चंदीगड, 29 नोव्हेंबर : बर्गर (Burger) म्हटलं की अनेकांच्या तोंडाला पाणी सुटतं. विचार करा जर तो बर्गर सोन्याचा (Gold Burger) असेल तर खाण्याची इच्छा अधिकच वाढेल नाही नाही. आता सोन्याचा बर्गर (24 Carat gold burger) म्हणजे त्याची किंमतही जास्तच नाही का? आणि त्यामुळे मग असा बर्गर खाण्याची इच्छा तुम्ही मारत असाल तर तसं बिलकुल करू नका (24 Carat gold burger for free) . तुमच्या खिशाला परवडत नसेल तर आता हा असा बर्गर मोफत खाण्याची सुवर्णसंधी आहे (Food challenge).
तुम्ही तर खवय्ये असाल, फूड लव्हर असाल तर तुम्ही वेगवेगळ्या फूड ऑफर्सचा लाभ नक्कीच घेत असाल (Food offers). अशीच एक फूड ऑफर सध्या सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल होते आहे. ती म्हणजे सोन्याचा बर्गर खाण्याची. हा बर्गर तुम्हाला मोफत खायला मिळणार आहे. पण त्यासाठी एक अट आहे. म्हणजे फूड चॅलेंजअंतर्गत तुम्हाला हा बर्गर फ्रीमध्ये खायला मिळेल. फूड चॅलेंज म्हणजे एका विशिष्ट वेळेत तुम्हाला विशिष्ट मर्यादेत पदार्थ खायचे असतात.
आता हे फूड चॅलेंज कोणत्या फूड चैन कंपनीचं नाही. तर पंजाबच्या लुधियानामध्ये असलेल्या बाबा जी बर्गरच्या स्ट्रीट वेंडरने दिलं आहे. ज्याने तब्बल एक हजार रुपयांचा बर्गर फ्रीमध्ये खायला देण्याची ऑफऱ दिली आहे.
हे वाचा - Oh no! आइसक्रीम प्रँकमुळे चिमुकल्यांची सटकली आणि...; काय केलं पाहा VIDEO
सही है युट्यूब चॅनेलवर हा व्हिडीओ पोस्ट करण्यात आला आहे. हा बर्गर आपण एरवी खात असलेल्या बर्गरप्रमाणेच आहे, पण त्या बर्गरपेक्षा तो वेगळा आहे. या बर्गरमध्ये खास आहे ते सोनं. या बर्गरवर सोन्याचा वर्क चढवलेला आहे आणि तो आकारानेही खूप मोठा आहे. त्यामुळे याची किंमत खूप आहे.
जर एखाद्या व्यक्तीने एकट्याने हा बर्गर 5 मिनिटांत पूर्ण संपवला तर त्याला हा बर्गर मोफत दिला जाईल. त्याने बर्गर खाण्यासाठी दिलेले पैसे त्याला परत केले जातील. सोबतच तुम्हाला एक हजार रुपये बक्षीस म्हणून दिले जातील, असं या व्हिडीओत सांगण्यात आलं आहे.
हे वाचा - 24 मिनिटांत एकट्यानं संपवलं सात जणांचं जेवण, मेन्यू ऐकूनच येईल ढेकर
जर तुम्हाला पटापट खाण्याची सवय असेल तर तुम्ही नक्कीच हा बर्गर मोफत खाऊ शकता. काय मग तुम्हाला काय वाटतं, हा बर्गर तुम्ही पाच मिनिटांत संपवू शकता का? आमच्या सोशल मीडियाच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की आपली प्रतिक्रिया द्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Food, Lifestyle, Viral, Viral videos