Home /News /lifestyle /

'मी माझं काळीज देते पण माझ्या लेकाला वाचवा', मुलाच्या जीवासाठी आईने पसरला पदर

'मी माझं काळीज देते पण माझ्या लेकाला वाचवा', मुलाच्या जीवासाठी आईने पसरला पदर

कॅन्सरशी झुंज देणाऱ्या लेकाला वाचवण्यासाठी आईची धडपड सुरू झाली आहे.

    जयपूर, 26 जून : प्रत्येक आईचा जीव तिच्या मुलांमध्ये अडकलेला असतो. मुलावर कोणतंही कितीही मोठं संकट येऊ दे आपल्या मुलांसमोर ती ढाल बनून उभी राहते आणि भल्याभल्यांचा सामना करू शकते. वेळ पडली तर ती स्वतःचा जीवही धोक्यात घालू शकते. सध्या अशाच एका आईची आपल्या लेकाला वाचवण्यासाठी धडपड सुरू आहे. कॅन्सरशी (Cancer) झुंज देणाऱ्या आपल्या मुलाला वाचवण्यासाठी आईने आर्थिक मदतीसाठी लोकांसमोर आपला पदर पसरला आहे. राजस्थानच्या (Rajasthan) जोधपूरमध्ये (Jodhpur) राहणारा 8 वर्षांचा शुभम लखारा. याला लिव्हर कॅन्सर (Liver cancer) म्हणजे यकृताचा कर्करोग आहे. सहा महिन्यांपासून त्याच्यावर एम्समध्ये उपचार घेतो आहे. त्याला वाचवण्यासाठी अखेर लिव्हर ट्रान्सप्लांट (Liver transplant) म्हणजे यकृत प्रत्यारोपण शेवटचा पर्यायअसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. हे वाचा - या सुकामेव्यात आहे कॅन्सरला दूर ठेवण्याचे गुण; आहेत अगणित फायदे शुभमचे वडील अर्जुन यांनी सांगितलं की, शुभमच्या पोटात दुखत होतं. म्हणून जानेवारी 2021  मध्ये त्याला एम्समध्ये नेलं. तर तपासणीत त्याच्या यकृतात कॅन्सरची गाठ असल्याचं समजलं. यकृत गाठणं हाच शेवटचा उपाय आहे, असं डॉक्टरांनी सांगितलं. यासाठी यकृत आणि ऑपरेशनसाठी जवळपास 30 लाख रुपयांची गरज आहे. शुभमची आई दुर्गा देवी आपल्या लेकाला वाचवण्यासाठी आपलं यकृत देणार आहे. पण शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या खर्चाचा प्रश्न मात्र कायम आहे. शुभमचे वडील अर्जुन एका ठेल्यावर काम करतात. ज्यावर त्यांचं घर चालतं. फक्त उदरनिर्वाहाचा प्रश्नच कसाबसा भागतो. त्यामुळे ऑपरेशनचा इतका खर्च त्यांच्या आवाक्याबाहेरचा आहे. हे वाचा - कोरोना काळात महिलांमध्ये वाढल्या पाळीच्या समस्या; लक्षणं दिसली तर दुर्लक्ष नको दैनिक भास्करच्या रिपोर्टनुसार या कुटुंबाला काही लोकांनी त्यांना मदत केली आहे. पण जितके पैसे हवेत तितके नाही मिळाले आहेत. आतापर्यंत सरकारी मदत मिळाली नसल्याचं सांगितलं. फक्त आश्वासनं मिळाली आहेत, असं शुभमच्या पालकांनी सांगितलं. त्यासाठी त्यांनी मदतीचं आवाहन केलं आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Cancer, Health, Operation, Surgery

    पुढील बातम्या