Home /News /lifestyle /

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांनी रुग्णाच्या किडनीतून काढले तब्बल 206 Stone

6 महिने कंबरदुखीने होता हैराण; डॉक्टरांनी रुग्णाच्या किडनीतून काढले तब्बल 206 Stone

प्रतीकात्मक फोटो

प्रतीकात्मक फोटो

6 महिन्यांच्या कंबरदुखीनंतर जेव्हा रुग्णाने वैद्यकीय तपासणी केली, तेव्हा त्याला धक्काच बसला.

    हैदराबाद, 20 मे : प्रत्येकाला आयुष्यात कधी ना कधी कंबरदुखीचा त्रास हा होतोच. अतिरिक्त काम, कंबरेवर ताण, झोपेच्या स्थितीमुळे कंबर दुखत असावी असं अनेकांना वाटतं. त्यामुळे त्याला फार गांभीर्याने घेतलं जात नाही. म्हणजे एखादी पेनकिलर घेऊन किंवा वरच्या वर वेदनेपासून आराम देणारं औषध लावलं जातं. त्यामुळे तात्पुरता आराम मिळतो. पण पुन्हा कंबरदुखी सुरू होते आणि पुन्हा तेच उपाय आपल्यापैकी बरेच जण करतात. पण अशी वारंवार होणारी कंबरदुखी ही सामान्य नाही. असंच एक प्रकरण समोर आलं आहे (Doctor's removed 206 stones from Kidney). एक रुग्ण तब्बल 6 महिने कंबरदुखी सहन करत होता. रामलक्ष्मैया असं या रुग्णाचं नाव आहे. ते 56 वर्षांचे आहेत. त्यांच्या कमरेच्या डाव्या बाजूल दुखत होतं आणि त्यामुळे त्याला काहीच काम करणं शक्य होत नव्हतं. त्याने स्थानिक डॉक्टरांना दाखवलं. त्यांनी वेदना कमी करण्याची औषधं दिली. पण या औषधांचा प्रभाव कमी होताच त्यांच्या वेदना पुन्हा सुरू व्हायच्या. हे वाचा - भारतात Omicron BA.4 चा पहिला रुग्ण सापडल्याने खळबळ; किती घातक आहे हा स्ट्रेन? त्यानंतर ते अवेअर ग्लेनीगल्स ग्लोबल हॉस्पिटलमध्ये गेले. तिथं त्यांच्या काही वैद्यकीय तपासणी करण्यात आल्या. रुग्णाचं सिटी स्कॅन, सोनोग्राफी करण्यात आली. रिपोर्टमध्ये तिच्या डाव्या बाजूच्या किडनीत स्टोन असल्याचं आढळलं. डॉक्टरांनी सर्जरी करावी लागणार असल्याचं सांगितलं. डॉक्टरांनी त्याची की-होल सर्जरी केली. त्याच्या किडनीतील सर्व स्टोन बाहेर काढण्यात आले. तब्बल 206 स्टोन होते. दुसऱ्या दिवशी त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. हे वाचा - जिथं याआधी कधीच घुसू शकला नाही त्या देशातही Monkyepox Virus चा शिरकाव; भारताला किती धोका? डॉक्टरांनी सांगितलं की, उन्हाळ्यांच्या दिवसात स्टोनची समस्या जास्त दिसून येते. त्यामुळे सोडायुक्त कोल्ड ड्रिंक पिऊ नये. साधं पाणी, नारळपाणी, ओआरएसचं पाणी, ताक प्यावं. यामुळे शरीरातील पाण्याची पातळी नीट राहते. शरीर हायड्रेट राहण्यासाठी वेळोवेळी पाणी पित राहावं आणि तीव्र उन्हात जास्त वेळ राहू नये, असा सल्लाही डॉक्टरांनी दिला आहे.
    Published by:Priya Lad
    First published:

    Tags: Health, Lifestyle

    पुढील बातम्या