Home /News /lifestyle /

भारी! फक्त बटाटे खाण्यासाठी कंपनी देतेय 50 हजार पगार; कसं कराल या Dream job साठी अप्लाय पाहा

भारी! फक्त बटाटे खाण्यासाठी कंपनी देतेय 50 हजार पगार; कसं कराल या Dream job साठी अप्लाय पाहा

तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर हा ड्रिम जॉब तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे.

  मुंबई, 07 सप्टेंबर : बटाट्याची भाजी (Potato bhaaji), बटाट्याची भजी (Potato bhajiya), वडापाव, पोटॅटो चिप्स (Potato chips) असे बटाट्याचे किती तरी पदार्थ आहेत. बटाट्याचे पदार्थ आवडत असलेल्यांची कमी नाही. तुम्हीसुद्धा असे बटाटाप्रेमी (Potato lover) असाल तर मग तुमच्यासाठी सुवर्णसंधी आहे. फक्त बटाटे खाण्यासाठी (Potato taster) तुम्हाला पगार मिळणार आहे (Salary for eating potato). एका कंपनीने हा ड्रिम जॉब (Dream job) ऑफर केला आहे. कोरोना काळात अनेकांनी नोकरी गमावली आहे. किती तरी जण नोकरीच्या शोधात आहे. तुम्हीसुद्धा नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी ही उत्तम संधी आहे. एका रेस्टॉरंटमार्फत जॉब वॅकेन्सी काढण्यात आली आहे. याची जाहिरातही दिली आहे. तुम्हाला फक्त बटाट्याची चव चाखायची आहे. यासाठी तुम्हाला चांगला पगारही दिला जाणार आहे.  रेस्टॉरंटने या जॉबसाठी 500 युरो म्हणजे जवळपास 50 हजार रुपये सॅलरी ऑफर केली आहे.
  द बॉटनिस्ट नावाच्या रेस्टॉरंट प्रो-टॅटो टेस्टरच्या (Pro-Tato Taster)  शोधात आहे. या रेस्टॉरंटमझ्ये बऱ्याच रोस्टेड डिश मिळतात. रेस्टॉरंटने आपल्या ग्राहकांना बेस्ट रोस्टेड आलू खायला मिळावेत यासाठी जॉबची ही वॅकन्सी काढली आहे. हे वाचा - WOW! कोट्यवधींच्या घरात मोफत राहा आणि वरून पैसेदेखील मिळवा, पाहा अलिशान घराचे PHOTOs या जॉबसाठी अप्लाय करणाऱ्या सुरुवातीला रोस्टेड आलू टेस्ट करावे लागतील. त्याशिवाय मीटही टेस्ट करावं लागेल. बीफ, चिकन, लॅम्ब आणि पोर्क यांचा समावेश आहे. जेव्हा टेस्टरकडून परवानगी मिळेल तेव्हाच या पदार्थांची विक्री केली जाईल. 19 सप्टेंबरला रेस्टॉरंटने टेस्टिंग सेशनचं आयोजन केलं आहे. या जॉबसाठी अर्ज करणाऱ्याला रोस्ट डिनरवर 500 शब्दांचा निबंध लिहायचा आहे. तसंच बटाट्याच्या टेसटबाबत 60  सेकंदचा व्हिडीओ बनवायचा आहे. हे वाचा - Yuck! तरुणींच्या घाणेरड्या मोज्यांसाठी महिन्याला खर्च करतो 20 हजार रुपये आणि... आता तुम्हाला हा जॉब करायचं असेल तर ही संधी बिलकुल सोडू नका.  या जॉबसाठी अप्लाय करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
  Published by:Priya Lad
  First published:

  Tags: Career, Food, Job, Lifestyle, Restaurant

  पुढील बातम्या