• Home
 • »
 • News
 • »
 • lifestyle
 • »
 • Daily Exercise: रोज फक्त इतकी मिनिटं व्यायाम करण्याची सवय ठेवाच; Cancer चाही धोका होतो कमी

Daily Exercise: रोज फक्त इतकी मिनिटं व्यायाम करण्याची सवय ठेवाच; Cancer चाही धोका होतो कमी

Daily Exercise Reduces The Risk Of Cancer : शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यानं अनेक आजार टाळता येतात. अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज किमान 45 मिनिटे (आठवड्यातून 300 मिनिटे) व्यायाम केल्याने कर्करोगाचा (Cancer) धोका कमी होतो.

 • Share this:
  नवी दिल्ली, 22 नोव्हेंबर: कोरोना महासाथीनंतर लोकांच्या जीवनशैलीत मोठा बदल झाला असून त्याचा परिणाम त्यांच्या आरोग्यावरही होताना दिसत आहे. घरून काम करणे, कामाचे जास्त तास, एकाच स्थितीत बराच वेळ बसणे, स्क्रीनवर जास्त वेळ घालवणे. या सगळ्यामुळे आपली शारीरिक हालचाल कमी झाली आहे. आपण चालणे, हिंडणे विसरलो आहोत. बराच वेळ काम केल्यानंतर फिरायला जाण्याची, लांब फिरण्याची किंवा काही व्यायाम करण्याची शरीरात ताकद उरत नाही. पण तुम्हाला माहीत आहे का, की आपल्या या शारीरिक निष्क्रियतेमुळे आपल्या शरीरावर अनेक वाईट परिणाम होत (Daily Exercise Reduces The Risk Of Cancer ) असतात. शारीरिकदृष्ट्या सक्रिय राहिल्यानं अनेक आजार टाळता येतात. अमेरिकेत केलेल्या एका अभ्यासात असे समोर आले आहे की, दररोज किमान 45 मिनिटे (आठवड्यातून 300 मिनिटे) व्यायाम केल्याने कर्करोगाचा (Cancer) धोका कमी होतो. हा अभ्यास मेडिसिन अँड सायन्स इन स्पोर्ट्स अँड एक्सरसाइज (Medicine and science in sports and exercise) या जर्नलमध्ये प्रकाशित झाला आहे. भारतासह जगभरात कर्करोग (Cancer) हे लोकांच्या मृत्यूचे प्रमुख कारण बनले आहे. अमेरिकेत लोकांच्या कमी झालेल्या शारीरिक हालचाली, व्यायाम आणि कर्करोगावर केलेल्या संशोधनातून असं समोर आलं आहे की, जर लोकांनी दररोज किमान 45 मिनिटे चालले तर एकट्या अमेरिकेत दरवर्षी 46,000 कॅन्सरची प्रकरणे टाळता येऊ शकतात. म्हणजेच कोणत्याही व्यक्तीने दिवसातील किमान 45 मिनिटं व्यायामासाठी काढणं अनेक आजारांपासून दूर ठेवू शकतं. संशोधन काय? या अभ्यासासाठी संशोधकांनी अमेरिकेतील सर्व राज्यांतील ६ लाख लोकांमध्ये कर्करोगाचा धोका आणि त्यांच्या शारीरिक हालचालींच्या सवयींचे विश्लेषण केले. या अभ्यासात महिला आणि पुरुष दोघांचाही समावेश करण्यात आला होता. अभ्यासात असे दिसून आले आहे की, अमेरिकेतील कर्करोगाची 3 टक्के प्रकरणे थेट शारीरिक निष्क्रियतेशी संबंधित आहेत. हे वाचा - शेतकऱ्यांसाठी खूशखबर! तुषार, ठिबक सिंचन आता 75 ते 80 टक्के अनुदानावर मिळणार; असा घ्या योजनेचा लाभ शारीरिक हालचालींचे फायदे एएनआय या वृत्तसंस्थेने या अभ्यासाबाबत भारतीय डॉक्टरांशीही संवाद साधला आहे, त्यांचे देखील असे म्हणणे आहे की, कर्करोगाचा धोका टाळण्यासाठी व्यायामाची भूमिका महत्त्वाची आहे. नोएडा येथील सुपर स्पेशालिटी पेडियाट्रिक हॉस्पिटल आणि पीजी टीचिंग इन्स्टिट्यूट (Pediatric Hematology-Oncology) मधील बालरोग रक्तविज्ञान-ऑन्कोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. नीता राधाकृष्णन (Dr Nita Radhakrishnan) म्हणाल्या की, हा एक नवीन अभ्यास असू शकतो, परंतु याआधीही हे उघड झाले आहे की, शारीरिक हालचाली कर्करोगाचा धोका कमी करण्यासाठी काम करतात. शारीरिक हालचाली मुळात आपली रोगप्रतिकारक शक्ती सुधारतात. आपल्या शरीरात ट्यूमर निरीक्षण प्रणाली आहे. जेव्हा जेव्हा कर्करोग शरीरात विकसित होतो तेव्हा ते ट्यूमर निरीक्षण प्रणालीच्या अपयशामुळे होते. व्यायाम किती फायदेशीर आहे या अहवालात डॉ नीता राधाकृष्णन पुढे म्हणाल्या की, 'व्यायाम आपल्या रोगप्रतिकारक स्थितीत सुधारणा करण्याशी संबंधित आहे आणि स्तन, कोलन आणि आतड्यांच्या कर्करोगाशीही संबंधित आहे. व्यायामामुळे आपल्या शरीरातील आतड्यांद्वारे अन्नाची हालचाल सुधारते. अशाप्रकारे, जर एखादी व्यक्ती शारीरिकदृष्ट्या अधिक सक्रिय असेल तर त्याच्या शरीराची संपूर्ण यंत्रणा चांगली कार्य करते आणि कर्करोगाचा धोका कमी राहतो. आजच्या व्यग्र दिनचर्येत व्यायाम खूप उपयुक्त ठरू शकतो. यामुळे कर्करोगाचे प्रमाण एक-दोन टक्क्यांनी कमी होऊ शकते, असे म्हटले तर हाही मोठा आकडा आहे. हे वाचा - Pain Killer डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय घेणं पडेल महागात; होतात दीर्घकालीन परिणाम कर्करोगात रोगप्रतिकारक शक्तीची भूमिका डॉ. पीके जुल्का, एमडी, एफएएमएस आणि मॅक्स ऑन्कोलॉजीचे प्रधान संचालक यांच्या मते, “आपली रोगप्रतिकारक शक्ती कर्करोगाशी लढते. हे कर्करोगाच्या पेशी वाढण्यास प्रतिबंध करते. व्यायामाने आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. अशाप्रकारे व्यायाम थेट कर्करोग रोखण्याचे काम करतो. (वृत्तसंस्था एएनआयकडूनही माहिती घेतली आहे)
  Published by:News18 Desk
  First published: