S M L

जीवनात यशाची शिखरं गाठण्यासाठी नेमकं काय कराल...?

प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो की, जेव्हा आपण आपल्या करिअरबाबत संभ्रमात पडतो. दिवसभर आपण काय करतोय, काय नाही याच विचारात असतो पण हे विचार फक्त आपला वेळ वाया घालवतात. या विचारांमुळे आपण निराश होतो, उदासीन होतो. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आयुष्यात खरचं काही करण्याची इच्छा असेल तर काही गोष्टी अंमलात आणा, फक्त विचार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्षात क्रिया करा.

Chandrakant Funde | Updated On: Nov 19, 2017 10:28 PM IST

जीवनात यशाची शिखरं गाठण्यासाठी नेमकं काय कराल...?

19 नोव्हेंबर : प्रत्येकाच्या आयुष्यात एक काळ असा येतो की, जेव्हा आपण आपल्या करिअरबाबत संभ्रमात पडतो. दिवसभर आपण काय करतोय, काय नाही याच विचारात असतो पण हे विचार फक्त आपला वेळ वाया घालवतात. या विचारांमुळे आपण निराश होतो, उदासीन होतो. पण या सगळ्या गोष्टी बाजूला ठेवून जर आयुष्यात खरचं काही करण्याची इच्छा असेल तर काही गोष्टी अंमलात आणा, फक्त विचार करत बसण्यापेक्षा प्रत्यक्षात क्रिया करा.

1) नेहमीच संभ्रमात राहू नका

काही करायचं असेल तर त्याबाबत संभ्रमात राहू नका. गोंधळात राहणे हे आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक जीवनाच्या वाढीसाठी सगळ्यात मोठी अडचण आहे. त्यामुळे जितक्या लवकर शक्य होईल तितक्या लवकर यातून बाहेर पडा. एकाच वेळी सगळा विचार करण्यापेक्षा एकाएका कामाला महत्त्व द्या. त्याने तुमचा गोंधळ उडणारा नाही.


2) नेहमी काही वेगळं करण्याचा प्रयत्न करा

रोज उठून एकच काम करण्यापेक्षा आयुष्यात काही नवीन करण्याचा प्रयत्न करा. यशस्वी होण्यासाठी आपल्यातलं वेगळेपण खूप महत्त्वाचं आहे.

3) आयुष्यात महत्त्वाचे निर्णय घ्या आणि जोखीम पत्करा

Loading...

तुम्हाला खरंच यशस्वी आणि समाधानी आयुष्य जगायचं असेल तर परिणामांचा विचार न करता जोखीम पत्करायला शिका. घाबरण्यापेक्षा धैर्याने सगळ्या गोष्टींना सामोरे जा. नेहमी लक्षात ठेवा अपयश हीच यशाची पहिली पायरी आहे.

4) सगळ्यांशी भेटा, बोला, अनुभव घ्या आणि आपले ज्ञान वाढवा

आपल्याला काही वेगळं करायचं असेल तर ज्ञान, अनुभव असणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे सगळ्यांना भेटा, त्यांच्याशी बोला, त्यांचा अनुभव जाणुन घ्या. याने आपण अनेक लोकांपर्यंत पोहचू शकतो.

5) यशस्वी लोकांची आत्मचरित्र वाचा

लक्षात ठेवा यशस्वी होण्यासाठी यशस्वी लोकांपर्यंत पोहचणं खूप महत्त्वाचं आहे. मार्केटमध्ये त्या लोकांवर नजर ठेवा जे खूप यशस्वी झाले. त्यांच्या यशाचा अभ्यास करा. यशस्वी होण्यासाठी वेगळा दृष्टीकोण खूप महत्त्वाचा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Nov 19, 2017 10:23 PM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close