गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या छोट्या जान्हवीची 'बडी बात'; अवघ्या 55 सेकंदाच्या VIDEO तून दिला आयुष्याचा धडा

गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या छोट्या जान्हवीची 'बडी बात'; अवघ्या 55 सेकंदाच्या VIDEO तून दिला आयुष्याचा धडा

8 वर्षांच्या चिमुकलीचा हा व्हिडीओ तुम्ही एकदाच पाहाल, तर तुमची आयुष्यातील सर्व दु:ख, वेदना विसरून जाल.

  • Share this:

मुंबई, 18 जून : सुख-दु:ख प्रत्येकाच्या आयुष्यात असते. पण प्रत्येकाला आपलंच दुःख सर्वात मोठं आहे असं वाटतं. देवाने सर्व दुःख, यातना, समस्या आपल्याच पदरात का टाकल्या आहेत, असं म्हणत बहुतेक जण देवाला दोष देत राहतात. पण सध्या सोशल मीडियावर (Social media) गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या एका चिमुकल्या मुलीचा व्हिडीओ व्हायरल (Child video viral) होतो आहे. जो पाहिला तर तुम्हाला तुमचं दु:ख खूपच लहान वाटू लागेल. तुम्ही तुमचं दुःख, वेदना सर्व विसरून जाल (Little girl video).

कोरोना काळात कोरोना वॉरिअर्सचं खूप कौतुक केलं जात आहे. अशात अवघ्या 8 वर्षांची जान्हवी गुप्ताही (Janhvi Gupta) कोणत्या योद्धापेक्षा कमी नाही. गंभीर आजाराशी झुंज देणाऱ्या जान्हवीने अवघ्या 55 सेकंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यात तिने आयुष्याचा मोठा धडा दिला आहे.

जान्हवीला सेरेब्रल पाल्सी (Cerebral Palsy) आहे. एवढ्याशा जान्हवीला आपल्या आजाराबाबत पूर्णपणे माहिती आहे. पण तरी ती त्याला धीराने तोंड देते आहे.या आजाराला आपली कमजोरी नाही समजत तर आपली ताकद समजते. आपला आजारआपल्याला कमजोर बनवू शकत नाही, आपल्याला आयुष्याचा आनंद लुटण्यपासून रोखू शकत नाही, हेच तिने दाखवून दिलं आहे

हे वाचा - VIDEO : तुम्हाला तरी माहिती आहे का? कोरोनाचा इतिहास, वर्तमान सांगतेय ही चिमुरडी

जान्हवी या व्हिडीओत म्हणते. जान्हवी म्हणते, मी एक सीपी वॉरिअर आहे म्हणजे सेरेब्रल पाल्सीने  (Cerebral Palsy) ग्रसित आहे. या आजारात आमच्या मेंदू आणि शरीरात काही डिफेक्ट येतात. सामान्य मुलं जे करू शकतात ते आम्ही नाही करू शकत असं नाही. आम्हीसुद्धा ते करू शकतो. आम्ही नाचू शकतो, आम्ही गाऊ शकतो, आम्ही चित्र काढू शकतो. आम्ही ते सर्वकाही करू शकतो पण आमच्याजवळ धीर असालया हवा. आम्हाला बिचारं समजू नका.

आशु विशु शो या युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. जान्हवी स्वतः हे युट्यूब चॅनेल चालवते. अनेकांना जान्हवीचा हा व्हिडीओ खूप आवडला आहे. जान्हवीचा हा व्हिडीओ पाहून सर्वजण भावुक झाले आहेत. तर काहींसाठी हा व्हिडीओ प्रेरणादायी ठरला आहे.

हे वाचा - OMG! लग्नाच्या दिवशी नवरीचे भलतेच चाळे, नवरा शॉक; नववधूच्या प्रतापाचा VIDEO पाहा

आपण अगदी छोट्या-छोट्या गोष्टींमुळेही खचतो, आयुष्यातील किती तरी लढाई लढण्याआधीच हार मानतो. काही जण तर आयुष्याला कंटाळून अगदी टोकाचं पाऊलही उचलतात. पण या चिमुकलीच्या व्हिडीओमुळे अनेकांना प्रेरणा मिळाली असेल. जगण्याची एक आशा, उमेद निर्माण झाली आहे. आयुष्याकडे सकारात्कपणे पाहण्याची एक दृष्टी नक्कीच मिळाली असेल.

Published by: Priya Lad
First published: June 18, 2021, 9:39 PM IST

ताज्या बातम्या