भोपाळ, 06 जुलै : कोरोनाच्या (Coronavirus) दुसऱ्या लाटेत लहान मुलांचीही बहुतेक प्रकरणं समोर आली. तिसऱ्या लाटेचाही लहान मुलांना धोका आहे, असं सांगितलं जातं आहे. पण त्याआधीच मध्य प्रदेशमध्ये काही मुलं आजारी पडली आहेत. त्यापैकी तिघांचा मृत्यू झाला आहे (Children died in Madhya pradesh). त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे.
पुरुषोत्तमपूरच्या (Puroshottampur) चंदमरी (Chandmari) परिसरातील ही घटना आहे. जूनच्या अखेरपासून इथली मुलं आजारी पडू लागली आहेत. 27 जूनपासून लहान मुलांमध्ये सर्दी, खोकला आणि ताप अशी लक्षणं दिसत आहेत. गेल्या दहा दिवसांत अशी लक्षणं दिसलेल्या तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. तर जवळपास आणखी 12 मुलं आजारी आहेत.
हे वाचा - आश्चर्य! कोरोना लस घेतल्यानंतर डोळ्यांची दृष्टी परत आली; आजींनी केला दावा
सर्दी, खोकला आणि ताप ही कोरोनाव्हायरसची प्रमुख लक्षणं. त्यामुळे या मुलांची तपासणी करण्यासाठी वैद्यकीय पथकाला पाठवण्यात आल्याची माहिती मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकाऱ्यांनी दिली. पण त्यांची आणि त्यांच्या पालकांचीही कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे.
मुख्य वैद्यकीय आरोग्य अधिकारी आर एस पांडे यांनी सांगितलं की, "27 जूनपासून तीन मुलांचा मृत्यू झाला आहे. या मुलांची कोरोना चाचणी निगेटिव्ह होती. त्यांचे पालकही कोरोना निगेटिव्ह आहेत. तिन्ही मुलं जवळपास तीन वर्षांचे आहेत. तीनपैकी एका मुलावर टीबीचे उपचार सुरू होते. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत"
हे वाचा - '...तर तिसऱ्या लाटेची भीती नाही' : आरोग्यमंत्री राजेश टोपे
लहान मुलांना कोरोनाव्हायरसचा धोका लक्षात घेता त्यांना कोरोनाव्हायरसपासून वाचवण्याची धडपड सुरू आहे. शिवाय कोरोनाची लागण झालेल्या मुलांमध्ये मल्टी इन्फ्लेमेटरी सिंड़्रोम झाल्याचंही समोर आलं आहे. अशात आता कोरोना निगेटिव्ह असताना सर्दी-खोकला-ताप आलेल्या मुलांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे चिंता वाढली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Health, Madhya pradesh