मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

5 वर्षांत 4 कॅन्सर, पण खचला नाही हा साठीतला पुणेकर; महाभंयकर आजाराशी जिद्दीनं लढतोय

5 वर्षांत 4 कॅन्सर, पण खचला नाही हा साठीतला पुणेकर; महाभंयकर आजाराशी जिद्दीनं लढतोय

एक नाही तर चार कॅन्सर (cancer) होऊनही ते त्या आजारासमोर झुकले नाहीत. त्यांनी हार मानली नाही तर त्याच्याशी लढत राहिले आणि कॅन्सर असूनही इतर व्यक्तींप्रमाणेच ते आपलं सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. 

एक नाही तर चार कॅन्सर (cancer) होऊनही ते त्या आजारासमोर झुकले नाहीत. त्यांनी हार मानली नाही तर त्याच्याशी लढत राहिले आणि कॅन्सर असूनही इतर व्यक्तींप्रमाणेच ते आपलं सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. 

एक नाही तर चार कॅन्सर (cancer) होऊनही ते त्या आजारासमोर झुकले नाहीत. त्यांनी हार मानली नाही तर त्याच्याशी लढत राहिले आणि कॅन्सर असूनही इतर व्यक्तींप्रमाणेच ते आपलं सर्वसामान्य आयुष्य जगत आहेत. 

  • Published by:  Priya Lad

पुणे, 28 डिसेंबर : कॅन्सर (cancer) शब्द जरी ऐकला, वाचला की थरकाप उडतो. आपल्याला कॅन्सर झाला असं समजताच कित्येकांच्या पायाखालची जमीन सरकते. झालं आता आपलं आयुष्य संपलंच असाच समज ते करून घेतात. पण विचार करा पाच वर्षात एकामागोमाग एक अशा चार कॅन्सरनी पुण्यातील (pune) साठीपार व्यक्तीला गाठलं. पण हा पुणेकर खचला नाही. जिद्दीनं तो या महाभयंकर आजाराशी लढा देता आहे. विशेष म्हणजे दोन कॅन्सरवर त्यानं मातही केली आहे.

63 वर्षांचे अशोक कांबळे. गेली 5 वर्षे 4 वेगवेगळ्या कॅन्सरशी लढा देत आहेत. 2016 साली त्यांना पहिल्या कॅन्सरचं निदान झालं. त्यानंतर एकापाठोपाठ एक असे 4 कॅन्सर त्यांना झाले. आधी किडनी (kidney cancer) मग थायरॉइड (thyroid cancer) आणि त्यानंतर अन्ननलिका आणि प्रोस्टेट कॅन्सर.

अशोक यांनी सांगितलं, "कॅन्सरमुळे माझ्या उजव्या किडनीवर गंभीर परिणाम झाला. त्यामुळे 2016 सालीच डॉक्टरांनी माझी उजवी किडनी काढली. तेव्हापासून मी एकाच किडनीवर जगत आहे. 2017 साली मला गंभीर स्वरूपाचा थायरॉइड कॅन्सर झाला. त्याच वर्षात डॉक्टरांनी मला पूर्ण थायरॉइड काढून टाकण्याचा सल्ला दिला. जेव्हा मला हे दोन्ही कॅन्सर झाले तेव्हा मी सरकारी नोकरी करत होतो. थायरॉइड कॅन्सरवर उपचार सुरू असतानाच मला प्रोस्टेट कॅन्सर असल्याचं समजलं आणि त्यानंतर अन्ननलिकेचा कॅन्सरही झाला"

याच वर्षात अशोक यांना अन्ननलिकेचा कॅन्सर झाला. डॉक्टरांनी त्यांना शस्त्रक्रिया करण्याचा सल्ला दिला. त्यामुळे त्यांना खातानाही त्रास होतो आहे. पण डॉक्टरांच्या सल्ल्याचं ते नीट पालन करत आहेत.

अशोक म्हणाले, "डॉक्टरांनी माझ्या अन्ननलिकेचा जवळपास तीन चतुर्थांश भाग काढून टाकला. मला मी नियमित जसा आहार घ्यायचो तसा मला घेता येत नाही. अन्ननलिकेची शस्त्रक्रिया झाल्याने मी नेहमीपेक्षा कमी खातो. मी जरी कमी खात असलो तरी घरी बनवलेलं ताजं अन्न खातो. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच आहार घेतो. मला अधिक तीव्र अशा एक्सरसाईज करायला जमत नाहीत. पण मी दिवसभर स्वतःला अॅक्टीव्ह ठेवतो. शरीराची हालचाल होईल अशा सौम्य एक्सरसाईज करतो. "

हे वाचा - धक्कादायक! दातदुखीनं त्रस्त होती महिला; डॉक्टरांनी दात काढताच झाला मृत्यू

2016 साली अशोक यांना कॅन्सर असल्याचं निदान झालं. तेव्हापासून ते पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमध्ये उपचार घेत आहेत. त्यांनी किडनी आणि थायरॉइड कॅन्सरवर मात केली आहे. आता अन्ननलिका आणि प्रोस्टेट कॅन्सरवर उपचार सुरू आहेत. त्यांना चौथ्या टप्प्यातील प्रोस्टेट कॅन्सर आहे. तो नियंत्रणात असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

अशोक यांच्यावर उपचार करणारे रुबी हॉल क्लिनिकमधील ऑन्कोलॉजिस्ट डॉ. मनीष जैन यांनी सांगितलं, "अशोक यांना किडनी आणि थायरॉइड असे दोन कॅन्सर झालेत. त्यांचा कॅन्सर शरीरातील इतर अवयवांतही पसरला. त्यांना मेटास्टेटिक कॅन्सर झाला. जेव्हा आम्ही बायोप्सी केली. तेव्हा त्यांना प्रोस्टेट कॅन्सरही असल्याचं समजलं. जेव्हा जेव्हा आम्ही तपासणी केली तेव्हा त्यांना नवीन कॅन्सरचं निदान झालं. जर अशोक यांना झालेले कॅन्सर नवीन आहेत हे आम्हाला समजलं नसतं आणि आम्ही आधीचा कॅन्सरच इतर अवयवात पसरला असावा असं समजून उपचार करत राहिलो असतो तर उपचार प्रभावी ठरले नसते"

"आता त्यांना चौथ्या टप्प्यातील कॅन्सर असला तरी काळजी करण्यासारखं काही नाही. जर तज्ज्ञांनी कॅन्सरच्या योग्य प्रकाराचं निदान केलं आणि त्यावर योग्य उपचार केले तर रुग्ण निरोगी आयुष्य जगू शकतो. अशोक यांचा कॅन्सर आता नियंत्रणात आहे. त्यांना आम्ही योग्य ती औषधं देतो. ते एकदम व्यवस्थित आहेत.", असं डॉ. जैन यांनी सांगितलं.

हे वाचा - शरीरावर दिसत आहेत काही निराळ्याच खुणा? कर्करोगाचा असू शकतो धोका

"एखाद्या रुग्णाला असे 4 कॅन्सर होणं हे दुर्मिळ आहे आणि 4 कॅन्सर होऊनही अशोक यांनी दृढपणे लढा दिला. ते निरोगी आयुष्य जगत आहेत, त्यांचा दिनक्रम सुरळीत सुरू आहे. हे खूप कौतुकास्पद आहे", असं डॉ. जैन म्हणाले.

First published:

Tags: Cancer, Health, Pune news