हे काय भलतंच! इथं मातीत पुरले जात आहेत चक्क Underwear

हे काय भलतंच! इथं मातीत पुरले जात आहेत चक्क Underwear

एक दोन नव्हे तर तब्बल 2000 अंडरविअर्स (underwears) मातीत पुरले जात आहेत आणि तेसुद्धा फक्त पांढऱ्या रंगाचे.

  • Share this:

बर्न, 13 एप्रिल : मातीमध्ये बी रुजवतो, रोप लावतो हे आपणा सर्वांना माहिती आहे. पण कधी कुणी अंडरविअर्सही (underwears) मातीत पुरल्याचं ऐकलं आहे का? बरं हे अंडरविअर्स (Underpants)  एक दोन नव्हे तर तब्बल 2000 आणि तेसुद्धा फक्त पांढऱ्या रंगाचे. आता तर तुम्हालाही प्रश्न पडला असेल की मातीत मुद्दामहून असे अंडरविअर्स का पुरले जात आहे? यामागे नेमकं कारण काय आहे?

मातीत अंडरविअर पुरण्याचा हा प्रकार सुरू आहे तो स्वित्झर्लंडमध्ये (switzerland). इथं एक अनोखा प्रयोग केला जातो आहे. मातीची गुणवत्ता तपासण्यासाठी हा विचित्र प्रयोग सुरू आहे. मातीची गुणवत्ता प्रयोगशाळेत किंवा शेतजमिनीत वेगवेगळ्या पद्धतीने केली जाते. पण मातीची गुणवत्ता तपासण्याचा असा प्रयोग मात्र तुम्हालासुद्धा पहिल्यांदाच समजला असेल.

रिपोर्टनुसार स्वित्झर्लंडमधील स्टेट रिसर्च इन्स्टिट्यूट एग्रोस्कोप हा प्रयोग करत आहे. या अभ्यासात सहभागी झालेले शेतकरी आणि बागायतदार यांना संस्थेमार्फत मातीत पुरण्यासाठी दोन जोडी पांढरे अंडरविअर्स पाठवले जात आहेत.

हे वाचा - प्रेग्नन्सीच्या आठव्या महिन्यात महिलेने केली कमाल; VIDEO पाहून तोंडात बोटं घालाल

पर्यावरण तज्ज्ञ आणि या प्रोजेक्टचे प्रमुख मार्सेल फॉन डेय हेइडन यांनी सांगितलं, याआधी असा प्रयोग कॅनडात करण्यात आला आहे. पण तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला नाही. टी-बॅग्स जमिनीत गाडून जमिनीच्या गुणवत्तेची माहिती मिळते. त्यामुळे या अभ्यासात सहभागी झालेले शेतकरी आणि बागायतदार यांना अंडरविअर्स आणि टी-बॅग्जसुद्धा दिल्या जातील. जेणेकरून त्यांची तुलना करता येईल.

आता अंडरविअर्सवरून मातीची गुणवत्ता नेमकी कशी समजणार असा प्रश्न तुम्हालाही पडला असेल ना? प्रयोगाअंतर्गत हे अंडरविअर गवत असलेल्या मैदानात, शेतात आणि झाडं-झुडुपांच्या खाली पुरले जातील. जमिनीत पुरलेले हे अंडरविअर्स नंतर बाहेर काढले जातील आणि त्यांची तपासणी केली जाईल. जमिनीतील छोट्या जीवांनी त्यांना किती नष्ट केलं आहे, हे तपासलं जाईल. सर्वात आधी एक अंडरविअर मातीतून बाहेर काढली जाईल आणि त्याचा फोटो काढला जाईल. पुन्हा एका महिन्यानंतर दुसरी अंडरविअर बाहेर काढली जाईल. त्यानंतर त्याची तपासणी केली जाईल. जर अंडरविअरमध्ये जास्त छेद असतील तर ती माती उत्तम.

हे वाचा - ट्विटरवर छेडलं मँगोवॉर… फळांचा राजा आंबा पण आंब्यांचा राजा कोण?

अंडरविअर्स खरंच मातीची गुणवत्ता सांगू शकतं आहे, हे स्पष्ट व्हावं, यासाठी या मातीच्या नमुन्यांची पुन्हा प्रयोगशाळेतही तपासणी केली जाणार आहे.

Published by: Priya Lad
First published: April 13, 2021, 3:34 PM IST
Tags: Viral

ताज्या बातम्या