मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /सेक्सबद्दल पडणारी 5 कॉमन स्वप्नं; वाचा, काय असतो त्यांचा अर्थ

सेक्सबद्दल पडणारी 5 कॉमन स्वप्नं; वाचा, काय असतो त्यांचा अर्थ

फाईल फोटो

फाईल फोटो

आपण ज्या काही गोष्टींबद्दल स्वप्न पाहतो त्यापैकी एक म्हणजे आपल्या सेक्शुअल फँटसीज पूर्ण करणं. इथं काही सामान्य सेक्शुअल फँटसीज आणि त्यांचे अर्थ दिले आहेत, ते जाणून घेऊयात.

 • Trending Desk
 • Last Updated :
 • Mumbai, India

  नवी दिल्ली 27 मार्च : आपण अनेकदा आपल्या इच्छा लपवून ठेवतो. परंतु कधीकधी आपण त्यांच्याबद्दल स्वप्न पाहतो. बऱ्याचदा ही स्वप्नं आपण मिळवू इच्छित असलेल्या गोष्टींबद्दल असतात. जेव्हा आपण लपलेल्या इच्छांचा उल्लेख करतो, तेव्हा आपण ज्या काही गोष्टींबद्दल स्वप्न पाहतो त्यापैकी एक म्हणजे आपल्या सेक्शुअल फँटसीज पूर्ण करणं. इथं काही सामान्य सेक्शुअल फँटसीज आणि त्यांचे अर्थ दिले आहेत, ते जाणून घेऊयात.

  एक्सबरोबर सेक्स- सेक्सबद्दलच्या सामान्य स्वप्नांपैकी एक म्हणजे एक्स जोडीदाराबरोबर सेक्स करणं होय. या स्वप्नाचा असा अर्थ होतो की या दोघांमधील गोष्टी अजूनही योग्यरित्या पूर्ण झालेल्या नाहीत. नातेसंबंधांमध्ये जवळीक नसल्यामुळे अशी लैंगिक स्वप्नं येतात. सेक्स हा इंटिमसीचा सर्वोच्च प्रकार आहे असं मानलं जातं. तरीही आपल्या एक्सबद्दल स्वप्न पाहणं हे सूचित करतं की तुम्ही अजूनही त्याच्या किंवा तिच्याशी असलेल्या नात्यामध्ये गुंतलेले आहात आणि त्या नात्यातून पूर्णपणे बाहेर पडलेले नाही.

  लग्नापूर्वी संभोग करण्याची परवानगी, परदेशात नाही देशातच आहे ही प्रथा, काय आहे हा प्रकार?

  अनोळखी व्यक्तीशी सेक्स - एखाद्या अनोळखी व्यक्तीसोबत सेक्स करण्याचं स्वप्न पाहणं हे तुमचं अनामिक प्रेम दर्शवतं. बऱ्याच जणांना अज्ञातांबरोबर कामजीवन एक्सप्लोर करण्याची इच्छा असते आणि ती त्यांच्यासाठी टर्न-ऑन म्हणून काम करते. जर तुम्ही सार्वजनिक ठिकाणी एखाद्या अनोळखी व्यक्तीकडे आकर्षित होत असाल, तर अशी स्वप्नं दिसणं सामान्य आहे.

  ओळखीच्या व्यक्तीशी सेक्स - आपल्या सर्वांचे मित्रांचे ग्रुप असतात. पण, आपण आपल्या लैंगिक इच्छेबद्दल लोकांना सांगण्यास अनेकदा घाबरतो, म्हणून आपण त्याबद्दल स्वप्न पाहतो. एखाद्या ओळखीच्या व्यक्तीशी सेक्सची स्वप्नं पाहणं हे त्या व्यक्तीबद्दल तुम्हाला लैंगिक किंवा प्रेमाची भावना निर्माण झाल्याचं दर्शवतं.

  सेलिब्रिटीसोबत सेक्स - हे सर्वांत कॉमन सेक्स स्वप्नांपैकी एक आहे. सेलिब्रिटींचा करिष्मा, फिट बॉडी आणि चांगलं दिसणं त्यांच्याबद्दल तुमच्या मनात छुप्या लैंगिक इच्छा निर्माण करतात. यातही तुम्हाला कोणती सेलिब्रिटी आवडते, त्यावरून तुम्ही कोणत्या प्रकारची व्यक्ती आहात, तेही कळतं.

  सार्वजनिक ठिकाणी सेक्स - स्वप्नात एखाद्या सार्वजनिक ठिकाणी स्वतःला सेक्स करताना पाहणं असं सूचित करतं की त्या व्यक्तीला सेक्स करताना पाहणं आवडतं. अनेक पुरुष व स्त्रियांना इतरांना सेक्स करताना पाहिल्यावर ऑरगॅझम मिळतो. या प्रकारच्या भावना अनेकदा एखाद्या व्यक्तीला समाजातील व्यक्तींकडून मिळणाऱ्या सेक्शुअल लिबरेशनबदद्लही असतात. त्यामुळे तुम्हाला कशी स्वप्नं पडता ते पहा आणि अर्थ समजून घ्या.

  First published:
  top videos

   Tags: Physical Relationship, Sex education