मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /Menopause नंतरही रोमान्स सोडला नाही म्हणून वाचला जीव; 52 वर्षांच्या महिलेचा दावा

Menopause नंतरही रोमान्स सोडला नाही म्हणून वाचला जीव; 52 वर्षांच्या महिलेचा दावा

फोटो सौजन्य - SWNS

फोटो सौजन्य - SWNS

वयाच्या पन्नाशीनंतरही शारीरिक संबंध ठेवल्याने आपला जीव वाचला असा दावा या महिलेने केला आहे.

लंडन, 22 नोव्हेंबर : सेक्समुळे (Sex) शारीरिक आनंद (Physical relation) मिळतोच पण सेक्समुळे (Benefits of sex) कुणी आपला जीव वाचला (Sex saved woman's life) असं सांगितलं तर नेमका कसा, असाच प्रश्न प्रत्येकाला पडेल. सेक्सनंतर शारीरिक आनंदासह जीव वाचण्याचा अनुभव घेतला तो यूकेतील एका महिलेने. सेक्समुळे आपला जीव वाचला, सेक्स केला नसता तर आज मी या जगात नसते, असा दावा या महिलेने केला आहे. पन्नाशी ओलांडलेल्या या महिलेला या वयातही शारीरिक संबंध ठेवणं फायदेशीर ठरलं आहे.

52 वर्षांची टीना ग्रे. यूकेच्या हॅम्पशायरमध्ये राहते. टीनाचा नवरा डेज 51 वर्षांचा आहे. वयाची पन्नाशी पार केलेल्या या कपलने सेक्स कायम ठेवला. या वयातही हे कपल सेक्शुअली अॅक्टिव्ह आहेत. दोन वर्षांपूर्वीच तिला मेनोपॉज म्हणजे रजोनिवृत्ती आली. रजोनिवृत्ती म्हणजे महिलांना येणारी मासिक पाळी बंद होणं. ज्यामुळे तिची प्रजनन क्षमताही कमी आहे. त्यामुळे टिनाला आता प्रेग्नन्सीचीही भीती नाही. ज्यामुळे या जोडप्यातील शारीरिक जवळीक अधिकच वाढली.

हे वाचा - नवऱ्यांनो बायकोचा बर्थडे नीट लक्षात ठेवा; चुकूनही विसराल तर खावी लागेल जेलची हवा

डेली स्टारच्या रिपोर्टनुसार सेक्सदरम्यान टिनाला तिच्या ब्रेस्टमध्ये गाठ असल्याचं जाणवलं. तिने तिच्या पतीला विचारलं हे असंच असतं की काही असामान्य आहे.तिच्या नवऱ्याने तिचे ब्रेस्ट तपासले आणि ही वेगळी गाठ असल्याचं त्याला जाणवलं.

त्यानंतर दोघंही डॉक्टरांकडे गेले. तिथे तपासणी केल्यानंतर तिच्या दोन्ही ब्रेस्टमध्ये गाठ असल्याचं निदान झालं, त्यातील एक गाठ लहान आणि एक मोठी होती. डॉक्टरांच्या मते, ही गाठ सामान्य नव्हे तर कॅन्सरची गाठ होती. टिनाला ब्रेस्ट कॅन्सर झाला होता. ब्रेस्ट कॅन्सरच्या तिसऱ्या टप्प्यात ती होती. अशावेळी रुग्णाचा जीव वाचवणं कठीण असतं. अशा परिस्थितीतही डॉक्टरांनी सर्जरी करून तिची गाठ काढली आणि टिनाचा जीव वाचला.

हे वाचा - ही मॉडेल भरते श्रीमंतांच्या पार्टीत रंग, लाखो रुपये घेऊन बनते ‘खास पाहुणी’

टिना म्हणाली, तिचा जीव नवरा डेज आणि ब्रिटनच्या नॅशनल हेल्थ सर्व्हिसमुळे वाचला. सेक्शुअली अॅक्टिव्ह असल्याने तिला असलेल्या या भयंकर आजाराचं वेळीच निदान झालं. तिच्या नवऱ्याने गाठीचं निदान केलं आणि उपचार सुरू झाले. नाहीतर ती या जगात नसती.

First published:

Tags: Couple, Health, Lifestyle, Relationship, Sexual health, Uk