• Home
  • »
  • News
  • »
  • lifestyle
  • »
  • मुंबईतील तब्बल 60 वर्षे जुन्या फ्लाइंग वडापावची जोरदार चर्चा, VIDEO पाहून अवाक व्हाल!

मुंबईतील तब्बल 60 वर्षे जुन्या फ्लाइंग वडापावची जोरदार चर्चा, VIDEO पाहून अवाक व्हाल!

वडा पाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. पण फ्लाइंग वडापाव तुम्ही कधी पाहिला आहे का?

  • Share this:
मुंबई, 23 मार्च : अलीकडेच तुम्ही रस्त्याच्या कडेला असलेल्या खाद्यपदार्थांमध्ये  म्हणजेच स्ट्रीट फूडमध्ये उडणारा गरमागरम आणि ताजा डोसा व्हायरल झालेला व्हिडिओ पाहिला असेल आणि पण आता आणखी एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे तो म्हणजे मुंबईतील बोरा बाजार रस्त्यावरून उडणारा वडा पाव.. ही व्हायरल झालेली व्हिडिओ क्लिप रघू डोसा वाला नावाच्या 60 वर्षे जुन्या खाद्यपदार्थांच्या स्टॉलची आहे. वडा पाव म्हणजे मुंबईकरांचा जीव की प्राण. उकळत्या तेलातून निघालेला गरमागरम वडा, हिरवी आणि लाल कोरडी चटणी लावलेल्या पावात ठेवून त्याचा आस्वाद घेणं म्हणजे सर्वकाही मिळविल्याची भावना येते. या रघु स्टॉलवर डोसा, इडली वडा, चीज, मसाला वडा पाव असे विविध स्नॅक्स सर्व्ह केले जातात. व्हायरल झालेला हा व्हिडिओ आमची मुंबई नावाच्या एका फूड ब्लॉगरने यूट्यूबवर पोस्ट केला असून या व्हिडिओला आतापर्यंत 2,71,654 व्ह्यूज मिळाले आहेत. व्हिडिओमध्ये शेफ तव्यातील पॅनमध्ये बटरचा संपूर्ण ब्लॉक घालून मसाला वडा पाव बनवताना दिसत आहे, मसाल्यात पाव तळून तो एका बाजूला लांब चमचा घेऊन हवेत वडा उडवताना दिसतो आणि दुस-या हाताने वडा पकडतो.नत्याची वडापाव पकडण्याची कला अगदीच वाखाणण्याजोगी आहे. हे ही वाचा-क्या बात है! आखूड शेपटी लांब करण्यासाठी पोपटाची धडपड, VIDEO पाहून व्हाल थक्क व्हिडिओमध्ये ब्लॉगर या स्टॉलचं कौतुक करताना म्हणतो  की, 'रघू डोसा वाला' खाद्यपदार्थांचा स्टॉल हे एक छुपे रत्न आहे आणि त्याचे सर्वात खास पदार्थ म्हणजे चीज वडा पाव आणि मसाला वडा पाव. प्रत्येक डिश 40 रुपयांना विकली जाते. "या ठिकाणाची अनोखी गोष्ट म्हणजे ते ज्या शैलीत वडापाव तयार करतात आणि विक्रेता आपल्या लांब चमच्याचा वापर करून हवेत वडा उडवतो आणि मग एका हाताने पकडतो. ही संपूर्ण प्रक्रिया पाहण्यात मजा येते आणि या वडा पावची चव चीज आणि बटरसह अत्यंत स्वादिष्ट आहे." दरम्यान, वडापाव बनवण्याच्या या अनोखी पद्धत पाहून अनेकजणांना आश्चर्य वाटतंय. खरंतर अशा युक्त्या लोकांना मनोरंजक वाटतात.
Published by:Meenal Gangurde
First published: