मराठी बातम्या /बातम्या /लाइफस्टाइल /

Cough syrup ठरलं विष! खोकल्याच्या औषधामुळे 3 चिमुकल्यांचा गेला जीव; 16 मुलं पडली आजारी

Cough syrup ठरलं विष! खोकल्याच्या औषधामुळे 3 चिमुकल्यांचा गेला जीव; 16 मुलं पडली आजारी

कफ सिरपच्या (Dextromethorphan Cough Syrup) साइड इफेक्टमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात समोर आलं आहे.

कफ सिरपच्या (Dextromethorphan Cough Syrup) साइड इफेक्टमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात समोर आलं आहे.

कफ सिरपच्या (Dextromethorphan Cough Syrup) साइड इफेक्टमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात समोर आलं आहे.

  • Published by:  Priya Lad

नवी दिल्ली, 20 डिसेंबर : थंडीचे दिवस आहेत. या दिवसात सर्दी-खोकला (Cough) सामान्य आहे.लहान मुलांना तर हा त्रास सर्रास होतो. खोकला झाला की आपण सहज माहीत असलेलं कफ सिरप घेतो किंवा बऱ्याचवेळा खोकल्यावर डॉक्टर आपल्याला कफ सिरप (Cough syrup) देतात. हेच कफ सिरप 3 मुलांच्या जीवावर बेतलं आहे (Children died due to Cough syrup). खोकल्याचं औषध घेतल्यामुळे 3 मुलांचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत ही धक्कादायक घटना समोर आली आहे.

दिल्लीतील मोहल्ला क्लिनिकमध्ये (Delhi Mohalla Clinic) खोकल्याचं औषध प्यायल्याने 16 मुलं आजारी पडली आहेत. तर तिघांचा मृत्यू झाला आहे. डिस्ट्रोमेथोर्फन कफ सिरपच्या (Dextromethorphan Cop Syrup) साइड इफेक्टमुळे मुलांचा मृत्यू झाल्याचं तपास अहवालात समोर आलं आहे. यानंतर केंद्र सरकारच्या डायरेक्टर जनरल हेल्थ सर्विसेजने दिल्लीच्या  DGHS निर्देश दिले आहेत. चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना डिस्ट्रोमेथोर्फन सिरप देऊ नये, अशी नोटीस मोहल्ला क्लिनिक आणि डिस्पेन्सरीना जारी करण्यात आली आहे.

हे वाचा - 'कदाचित खूप उशीर झाला', Omicron समोर आता आरोग्यमंत्र्यांनीही टेकले हात

टीव्ही 9 हिंदीच्या रिपोर्टनुसार डॉ. अनिल गोयल यांनी सांगितलं. डिस्ट्रोमेथोर्फन सिरप खूप जास्त खोकला असेल तर दिलं जातं. 4 वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हे औषध दिलं जात नाही.  सिरप प्याल्यानंतर 16 मुलं आजारी पडली. त्यात दोन वर्षांपेक्षा लहान मुलांचा समावेश आहे. तपासानुसार ज्या मुलांचा मृत्यू झाला आहे, त्यांच वयही दोन ते तीन वर्षेच आहे.

हे औषध देताना खूप काळजी घ्यावी लागते. याचे मर्यादित डोस द्यायला हवेत.  मुलांना औषधाचा किती डोस देण्यात आला आणि कुठे याचा तपास व्हायला हवा. सोबतच औषध देताना काही चूक तर झाली नाही ना, ज्याचा परिणाम मुलांना भोगावा लागला, हेसुद्धा तपासायला हवं, असं डॉ. गोयल म्हणाले.

हे वाचा - बीटाचं अतिसेवन हे ठरु शकते डोकेदुखी, हे आहेत Side Effects

कप सिरपमुळे मुलांचा मृत्यू झाल्याची ही पहिली घटना नाही. याआधी जम्मू-काश्मीरमध्येही 9 मुलांचा कफ सिरपमुळे मृत्यू झाला होता.  कोल्डबेस्ट पीसी असं या कफ सिरपचं नाव. हिमाचल प्रदेशमधील डिजिटल व्हिजन नावाची कंपनी तयार करते. चंदीगड इथल्या PGIMER अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या कफ सिरपमुळेच 9 मुलांचा मृत्यू झाला होता. या कफ सिरपमध्ये Diethylene Glycol या विषारी पदार्थ आढळला आहे. जो हानीकारक आहे.  या सर्व 9 मुलांचा मृत्यू या औषधामुळे झाल्याचं समजल्यानंतर 8 राज्यांमध्ये या औषधावर बंदी घालण्यात आली.

First published:

Tags: Health, Lifestyle, Parents and child