Home /News /lifestyle /

Numerology 21 व्या शतकातलं हे 21 वं वर्षं, 21 आकड्याबद्दल जाणून घ्या या गोष्टी

Numerology 21 व्या शतकातलं हे 21 वं वर्षं, 21 आकड्याबद्दल जाणून घ्या या गोष्टी

गणित, इतिहास, अंकशास्र, ज्योतिषशास्त्र, खगोलविज्ञान सगळ्यात अंकाचं वेगवेगळं महत्त्व आहे. 21 या अंकाचं जगभरातलं महत्त्व काय आहे ते पाहू या.

    21 व्या शतकाचं हे 21 वं वर्षं. फक्त गणित नव्हे इतिहास, अंकशास्त्र, ज्योतिष, खगोलशास्त्र तसंच मानवी समजा आणि संस्कृतीचं आकड्यांशी वेगळं नातं आहे. आकड्यांवर माणसाचं प्रेम आहे. आकड्यांवरच जग चाललं आहे, असंही म्हणता येईल. 21 आकड्याबद्दल काही रंजक गोष्टी जाणून घेऊ या. धर्म व संस्कृती 21 म्हणजे 2+1=3 होतो. हिंदू धर्मात तीन सर्वोच्च देव म्हणजे तिघे ब्रह्मा, विष्णू आणि महेश. इस्लाममध्येही अल्ला, पैगम्बर आणि त्यांचे अनुयायी हे पण तीनच आहेत. सृष्टीचा आधार असलेले सत्त्व, रज, तम हे तीन गुण. इस्लाममधील शुभ संख्या 786 ची बेरीज 21 होते. गणित आणि विज्ञान भौतिकशास्त्रज्ञ डंकननी 6 रोग्यांवर अभ्यास केला त्याच्या शरीराचं मृत्यूपूर्वीचं आणि मृत्युनंतरचं वजन केलं आणि अशी थिअरी मांडली की मानवी आत्म्याचं वजन 21 ग्रॅम असतं. रासायनिक तत्त्व स्कँडेयमचा ऑटॉमिक नंबर 21 आहे. 1879 ला शोध लागलेलं हे पृथ्वीवरचं दुर्मीळ रसायन आहे. गणितातील फिबोनाची सीक्वेन्समध्ये पहिल्या दोन आकड्यांची बेरीज हा तिसरा क्रमांक असतो. जसं की 1, 2, 3, 5... यात 1 अधिक 2 बरोबर 3 आणि तसंच पुढे. या सीक्वेन्समध्ये 8वा नंबर 21 आहे. रोमन अंकांची विशिष्ट पद्धत आहे त्यात 21 अंक XXI असा लिहिला जातो. आयनाचा शेवट जेंव्हा सूर्य पृथ्वीच्या सर्वांत उत्तरेच्या किंवा दक्षिणेच्या टोकाला पोहोचतो त्याला सॉल्सटाइस म्हणजे आयन म्हणतात. दरवर्षी 21 दिसंबरला उत्तरायण सुरू होतं आणि 21 ला दक्षिणायन सुरू होतं. त्यानुसार पृथ्वीवरील वेळाही निश्चित केल्या जातात. देश, कायदे आणि परंपरा भारतात 18 वर्षांहून मोठ्या मुलगा किंवा मुलीला कायदेशीरदृष्ट्या सज्ञान मानलं जातं. मुलीचं लग्न 18 वर्षांनंतर तर मुलाचं लग्न 21 वर्षांनंतर करायला कायद्याने परवानगी देण्यात आली आहे. भारतात 26 जानेवारीला दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात राष्ट्रध्वजाला 21 तोफांची सलामी दिली जाते. 52 सेकंदांच्या राष्ट्रगीतात सरासरी 2.25 सेकंदांच्या अंतराने तोफ 7 तोफांचे तीन राउंड उडवले जातात. अमेरिका, बहारिन, सिंगापूरसह 13 देशांमध्ये 21 वर्षांनंतर व्यक्ती सज्ञान मानली जाते. अमेरिकेत 18 व्या वर्षानंतर तुम्ही मतदान करू शकता, युद्धात सहभागी होऊ शकता पण तुम्हाला दारू पिण्याची परवानगी 21 वर्षांनंतरच मिळते. अमेरिकेत R- सर्टिफाइड चित्रपट पाहण्यासाठी तुम्ही 21 वर्षांचं असणं गरजेचं आहे तसंच हँडगन व गोळ्या खरेदीसाठीही 21 वर्षांचं वय असणं तिथं गरजेचं असतं. UK तील राज परिवाराच्या आणि अमेरिकी राष्ट्रपतींच्या सन्मानार्थ बंदुकांच्या 21 फैरी झाडल्या जातात. नऊ देशांत मतदानास पात्र ठरण्यासाठी 21 वर्षांचं वय निश्चित केलं असून अमेरिकेतील बहुतांश राज्यांत 21 वर्षांनंतरच तुम्ही कॅसिनो किंवा जुगार खेळू शकता. खेळ आणि अंक ज्योतिष बॅडमिंटन आणि टेबलटेनिसच्या नियमांत 2011 मध्ये बदल झाले त्यापूर्वी खेळाडूला सामना जिंकण्यासाठी 21 पॉइंट्सची गरज असायची. ल्युडो, सापशिडीत वापरल्या जाणाऱ्या फास्यावर एकूण 21 ठिपके असतात. टॅरो कार्डमध्ये 21 आकड्याला खूप महत्त्व आहे. टॅरोत 21 नंबरच्या कार्डाला 'कार्ड द वर्ल्ड' म्हणतात म्हणजे जग तुमच्या पायांशी लोळण घेतंय असा असतो. 21 नावाचा जुना पत्त्यांचा खेळ होता तोच बदलून त्याचं नवं रूप म्हणजे कॅसिनो झाला आहे. ऐतिहासिक सत्य कुर्दिस्तानात 1928 मध्ये क्रांतिकारकांनी तयार केलेल्या झेंड्यात मध्यभागी सूर्य आहे त्यात 21 किरणं आहेत. पहिल्या महायुद्धात जपान सरकारने चीन सरकारसमोर 21 मागण्या ठेवल्या होत्या. अमेरिका व यूकेने त्याला विरोध केला होता. दुसरीकडे, एमकेएसच्या 21 मांगण्यानंतर पोलंडमधील एकी झाली. 1663 पासून 1816 पर्यंत ब्रिटिश साम्राज्यात गिन्नी हे चलनी नाणं वापरलं जायचं. भारतातही ते वापरात होतं. त्याची किंमत एक गिन्नी म्हणजे 21 शिलिंग होती.
    First published:

    पुढील बातम्या