराला आपल्या कॅमेऱ्यात कैद केलं आणि हा व्हिडीओ सोशल मीडियावरही शेअर केला.
काही वेळ हा अजगर असाच लटकत होता. त्याला आपली शिकार काही सापडली नाही. मग तो पुन्हा त्या छताच्या आत गेला. यानंतर पोविननं पोलीस आणि रेस्क्यू टिमला याची माहिती दिली. अजगराचा शोध घेण्यात आला मात्र तो काही सापडला नाही. मात्र तिथून काही अंतरावर दूर एका अजगराला पकडण्यात आला. रेस्टॉरंटमध्ये जो अजगर होता कदाचित तोच हा अजगर असावा अशी मानलं जातं आहे.