Home /News /lifestyle /

OMG! 4 गार्ड, 6 डॉग; चक्क आंब्यासाठी कडेकोट सुरक्षा, इतकं त्यात काय आहे खास?

OMG! 4 गार्ड, 6 डॉग; चक्क आंब्यासाठी कडेकोट सुरक्षा, इतकं त्यात काय आहे खास?

आंब्यासाठी अशी सुरक्षा... तुम्हालाही आश्चर्य वाटलं असेल ना?

    भोपाळ, 17 जून : आंब्याला (Mango) फळांचा राजा म्हटलं जातं. आंबा हे फळ असं आहे, जे प्रत्येकाला आवडतं. आंबा आवडत नाही, अशी व्यक्ती क्वचितच सापडले. आंब्यासाठी लोक काय काय नाही करत. पण तुम्हाला आश्चर्य वाटले एका दाम्प्त्याने मात्र त्यांच्या आंब्याला अगदी कडेकोट सुरक्षा दिली आहे. आंब्याच्या सुरक्षेसाठी 4 गार्ड, 6 डॉग तैनात (Security for mango) केले आहेत. मध्य प्रदेशच्या (Madhya pradesh) जबलपूरमधील संकल्प परिहास ट्रेनधून चेन्नईला जात असताना एका व्यक्तीने आंब्याची रोपटी दिली. त्यांनी आणि त्यांची बायको राणी यांनी सामान्य आंब्याची रोपटी समजून दोन रोपटी लावली. पण या आंब्याच्या झाडाला हिरवे, पिवळे नाही तर लाल रंगाचे आंबे आले. हे पाहून दाम्पत्यालाही आश्चर्य वाटलं. त्यांनी यााबाबत अधिक माहिती मिळवायला सुरुवात केली. त्यावेळी त्यांना आपल्याला गोड जॅकपॉट लागल्याचं समजलं. हे वाचा - माणसाच्या डोक्यात चाललंय काय? Mind Reading Helmet सांगणार, किती आहे किंमत पाहा त्यांनी जे आंब्याचं झाज लावलं तो जापनिज मियाझागी मँगो (Japanese Miyazaki mangoes) आहे. हा जगातील सर्वात महाग आंबा म्हणून (World's costly mango) ओळखला जातो. या आंब्यात बिटा केरोटिन, फॉलिक अॅसिड आणि अँटिऑक्सिडंट असतं. डोळ्यांच्या दृष्टीसाठी हा आंबा उत्तम आहे. जपानमधील मियाझाकी शहरात या आंब्याची सर्वप्रथम वाढ झाली. त्यामुळे त्यावरून या शहरावरून या आंब्याला ओळखलं जातं. या आंब्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात मागणी असते. गेल्या वर्षी या दाम्पत्याचा हा आंबा आंतरराष्ट्रीय बाजारात 2.70 लाख रुपयांना विकला गेला. हिंदुस्तान टाइम्सच्या रिपोर्टनुसार या महागड्या दुर्मिळ आंब्याबाबत माहिती होताच चोरट्यांनी दाम्पत्याने लावलेल्या हे आंबे चोरले. सुदैवाने दाम्पत्याने आंब्याचं झाड वाचवलं. त्यामुळे यावर्षी त्यांनी आंब्याच्या सुरक्षेची पुरेपूर काळजी घेतली आहे. त्यांनी चार सुरक्षारक्षक आणि सहा कुत्रे तैनात केले आहेत. हे वाचा - संधी सोडू नका, भरपूर खा! फक्त पावसाळ्यात मिळतात या बहुगुणी रानभाज्या या दाम्पत्याकडे या आंब्यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी येत आहे. मिंटच्या रिपोर्टनुसार गुजरातमधील एका व्यावसायिकाने एका आंब्याासाठी 21 हजार रुपये दिले आहेत.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Madhya pradesh

    पुढील बातम्या