चंदीगड, 24 डिसेंबर : शरीराची रचना, त्यात होणारे बदल, उद्भवणाऱ्या समस्या आपल्यासारख्या सर्वसामान्य व्यक्तींसाठी आश्चर्यकारकच असतात. डॉक्टरांसाठी हे तसं नवीन नसतं. मात्र काही प्रकरणं अशी असतात ज्यामुळे डॉक्टरांनाही आश्चर्याचा धक्का बसतो. असंच एका प्रकरण ते म्हणजे हरयाणातील (haryana). एका 80 वर्षांच्या व्यक्तीच्या पोटाचं ऑपरेशन (stomach operation) केलं आणि त्यानंतर डॉक्टरांना शॉक बसला.
कैथल जिल्ह्यातील 80 वर्षांचे श्रीचंद. यांच्या पोटात समस्या होती. त्यांच्या पोटात स्टोन (stomach stone) होते. यासाठी त्यांच्यावर शस्त्रक्रिया करणं गरजेचं होतं. जेणेकरून हे स्टोन काढून टाकता येतील. ऑपरेशनसाठी त्यांना एका खासगी रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. 22 डिसेंबरला श्रीचंद यांच्या पोटाचं ऑपरेशन झालं.
हे वाचा - धक्कादायक! गर्भातील बाळापर्यंत पोहोचतंय प्लॅस्टिक; नाळेत सापडले कण
डॉक्टरांनी ऑपरेशन करून त्यांच्या पोटातील स्टोन काढले. जवळपास 40 मिनिटं हे ऑपरेशन सुरू होते. त्यानंतर त्यांच्या पोटातून किती स्टोन काढले ते मोजले. एक, दोन, तीन, चार, पाच..... 2215. काय झालं? आकडा वाचूनच धक्का बसला ना तुम्हाला. असाच धक्का डॉक्टरांनाही बसला. 80 वर्षांच्या श्रीचंद यांच्या पोटातून 2215 स्टोन काढण्यात आले आहे. हे स्टोन मोजायलाच जवळपास 70 मिनिटं लागली.
हे वाचा - लठ्ठ होऊ म्हणून घाबरली इन्स्टाग्राम स्टार; सडपातळ झाली आणि जीवच गमावला
गुगलवरील माहितीनुसार, आतापर्यंत मानवी शरीरातून सर्वाधिक 11,050 स्टोन निघालेले आहेत. तर आणखी एका प्रकरणामध्ये 5070 स्टोन काढण्यात आले आहेत. श्रीचंद हे पोटात सर्वाधिक स्टोन असलेले तिसरे रुग्ण असावेत असा अंदाज आहे. त्यांच्या पित्ताशयातून 2215 स्टोन काढण्यात आले आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.