लॉस एंजेलिस, 24 डिसेंबर: प्रगत विज्ञानामुळे (Science) सामान्यतः कधीही न पाहिलेल्या किंवा ऐकलेल्या अशा अनेक नवीन गोष्टी पाहायला मिळत आहेत. गोष्टी बदलत असल्या तरी लोकांची विचार करण्याची आणि समजून घेण्याची पद्धत मात्र जुनीच आहे. अलीकडे, अमेरिकेतील (America) ट्रान्सजेंडर पुरुषाच्या बाबतीत (Transgender Man) असचं काहीसं पहायला मिळालं. खरं तर, या व्यक्तीनं मुलाला जन्म देऊन सर्वांना आश्चर्यचकित केलं. परंतु, लोक त्याला मुलाचे वडील (Father) नव्हे तर आई (Mother) म्हणू लागले. या प्रकारामुळे ही व्यक्ती मनोमन दुखावली गेली आणि त्याने आपला राग व्यक्त केला. 'केवळ महिलाच आई होऊ शकतात, असं नाही तर ज्याच्या मनात मातृत्वाची भावना आहे ती प्रत्येक व्यक्ती आई होऊ शकते', असं या व्यक्तीनं म्हटलं आहे.
लॉस एंजेलिस मधील (Los Angeles) 37 वर्षाचा बेनेट कास्पर विल्यम्स (Bennett Kaspar-Williams) हा एक ट्रान्सजेंडर पुरूष आहे. 7 वर्षांपूर्वी तो एक महिला होता. परंतु, 3 लाख रुपयांपेक्षा अधिक पैसे खर्च करून त्याने सर्जरी केली आणि ब्रेस्ट (Breast) काढून टाकले. परंतु, बेनेटला मातृत्वाचा आनंद घ्यायचा असल्यानं त्यानं स्त्रीत्वाची ओळख असणारा गर्भाशय तसाच ठेवला.
कोरोना पॉझिटिव्ह करीनाच्या Omicron रिपोर्टमधून ही माहिती आली समोर
2017 मध्ये त्याची मलिक नावाच्या व्यक्तीशी ओळख झाली. हे दोघे एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी कुटुंब विस्ताराचा निर्णय घेतला.
हॉस्पिटलमध्ये वडिलांऐवजी लोक त्याला आई म्हणू लागले
2020 मध्ये त्याने त्याचा मुलगा हडसन याला जन्म दिला. अलीकडेच बेनेटने बाळंतपणादरम्यानचा एक विचित्र अनुभव शेअर केला आणि सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून आपला राग व्यक्त केला. `डेली स्टार`च्या वृत्तानुसार, बेनेटनं सांगितलं की ``हॉस्पिटलमधील लोक मला बाळाचे वडिल म्हणण्याऐवजी बाळाची आई म्हणू लागले. मातृत्वाची (Motherhood) भावना ही केवळ महिलांमध्येच नाही तर पुरुषांमध्येही उत्पन्न होऊ शकते. त्यामुळे लोकांच्या वक्तव्याचा मला विलक्षण राग आला.
मातृत्व आणि स्त्रीत्व यात फरक असतो. मात्र ही बाब लोकांना समजत नाही. एखादी महिलाच आई होऊ शकते आणि तिच्यातच मातृत्वाच्या भावना असतात, असा समज वर्षानुवर्ष लोकांच्या मनात कायम आहे``.
बेनेटने व्यक्त केला राग
`डेली मेल`शी बोलताना बेनेटनं सांगितलं की, 'आपल्याला मातृत्व आणि स्त्रीत्व या दोन्ही गोष्टी वेगळ्या कराव्या लागतील. जी व्यक्ती बाळाला जन्म देऊ शकते, ती आई असते.
लग्नानंतर माहेरी आलेल्या तरुणीला घातलं कोंडून, कारण वाचून बसेल धक्का
कारण तिच्यात मातृत्वाची भावना असते. केवळ महिलाच आई होऊ शकत नाहीत, ही गोष्ट आपल्याला समजून घ्यावी लागेल'. इन्स्टाग्रामवर (Instagram) बेनेटचे 20 हजारांपेक्षा अधिक फॉलोअर्स आहेत. त्याचे फॉलोअर्स नेहमीच त्याला अनेक गोष्टींसाठी सपोर्ट करत असतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Parents and child