अशी मिळवा 2018मध्ये नोकरी

अशी मिळवा 2018मध्ये नोकरी

2018मध्ये नोकरी मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे 2018मध्ये नोकरी मिळवण्यासाठी काही खास टिप्स.

  • Share this:

20 डिसेंबर : सध्याच्या स्मार्ट जीवनात आपल्यालाही स्मार्ट असणं खूप महत्त्वाचं आहे. आपला स्मार्टनेस आणि सगळ्या गोष्टींचं ज्ञान आपल्याला प्रभावशाली बनवतं पण आताच्या तंत्रज्ञानाच्या जीवनात नोकरी मिळणं खूप कठीण आहे. 2017मध्ये जीएसटी आणि नोटबंदीमुळे नोकरी मिळणं कठीण झालं होतं पण आता 2018मध्ये नोकरी मिळवण्यासाठी काही महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे. त्यामुळे 2018मध्ये नोकरी मिळवण्यासाठी काही खास टिप्स.

1. टेक्नोलॉजीचा उत्तम अभ्यास

तुम्ही कोणत्याही क्षेत्रात काम करत असलात तरी आता टेक्नोलॉजीची माहिती असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे फक्त आयटीच नाही तर प्रत्येक क्षेत्रात आता टेक्नोलॉजी आणि तंत्रज्ञानाचा वापर केला जातो. तुम्हाला आजूबाजूच्या टेक्निकल गोष्टींची माहिती असेल तर त्याने नोकरी मिळवायला खूप फायदा होतो.

2. सगळ्या कला अवगत असू द्या

आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी करता येणं खूप महत्त्वाचं आहे. प्रत्येक कंपनीला मल्टिटास्किंग काम करणारी लोकं हवी असतात, त्यामुळे आपल्याला ज्या क्षेत्रात काम करायचं आहे त्या क्षेत्रातल्या प्रत्येक गोष्टींचा अभ्यास करा आणि सगळ्या गोष्टी शिकून घ्या.

3. कामात चटपटीतपणा हवा

प्रत्येकाने आपली कामं झटपट करावी अशी सगळ्याच कंपनीची अपेक्षा असते. त्यामुळे आपल्या कामांमध्ये वेग हवा. आपल्या गरजा बाजूला ठेवून कंपनीच्या भल्यासाठी प्रत्येक काम स्वीकारावं. खरं तर आपल्या उत्तम कामगिरीचं कंपनीकडून कौतुकही होतं त्यामुळे आपलं कौशल्य कंपनीला नंबर वन करण्यासाठी वापरा.

4. चांगल्या परफॉर्मन्सकडे लक्ष द्या

कंपनीत आपली चांगली प्रतिमा ठेवण्यासाठी आपल्या परफॉर्मन्सकडे लक्ष द्या. त्यासाठी प्रत्येक गोष्टीत अनुभव महत्त्वाचा आहे.

5. चांगलं कम्युनिकेशन स्किल

आपल्या मातृभाषेबरोबरच आपलं इंग्रजीही चांगलं हवं. आताच्या काळात नोकरीसाठी इंग्रजी येणं महत्त्वाचं आहे. त्याचबरोबर आपलं गणित आणि आपल्याला प्रत्येक गोष्टीचं अपडेट असणंही महत्त्वाचं आहे.

6. उत्तम रिज्युमे बनवा

नोकरी शोधण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपला रिज्युमे. त्यामुळे नोकरी मिळण्यासाठी रिज्युमे जर ऑनलाईन पोस्ट करत असाल तर त्यात सगळे ट्रेंडिंग शब्द वापरा. त्याने प्रत्येक कंपनीला तुमचा रिज्युमे सगळ्यात आधी मिळेल.

First published: December 20, 2017, 2:09 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading