मुंबई, 12 फेब्रुवारी : एकदा का वयाची पन्नाशी पार झाली की, सांधेदुधी, अशक्तपणा, विसराळूपणा वाढतो. पन्नाशीनंतर महिलांना आरोग्याच्या अनेक समस्या उद्भवतात. अशा समस्यांना दूर ठेवण्यासाठी योग्य आहार घेणंही तितकंच महत्त्वाचं आहे. वाढत्या वयानुसार शरीरामध्ये बदल होतात, त्यामुळे तुमच्या आहारातही बदल व्हायला हवेत.
हाडांच्या आरोग्यासाठी कॅल्शिअम
वाढत्या वयात महिलांना हाडांच्या समस्या अधिक जाणवतात. सांधेदुखी, संधिवात होतो. तज्ज्ञांच्या मते, पन्नाशी पार केलेल्या 3 पैकी एका महिलेला ऑस्टियोपोरोसिसमुळे (osteoporosis) हाड तुटण्याचा धोका असतो. पुरुषांनाही ऑस्टियोपोरोसिस होतो, मात्र इतक्या अधिक प्रमाणात नाही, जितक्या प्रमाणात महिलांना होतो. जसजसं आपलं वय वाढतं, तसतसं आपलं शरीर कमी प्रमाणात कॅल्शिअम शोषून घेतं. तर काही महिलांना कॅल्शिअमचा स्रोत असलेले दुग्धदन्य पदार्थ पचत नाहीत. त्यामुळे अशा महिलांनी हिरव्या भाज्या, पालेभाज्या आणि calcium-fortified ऑरेंज ज्युस यांचं सेवन करावं आणि या माध्यमातून कॅल्शिअम मिळवावं. पन्नासपेक्षा जास्त वय असलेल्या महिलेला दिवसाला 1,200 मिलिग्रॅम कॅल्शिमची गरज असते, असं तज्ज्ञांनी सांगितलं आहे.
हेदेखील वाचा - महिलांनो, Breast ला येणाऱ्या खाजेकडे दुर्लक्ष नको; असू शकतं गंभीर आजारांचं लक्षण
मजबूत स्नायूंसाठी प्रोटिन
वय झाल्यानंतर महिलांचा व्यायाम कमी आणि बैठी जीवनशैली अधिक वाढते. यामुळे sarcopenia होतो. म्हणजे muscle mass कमी होतो. जर पुरेशा प्रमाणात प्रोटिन शरीरात गेलं तर स्नायूंवर काही परिणाम होत नाही. त्यामुळे अंडी, नट्स, सीड्स आणि कडधान्यं यांचा आहारात समावेश करा. तज्ज्ञांच्या मते, तुमच्या शरीराला किती प्रोटिनची गरज आहे, हे तुमच्या वजनावर अवलंबून असते. प्रतिकिलोसाठी दिवसाला 1.5 ग्रॅम प्रोटिन आवश्यक असतं.
मेंदूच्या कार्साठी व्हिटॅमिन बी-12
वय वाढल्यानंतर शरीरात आहारातून न्यूट्रिएंट्स कमी प्रमाणात शोषले जातात. त्यापैकी एक न्यूट्रिएंट्स आहे, तो म्हणजे व्हिटॅमिन बी-12, जो मेंदूच्या कार्यासाठी आणि लाल रक्तपेशींसाठी गरजेचं आहे. अंडं, दूध, मासे, फोर्डिफाइडयुक्त सेरेल्स आणि धान्य हे व्हिटॅमिन बी-12 चा स्रोत आहेत. मात्र हे सर्व पदार्थ खाल्ले तरी वाढत्या वयात या पदार्थांमधून पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन बी-12 शोषलं जात नाही. तज्ज्ञांच्या मते, पन्नाशीनंतर दिवसाला 2.3 मायक्रोग्रॅम इतकं प्रोटिन आवश्यक असतं. त्यामुळे गरज असल्यास डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार सप्लिमेंट घ्या.
हेदेखील वाचा - महिलांनो मासिक पाळीची तारीख लक्षात ठेवा, उशिरा Period असू शकते गंभीर समस्या