Home /News /lifestyle /

फक्त चहा-कॉफी कशाला; 5 Drinks दूर पळवतील तुमची थंडी

फक्त चहा-कॉफी कशाला; 5 Drinks दूर पळवतील तुमची थंडी

थंडीमध्ये (winter) शरीर आतून गरम ठेवण्यासाठी हे पेय तुमच्यासाठी फायदेशीर ठरतील.

मुंबई, 19 जानेवारी : हिवाळ्यात (Winter) थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेकजण लोकरीचे कपडे वापरतात. याने शरीर गरम राहतं. याचबरोबर या दिवसांमध्ये अनेकजण चहा (Tea),कॉफी (Coffee) आणि गरम पदार्थांचं सेवन करत असतात. यामुळे शरीर गरम राहून उब मिळण्यास मदत होते. पण चहा-कॉफीशिवाय असे आणखी काय पेय आहेत, जे प्यायल्याने तुम्हाला थंडी लागणार नाही. तुमची थंडी दूर पळवतील असेच काही पेय आपण पाहुयात. 1) बदाम दूध हे पेय तयार करण्यासाठी चिरलेला बदाम गरम पाण्यात उकळून घ्या.  बदामांमध्ये व्हिटॅमिन ई, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि इतर आवश्यक पौष्टिक पदार्थ असतात. ज्या व्यक्तींना साखर कमी लागते त्या व्यक्तींसाठी हे पेय खूप फायदेशीर आहे. यामध्ये असलेल्या व्हिटॅमिन-ई (Vitamin-E) मुळे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढून आजारांशी लढण्यासाठी आपल्याला बळ मिळू शकतं. 2) नारळाचं दूध थंडीच्या दिवसात लहानग्यांप्रमाणेच ज्येष्ठ नागरिकांना देखील फटका बसतो. हाडांचं दुखणं या दिवसांमध्ये डोकं वर काढतं. नारळाचं दूध यासाठी खूप फायदेशीर आहे. नारळात पॉलिफिनॉल्स असतात. ते अँटिऑक्सिडंट असल्याने संधिवात संबंधित जळजळ कमी करून आराम देत असल्याचं अनेक संशोधनात समोर आलं आहे. हे वाचा - पातळ ओठांमुळं नाराज आहात? 'या' झटपट मेकअप टिप्स वापरून बनवा त्यांना आकर्षक! 3) लिंबू आणि आल्याचा चहा थंडीच्या दिवसात आलं टाकलेला चहा सर्वांना आवडतो. यामुळे लिंबूपाणी आल्याचा चहा या थंडीच्या दिवसांमध्ये खूप फायदेशीर आहे. आल्यामध्ये पोटॅशियम, मँगनीज, कॉपर, मॅग्नेशिअम, अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी- इन्फ्लेमेटरी या गुणधर्मांचा समावेश असतो. तर लिंबामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin-C) असल्याने या पदार्थांचा चहामध्ये वापर केल्यास शरीरातील उष्णता टिकून राहण्यास मदत होईल. 4) दालचिनीसह सफरचंद स्मूदी हिवाळ्यामध्ये शरीराचं तापमान गरम ठेवण्यात सफरचंद खूप महत्त्वाची भूमिका बजावतो. सफरचंदामध्ये व्हिटॅमिन सी (Vitamin-C) असतं. सफरचंदातील पॉलिफेनल्स जळजळ कमी करण्यास मदत करतात. दालचिनीमध्ये अँटी-इन्फ्लेमेटरी आणि अँटीमाइक्रोबियल गुणधर्म असतात. यामुळे सफरचंदाच्या स्मूदीमध्ये दालचिनी टाकून तुम्ही याचं सेवन केल्यास शरीराचं तापमान संतुलित राखण्यास नक्कीच तुम्हाला मदत होणार आहे. हे वाचा - कोरोना टेस्ट तुमच्या हातात; Smartwatch देखील करू शकतं निदान 5) काश्मिरी कावा काश्मीरमधील(Kashmiri Kahwa) हा पारंपरिक चहा असून यामध्ये विविध प्रकारचे मसाले असतात. यामुळे शरीराचं तापमान संतुलित राहण्यास मदत होऊन याचा आरोग्याला मोठा फायदादेखील होतो. यामध्ये केशर, ग्रीन टी, दालचिनी आणि वेलची टाकली जाते.गोडपणासाठी मध किंवा साखरेचा वापर केला जातो.  या हिवाळ्याच्या थंड वातावरणात या पदार्थांमुळे शरीराचे तापमान गरम राहून आपल्याला उब मिळण्यास मदत होते.
Published by:Priya Lad
First published:

Tags: Health, Tea drinker, Winter

पुढील बातम्या